दिनांक 25 March 2019 वेळ 4:54 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » October (page 2)

Monthly Archives: October 2018

प्राध्यापक रोमिओ मस्कारेन्हास यांना डॉक्टरेट पदवी

राजतंत्र मीडिया/डहाणू दि. २५ : येथील सौ. सीताबाई रामचंद्र करंदीकर महाविद्यालयाचे प्राध्यापक रोमिओ मस्कारेन्हास यांना बीझनेस पॉलिसी ॲन्ड ॲडमिनिस्ट्रेशन या विषयावरील प्रबंधाबद्दल मुंबई विद्यापीठाने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph. D.) पदवी दिली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ. रोमिओ हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असे प्राध्यापक आहेत. त्यांची कॉमर्सच्या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत ५० पेक्षा जास्त पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर शिक्षण ... Read More »

खासदार गावित यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची आढावा बैठक संपन्न!

केंद्र पुरस्कृत योजनांचा घेतला आढावा राजतंत्र मीडिया/पालघर, दि. 25 : पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी जनतेला केंद्रस्थानी ठेऊन उपाययोजना राबवाव्यात, असे प्रतिपादन खासदार राजेंद्र गावित यांनी केले. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत ते बोलत होते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती अधिक्रमित करून जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) ... Read More »

वाडा : शेतकर्‍यांपुढे आता विद्युत बिलांचे संकट

प्रतिनिधी/वाडा, दि. 25 : तालुक्यात गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने दगा दिल्याने हलवार भातपिकांसह मोठ्या प्रमाणात गरवी भातपिकेही करपुन गेली आहेत. त्यामुळे दुष्काळ परिस्थितीचा सामना करणारे येथील शेतकरी काहीप्रमाणात असलेली भातपिके मोटरपंपाच्या साहाय्याने वाचविण्याचा प्रयत्न करत असताना आता विद्युत महावितरण कंपनीने मागील दोन वर्षांचे थकित वीज बिल पाठवून शेतकर्‍यांच्यापुढे मोठे संकट निर्माण केले आहे. विद्युत महावितरण कंपनीकडून शेतकर्‍यांना कृषीपंपाचे गेल्या दोन ... Read More »

कोजागिरी निमित्त डहाणूत बहु भाषीय काव्य संमेलनाचे यशस्वी आयोजन

प्रतिनिधी/डहाणू, दि. 24 : रोटरी क्लब ऑफ डहाणू व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या डहाणू शाखेतर्फे कोजागिरी पौर्णिमे निमित्त पारनाका येथील सुरूच्या बागेत नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात बहु भाषिक व बोली भाषेत काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डहाणू वनपरिक्षेत्र अधिकारी राहूल मराठे, प्रमुख पाहुणे म्हणून कोमसापचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रविण दवणे उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ ... Read More »

आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

>>पालघर आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरणार -डॉ. सावंत वार्ताहर/बोईसर, दि. 24 : पालघर तालुक्यातील सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे आज, बुधवारी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या भागातील स्त्री रोग तज्ञांची कमतरता लक्षात घेता जिल्हा स्तरावर भरतीचे आदेश देण्यात आले असुन लवकरात लवकर रिक्त पदे भरली जातील, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. ... Read More »

जव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित

प्रतिनिधी/जव्हार, दि. 23 : नैसर्गिक आपत्तीत घराचे नुकसान झालेल्या येथील एका आदिवासी कुटूंबाला मागील चार महिन्यांपासून अनेक वेळा तहसील कार्यालयात हेलपाटे मारुनही नुकसान भरपाई दिली जात नसल्याने कुटुंब हवालदिल झालं आहे. यावर्षी जून महिन्याच्या सुरवातीला झालेल्या वादळी पावसात तालुक्यातील कोगदा गावातील भरत सावंजी धमोडा यांच्या घरावरील संपूर्ण छप्पर उडाले होते. यात घराचे मोठे नुकसान झाल्याने धमोडा यांचा संसार उघड्यावर आला ... Read More »

वाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!

प्रतिनिधी/वाडा, दि. 23 : तालुक्यातील पूर्व विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह अनेक कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तालुकाप्रमुख उमेश पठारे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गणपत दोडे, ओगदा ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर राथड, उपसरपंच देवराम दोरे यांच्यासह इतर पाच ग्रामपंचायत सदस्यांनी, मांडवा व कासघर येथील संतोष ... Read More »

शिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम

पी. जे. हायस्कूल मुख्याध्यापकपदाचा वाद स्वाक्षरी अधिकार देतानाही सेवाज्येष्ठता डावलली प्रतिनिधी/वाडा, दि. 21 : दि वाडा एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकार्‍यांच्या भोंगळ कारभारामुळे गणेशोत्सव व दसर्‍यासारखे महत्वाचे सण वेतनाविना साजरे करण्याचा प्रसंग ओढवलेल्या येथील पी. जे. हायस्कूलमधील शिक्षकांवर येणारी दिवाळीही वेतनाशिवाय साजरी करावी लागणार असल्याचे चित्र दिसू लागल्याने गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेली शिक्षकांची आर्थिक कोंडी कायम आहे. 31 मे 2018 रोजी ... Read More »

महावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट

राजतंत्र मीडिया/दि. 22 : महावितरणतर्फे सुरु करण्यात आलेले भारनियमन आणि विजेचा लपंडाव यासह विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिक्षक अभियंता सौ. किरण नागावकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश शहा व वसंत चव्हाण, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, आमदार अमित घोडा, पालघर पंचायत समितीच्या सभापती मनिषा पिंगळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने ... Read More »

कासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला

राजतंत्र मीडिया/डहाणू, दि. 22 : गुजरात राज्यातून महाराष्ट्रात बेकायदा विक्रीसाठी आणला जात असलेला तब्बल 1 कोटी 6 लाख रुपये किंमतीचा गुटखा अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी पकडला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा हद्दीतील घोळ टोलनाक्यावर शुक्रवारी (दि. 19) ही कारवाई करण्यात आली. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महामार्गावरील घोळ टोलनाक्यावर अन्न सुरक्षा अधिकार्‍यांकडून वाहनांची तपासणी सुरु असताना संशयित तीन टेम्पाची तपासणी केली असता ... Read More »

Scroll To Top