दिनांक 25 March 2019 वेळ 5:29 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » October (page 3)

Monthly Archives: October 2018

वाडा : शेतकर्‍यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

एकरी 30 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी प्रतिनिधी/वाडा, दि. 22 : परतीच्या पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र याकडे प्रशासन व शासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच पालघर जिल्ह्याच्या तालुकानिहाय दुष्काळग्रस्त यादीत वाडा तालुक्याचे नाव वगळण्यात आले आहे. याचा विरोध म्हणून व आपल्या इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज तहसीलदार कार्यालयावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ... Read More »

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात पळे बोरीपाडा शाळा प्रथम

डहाणू दि. २१: डॉ. ए. पि. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त डहाणू तालुक्यातील कासा-चारोटी येथील छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात १ ते ५ वी च्या गटात जिल्हा परिषदेच्या पळे बोरीपाडा शाळेने पहिला क्रमांक पटकावला. भिसे हायस्कूल दुसऱ्या क्रमांकावर तर ओम इंग्लिश स्कूल तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ६ ते ८ वी गटात भिसे हायस्कूल प्रथम, ... Read More »

शिक्षणाचे बाजारीकरण व बेरोजगारीविरोधात माकपचे मानवी साखळी आंदोलन

प्रतिनिधी/मनोर, दि. 21 : सरकारच्या शिक्षण व रोजगार विरोधी धोरणांचा निषेध म्हणून तसेच सत्ताधारी वर्गाला याची जाणीव करून देण्यासाठी माकपतर्फे आज विविध ठिकाणी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. त्यानुसार मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिल्हार येथे माकपच्या युवा विंग मार्फत मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. पोकळ घोषणाबाजी आणि जाहिरात बाजी करणार्‍या केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांमुळे रोजगार आणि शिक्षण विषयक समस्या ... Read More »

पोलीस हुतात्मा दिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

राजतंत्र मीडिया/पालघर, दि. 21 : लेह लडाख येथील हॉट स्प्रिंग भागात 20 ऑक्टोबर 1959 रोजी गस्तीकरिता गेलेले दोन कर्मचारी कॅम्पवर न परतल्याने दुसर्‍या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर 1959 रोजी सीआरपीएफ व आय.टी.बी.पी.चे 2 अधिकारी व 20 कर्मचार्‍यांचा समावेश असलेले पथक त्यांचा शोध घेण्याकरिता पाठविण्यात आले होते. यावेळी चीनी सैन्याकडुन या पथकावर बेछुट गोळीबार करण्यात आला होता. त्यात 10 जवान ठार ... Read More »

रोटरी क्लब ऑफ डहाणूच्या शानदार रास गरबा स्पर्धेला सुरुवात

डहाणू दि. २०: रोटरी क्लब ऑफ डहाणू आणि कंक्राडी सार्वजनिक उत्कर्ष मंडळातर्फे रास गरब्याच्या स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमासाठी डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राजेश पारेख, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिनेश बारी, कंक्राडी सार्वजनिक उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष भरत बारी, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. लॉयन्स क्लब ऑफ डहाणूच्या नारायण उद्यानावर आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी ... Read More »

सागरी अतिक्रमणाविरोधात पालघर जिल्ह्यातील मच्छीमार एकवटले

वार्ताहर/बोईसर, दि. 16 : मासेमारी करिता मच्छीमारांवर लादण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करून वसई तालुका व ठाणे जिल्ह्यातील मच्छिमार मासेमारी करत असल्याने याविरोधात पालघर जिल्ह्यातील मच्छिमार एकवटले आहेत. नियम मोडणार्‍या या मच्छिमारांवर शासन कोणतीही कारवाई करत नसल्याने अशा मच्छीमारांना स्वत:च रोखण्याचे यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीमध्ये ठरले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासुन धुमसत असलेला सागरी वाद पेटण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवड्यातच पालघरमधील वडराई, ... Read More »

आता शाळांमध्ये मिळणार नव्या-कोर्‍या वह्या

>> नमोआनंद स्टार्टअप कंपनीशी राज्य सरकारचा सामंजस्य करार RAJTANTRA MDEIA/मुंबई दि. 16: शाळेत जाणार्‍या मुलांसाठी आनंदाची बातमी असुन आता या मुलांना रद्दीच्या मोबदल्यात नव्या-कोर्‍या वह्या मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि नमोआनंद अपसायकलर्स यांच्यात सामंजस्य करार नुकताच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाला असून या सामंजस्य करारानुसार विद्यार्थ्यांना शाळेसाठी आवश्यक असणार्‍या वह्या मिळणार आहेत. रद्दीच्या मोबदल्यास नव्या कोर्‍या वह्या ही ... Read More »

वाड्यात दुष्काळाची झळ : शेतकर्‍याने स्वतःचे भातपिक पेटविले

>> पावसाअभावी भातपिक गेले करपून प्रतिनिधी/वाडा, दि. 15 : तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी यांच्या साडेतीन एकर जमिनीवरील भातपिक पाण्याअभावी पूर्णपणे करपूरन गेल्याने व शासनामार्फत नुकसान भरपाईसाठी कोणत्याही प्रकारचा पंचनामा न केला गेल्याने संतापलेल्या मोकाशी यांनी शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून स्वत:ची भातशेती पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यंदा तालुक्यात सुरवातीपासूनच चांगला पाऊस होता. त्यामुळे पेरणी व भातलागवडीची ... Read More »

ब्लॅकमेल करणार्‍याचा खून केला; आरोपी वाडा पोलिसांच्या जाळ्यात

प्रतिनिधी/वाडा, दि. 15 : आंतरजातीय लग्नाची माहिती लपविण्यासाठी सतत पैशांची मागणी करणार्‍या इसमाचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावायच्या प्रयत्नात असलेला आरोपी वाडा पोलीसांच्या जाळ्यात अडकल्याने खुनाचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मदनलाल सावक (वय 28) असे सदर आरोपीचे नाव असुन यात त्याला मदत करणारा त्याचा भाऊ श्रवण सावक (वय 19) यालाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मदनलाल सावक व श्रवण ... Read More »

बोईसर येथे दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : ओत्सवाल येथील एका कार्यालयात काम करणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कार्यालयात घुसून चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली असुन या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. तर हल्ला करणार्‍या इसमाला येथील नागरीकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ओत्सवाल येथील मुख्य बाजारपेठ भागात पहिल्या मजल्यावर निधी एन्टरप्राईजेस नामक मनीट्रान्सफर केंद्र आहे. येथेे धोडीपुजा ... Read More »

Scroll To Top