दिनांक 25 March 2019 वेळ 4:39 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » October (page 4)

Monthly Archives: October 2018

मुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन

राजतंत्र मिडीया/डहाणू दि. १४: अपघातात गंभीर जखमी झालेला मुलगा करण आणि दोन्ही किडण्या खराब झाल्याने डायलॅसिस वर असलेली पत्नी अंजना यांच्या उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर गेला असल्याने दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी असे आवाहन डहाणूतील देवा (देवेंद्र) भट्ट यांनी केले आहे. गोवा येथील हॉलीडे इन चा व्यवस्थापक असलेल्या २६ वर्षीय करणचा महिन्याभरापूर्वी अपघात होऊन त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. करणच्या ... Read More »

अखेर कुणालची जगण्यासाठीची लढाई संपली; काल बॉंबे हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

राजतंत्र मिडीया/डहाणू दि. १३ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा झालेल्या कुणाल प्रवीण मळेकर या २१ वर्षीय युवकाचा जगण्यासाठीचा संघर्ष अखेर संपला आहे. काल (१२ ऑक्टोबर) सायंकाळी ६.४५ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या लढाईत पाठीशी तन, मन आणि धनाने उभ्या राहिलेल्या डहाणूकरांचे प्रवीण मळेकर यांनी आभार मानले ... Read More »

वाड्यात 2 लाखांचा गुटखा पकडला

>> दोघांना अटक, वाडा पोलिसांची कारवाई प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : शहरातील खण्डेश्वरी नाका येथे पोलीसांनी अवैध गुटख्याची वाहतूक करणार्‍या टॅम्पोवर कारवाई करत 2 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. वाडा-मनोर रस्त्यावर अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. बी. बोराडे यांना ... Read More »

सफाळे-वरई रस्त्यावर दुचाकींच्या अपघातात तरुण ठार

राजतंत्र मीडिया/सफाळे, दि. 11 : सफाळे-वरई रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अक्षय भरत पाटील असे सदर तरुणाचे नाव असुन तांदुळवाडी घाटात हा अपघात घडला. गिराळे गावातील रहिवासी असलेला अक्षय बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सफाळ्याहून घरी परतत होता. मात्र सफाळे-वरई रस्त्यावरील तांदुळवाडी घाटातील नागमोडी वळणावर अक्षयच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीची जोरदार टक्कर ... Read More »

नागझरीत आणखी स्फोटक सामग्री जप्त

>> तब्बल 650 जिलेटीनच्या कांड्या व 62 बंडल डेटोनेटरचा समावेश प्रतिनिधी/मनोर, दि. 10 : पालघर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. 8) रात्री नागझरी गावातील एका घरातून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केला असतानाच मंगळवारी रात्री मनोर पालीसांनी याच गावातील काकड पाडा येथून आणखी स्फोटक सामग्री जप्त केली आहे. यात तब्बल 650 जिलेटीनच्या कांड्या व 62 बंडल इलेक्ट्रिक डेटोनेटरचा समावेश आहे. ... Read More »

नागझरीत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त

>> चिखले गावात 4 संशयित पाहिल्याची माहिती ठरली अफवा प्रतिनिधी/मनोर, दि. 9 : काल, सोमवारी समुद्रामार्गे डहाणू तालुक्यातील चिखले गावात 4 संशयित शिरल्याची अफवा समाज माध्यमांवर पसरत असतानाच मनोर नजीकच्या नागझरी येथे परवानाधारक स्फोटक पदार्थ विक्रेत्याने त्याच्या जुन्या घरात बेकायदेशीररित्या साठवलेले जिलेटीन आणि डेटोनेटरसारखी स्फोटक सामग्री पालघरच्या गुन्हे शाखेने जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. नागझरी येथे घरात बेकायदेशीरपणे जिलेटीनचा साठा ... Read More »

वाड्याच्या कन्येचे बॉईस 2 चित्रपटातुन मराठी सिनेविश्वात दमदार पदार्पण

>> चित्राच्या भूमिकेत झळकली सायली पाटील वाडा/कुडूस, दि. 7 : मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारुन सर्वांचे लक्ष वेधून घेणार्‍या वाडा तालुक्यातील चिंचघरपाडा (कुडूस) गावाची कन्या सायली पाटील हिने बॉईस 2 या चित्रपटातून मराठी सिनेविश्वात दमदार प्रवेश केला असून चित्रपटात चित्राच्या मुख्य भूमिकेत ती झळकली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या श्रावण क्विनपासून मॉडलिंगच्या जगतात प्रवेश केल्यानंतर तिने छोट्या पडद्यावरील गणपती बाप्पा मोरया या ... Read More »

माकुणसार येथे राज्यस्तरीय मिनी मॅरेथॉन संपन्न

RAJTANTRA MEDIA पालघर, दि. ७: पालघर जिल्हा अॅथलेटीक्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या माकुणसार स्पोर्टस् फाॅऊंडेशन च्या वतीने आज (रविवार, ७ ऑक्टोबर) पालघर तालुक्यातील माकुणसार येथे आयोजीत करण्यात आलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेत विक्रमगड, वाडा आणि जव्हार या ग्रामीण भागातील खेळाडूंचा विशेष दबदबा दिसून आला. ग्रामीण भागात मॅरेथॉन धावपटू घडवणे हे उद्दिष्ट ठेवून तसेच “पर्यावरण संरक्षण” ... Read More »

डहाणूचे सुपुत्र पद्मश्री नटवरभाई ठक्कर यांचे निधन

RAJTANTRA MEDIA डहाणू दि. ७: ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक पद्मश्री नटवरभाई ठक्कर यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात नागा ख्रिश्चन पत्नी पद्मश्री लेंटीना, २ मुली व १ मुलगा आहे. ते डहाणूचे सुपुत्र असून स्वर्गीय जसाभाई ठक्कर (दवावाले) यांचे सख्खे भाऊ तथा लॉयन्स क्लब ऑफ डहाणूचे अध्यक्ष जिग्नेश ठक्कर यांचे काका होत. नटवरभाई यांचा जन्म १९३२ ... Read More »

जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ

राजतंत्र मिडीया/डहाणू दि. ६ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या कुणाल प्रवीण मळेकर (डहाणू) या २१ वर्षीय युवकाच्या जगण्यासाठीच्या संघर्षाला बळ देण्यासाठी डहाणूतील महिला शक्ती पुढे सरसावली आहे. शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तीमत्व असलेल्या अनाहिता नजमी यांनी त्यासाठी पुढाकार घेत सोशल मिडीयाच्या माध्यमातून आव्हान केले. त्यांच्यासह काही महिलांच्या पुढाकाराने मदतफेरीचे आयोजन करण्यात आले ... Read More »

Scroll To Top