दिनांक 19 November 2018 वेळ 11:28 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » October (page 5)

Monthly Archives: October 2018

डहाणू वनविभागातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा

img-20181006-wa00084281392510416134297.jpg

राजतंत्र मिडीया डहाणू दिनांक ६: वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, त्यासाठी पुरेशी जनजागृती व्हावी या उद्देशाने डहाणू वनविभागातर्फे १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये व मुक्त गटात निबंध व चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या. यशस्वी स्पर्धकांना उप वनसंरक्षक श्री भिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र व बक्षीसे देऊन ... Read More »

उद्या (4 ऑक्टोबर) कुणाल मळेकरसाठी मदतफेरी

राजतंत्र मिडीया/डहाणू दि. 4 ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या कुणाल प्रवीण मळेकर (डहाणू) या २१ वर्षीय युवकाच्या जगण्यासाठीच्या संघर्षाला बळ देण्यासाठी आता महिला शक्ती सरसावली आहे. अनाहिता नजमी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्या कुणालसाठी आव्हान करीत आहेत. उद्या (4 ऑक्टोबर) त्यांच्यासह काही महिलांच्या पुढाकाराने सायंकाळी 4 वाजता ... Read More »

रोहयो समितीचा पालघर दौरा, प्रशासनाची फलकबाजी

ROHIYO DAURA-WADA

प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : रोजगार हमी योजनेची विधीमंडळ समिती 4 व 5 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असल्याने जिल्ह्यातील प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून झालेल्या कामांवर ऐन वेळी फलक लावण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, वनखाते, ग्रामपंचायत आदी यंत्रणांकडून रोजगार हमी योजनेची असंख्य कामे मागील वर्षी करण्यात आली. या कामांवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च ... Read More »

शिवसेनेने रोखला महामार्ग

SHIVSENA RASTAROKO1

>> भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याच्या निकृष्ट कामांचा विचारला जाब दिनेश यादव/वाडा, दि. 3 : भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गाच्या रस्त्याचे काम करणार्‍या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असल्याने हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. आजवर या महामार्गावर अनेक निरपराध नागरिकांचे अपघातामुळे बळी गेले असून शेकडो गंभीर रित्या जखमी झाले आहेत. कंपनी प्रशासनाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ... Read More »

महावितरणच्या बिलांचे विलंबाने वाटप

LOGO-4-Online

>> धनंजय गोखले यांची तक्रार राजतंत्र मीडिया/डहाणू दि. २ : डहाणू विभागातील महावितरणची विज बिले ग्राहकांपर्यंत विलंबाने पोहोचत असून त्यामुळे ग्राहकांना बिलातील सवलतीपासून वंचीत रहावे लागत असे. जागृत विज ग्राहक धनंजय गोखले यांनी याबाबत तक्रार केली आहे. कधीकधी ही बिले भरणा करण्यासाठीची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर मिळत असल्याने ग्राहकांना विनाकारण विलंब शुल्क भरावे लागत आहे. गोखले यांनी याबाबत ग्राहकसेवा केंद्राच्या ... Read More »

अखेर वनक्षेत्रपालांवर निलंबनाची कारवाई

LOGO-4-Online

लाकडाचा विनापरवाना साठा प्रकरण : दिनेश यादव/वाडा, दि. 2 : वाडा-मनोर महामार्गावरील ठाणगेपाडा येथे एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा साठा सापडल्यानंतर याप्रकरणी वनपालांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यास तेवढेच जबाबदार असलेल्या वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मनसेचे स्थानिक कार्यकर्ते देवेंद्र भानुशाली यांनी याबाबतचा पाठपुरावा करून नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांची वाडा येथे भेट ... Read More »

कुणालचा जगण्यासाठीचा संघर्ष चालूच, वडीलांचे मदतीचे आवाहन

KRUNAL MADAT1

राजतंत्र मिडीया/डहाणू दि. २ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या कुणाल प्रवीण मळेकर या २१ वर्षीय युवकाचा दिड वर्षानंतरही जगण्यासाठीचा संघर्ष चालूच आहे. वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये (मीरा रोड) त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तो आजतागायत बेशुद्धावस्थेतच आहे. त्याच्या मेंदुची कवटी निरीक्षणासाठी उघडी ठेवूनच त्याच्यावर उपचार चालू होते. आता कवटी बसविण्यात आल्यानंतर पुढील टप्प्यांचे उपचार ... Read More »

तीन महिन्यांपासुन पगार रखडले

BOMBAY REYON AANDOLAN

बॉम्बे रेयॉनच्या कामगारांचे कामबंद आंदोलन वैदेही वाढाण/बोईसर, दि. 02 : तारापूर एमआयडीसीमधील कापड बनवणार्‍या कारखान्यांमध्ये प्रसिध्द असलेल्या बॉम्बे रेयॉन या कारखान्यातील कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासुन वेतन न मिळाल्याने हतलब झालेल्या या कामगारांनी आज कारखान्यामध्ये कामबंद आंदोलन केले. विशेष म्हणजे रखडलेल्या पगारासाठी पुकारलेले या वर्षातले हे तिसरे आंदोलन असून कारखानदार मात्र नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.   बॉम्बे रेयॉन कारखान्यात ... Read More »

Scroll To Top