दिनांक 18 April 2019 वेळ 7:52 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » October » 22

Daily Archives: 22/10/2018

शिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम

पी. जे. हायस्कूल मुख्याध्यापकपदाचा वाद स्वाक्षरी अधिकार देतानाही सेवाज्येष्ठता डावलली प्रतिनिधी/वाडा, दि. 21 : दि वाडा एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकार्‍यांच्या भोंगळ कारभारामुळे गणेशोत्सव व दसर्‍यासारखे महत्वाचे सण वेतनाविना साजरे करण्याचा प्रसंग ओढवलेल्या येथील पी. जे. हायस्कूलमधील शिक्षकांवर येणारी दिवाळीही वेतनाशिवाय साजरी करावी लागणार असल्याचे चित्र दिसू लागल्याने गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेली शिक्षकांची आर्थिक कोंडी कायम आहे. 31 मे 2018 रोजी ... Read More »

महावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट

राजतंत्र मीडिया/दि. 22 : महावितरणतर्फे सुरु करण्यात आलेले भारनियमन आणि विजेचा लपंडाव यासह विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिक्षक अभियंता सौ. किरण नागावकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश शहा व वसंत चव्हाण, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, आमदार अमित घोडा, पालघर पंचायत समितीच्या सभापती मनिषा पिंगळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने ... Read More »

कासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला

राजतंत्र मीडिया/डहाणू, दि. 22 : गुजरात राज्यातून महाराष्ट्रात बेकायदा विक्रीसाठी आणला जात असलेला तब्बल 1 कोटी 6 लाख रुपये किंमतीचा गुटखा अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी पकडला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा हद्दीतील घोळ टोलनाक्यावर शुक्रवारी (दि. 19) ही कारवाई करण्यात आली. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महामार्गावरील घोळ टोलनाक्यावर अन्न सुरक्षा अधिकार्‍यांकडून वाहनांची तपासणी सुरु असताना संशयित तीन टेम्पाची तपासणी केली असता ... Read More »

वाडा : शेतकर्‍यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

एकरी 30 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी प्रतिनिधी/वाडा, दि. 22 : परतीच्या पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र याकडे प्रशासन व शासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच पालघर जिल्ह्याच्या तालुकानिहाय दुष्काळग्रस्त यादीत वाडा तालुक्याचे नाव वगळण्यात आले आहे. याचा विरोध म्हणून व आपल्या इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज तहसीलदार कार्यालयावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ... Read More »

Scroll To Top