दिनांक 17 February 2020 वेळ 11:46 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » October

Monthly Archives: October 2018

डहाणू : शुभम, नवघरे आणि दिनेश ज्वेलर्सवर आयकर विभागाचा ससेमिरा

RAJTANTRA MEDIA/डहाणू दि. ३०: येथील आघाडीच्या ३ सुवर्णकारांची आयकर विभागाने स्वतंत्र पथके धाडून छाननी सुरु केली आहे. यामध्ये डहाणू व परिसरात सर्वप्रथम सोने चांदीची शुद्धता पडताळणी करणारे मशिन आणून या व्यवसायातील गणिते बदलणारे शुभम ज्वेलर्स (मेन रोड), डहाणूतील सर्वात मोठे ज्वेलरीचे दुकान नवघरे ज्वेलर्स (मेन रोड) आणि दिनेश ज्वेलर्स (इराणी रोड) यांचा समावेश आहे. काल रात्री उशीरा या दुकानांवर आयकर ... Read More »

रेशनकार्डासाठी नागरिकांची ससेहोलपोट

>> वाडा पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार  प्रतिनिधी/वाडा, दि. 29 : वाडा पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिकांना रेशनकार्डासाठी वारंवार इतर कामधंदे सोडून कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत असून पुरवठा विभागाच्या कारभारात लवकरात लवकर सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे. वाडा तहसीलदार कार्यालया अंतर्गत पुरवठा शाखा असून या शाखेमार्फत रेशनकार्ड संदर्भातील कामे केली जातात. नविन रेशनकार्ड काढणे, ... Read More »

मोखाडा तालुक्यातील शेकडो मजूर विस्थापनाच्या वाटेवर

>> रोहयो यंत्रणांची दिरंगाई   >> शास्वत रोजगाराची टंचाई प्रतिनिधी/मोखाडा, दि. 29 : मोखाडा तालुक्यात दरवर्षी रोजगारा अभावी मोठ्या प्रमाणावर मजूरांचे स्थलांतर होत असते. पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर बहूतांश महिने येथील बहूसंख्य मजूर रोजगाराच्या शोधार्थ इतरत्रच भटकत असतो. चालू वर्षीही तालुक्यातील 50 टक्के मजूर विस्थापणाच्या वाटेवर आहेत. तथापी 365 दिवस रोजगाराची हमी देणार्‍या यंत्रणा मात्र आजही सुस्त असल्याचे चित्र आहे. त्यामूळे ... Read More »

डहाणूत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Rajtantra Media/डहाणू दि. २९: विजेचे भार नियमन बंद करा, रेशन धान्य ऑफलाइन पद्धतीने द्या, सुका दुष्काळ जाहीर करा, बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करा या व अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विधानपरिषद सदस्य आनंद ठाकूर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, तालुका अध्यक्ष काशिनाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने लोक सामील झाले होते. ... Read More »

डहाणूतील रक्तपेढी एक पाऊल पुढे; नालासोपारा येथे अद्ययावत रक्तपेढी सुरु!

Rajtantra Media/डहाणू दि. २८: येथील साथिया ट्रस्ट संचलित डी. के. छेडा रक्तपेढीच्या डहाणूतील १५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर आता नालासोपारा येथे अद्ययावत रक्तपेढी सुरु करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते या रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार क्षितिज ठाकूर, साथियाचे चेअरमन विजय महाजन, स्नेहांजली शोरुम्सचे मॅनेजिंग डायरेक्ट कनैयालाल मुलचंदानी, डी. के. छेडा रक्तपेढीचे संचालक महेशभाई ... Read More »

दांडेकर महाविद्यालयात आयोजित अभिरूप न्यायालयात रंगले युक्तीवाद

वार्ताहर/बोईसर, दि. 28 : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या विधी महाविद्यालयात ज्येष्ठ सरकारी वकील अ‍ॅड. दत्तरंगे व विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा यांच्या मार्गदर्शनाखाली अभिरूप न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी फौजदारी प्रकरणावर विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच युक्तीवाद पहायला मिळाला. दांडेकर महाविद्यालयात विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकरिता सरावासाठी प्रथमच अशा अभिरूप न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात एक फौजदारी प्रकरण घेऊन त्यावर प्रारंभापासून ... Read More »

वांगणी आश्रम शाळेत फुलली परसबाग

प्रतिनिधी/जव्हार, दि. 28 : जव्हार आदिवासी प्रकल्पातील अतिदुर्गम डोंगर भागात वसलेल्या वांगणी आश्रम शाळेतील विद्यार्थी व कर्माचार्‍यांनी आश्रम शाळेच्या परिसरातील मोकळ्या जागेत परस बाग फुलवली आहे. या बागेत भाजीपाला लागवड करण्यात आला असून या भाज्या मुलांना पौष्टीक आहार म्हणून दिल्या जाणार आहेत. दरम्यान, या प्रयोगाने शाळेचा चेहरामोहरा बदलला असुन तालुक्यासह आदिवासी विकास प्रकल्पात हा चर्चेचा विषय बनला आहे. 1 ली ते ... Read More »

शालेय पोषण आहारात घपला, डोल्हारा शाळेचे मुख्याध्यापक निलंबित

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची कारवाई व्यवस्थापण समितीने केली होती तक्रार प्रतिनिधी/मोखाडा, दि. 28 : तालुक्यातील डोल्हारा जिल्हा परिषद केंद्र शाळेत 28 ऑगस्ट 2018 रोजी करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पुरवठ्यात 250 किलो तांदूळ कमी आढळून आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेऊन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर यांनी मुख्याध्यापक राजेश सुधाकर गवई यांना निलंबीत केले आहे. ... Read More »

कोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांनी केली सूर्या तीर कालव्याची पाहणी

वार्ताहर/बोईसर, दि. 28 : पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पांतर्गत शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या सूर्या उजवा तीर कालव्याची काल, शनिवारी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी कालव्यांच्या आवश्यक त्या ठिकाणी लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. सुर्या उजवा तिर कालव्यामधून डहाणू व पालघर तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी सिंचनाची सोय होते. मात्र शेतापर्यंत पोहचणार्‍या कनॉलच्या दुरावस्थेमुळे अनेक शेतकरी ... Read More »

पश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे डहाणूरोड स्थानकात शुकशुकाट

प्रतिनिधी/डहाणू, दि. 28 : पश्चिम रेल्वेच्या सफाळा स्टेशनवर न्यू इलेक्ट्रोनिक इंटरलॉकिंगच्या कामानिमित्त आज, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील काही लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकलच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गुजरातकडून येणार्‍या काही गाड्या पालघर आणि डहाणूपर्यंतच सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे डहाणू रोड रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट दिसुन ... Read More »

Scroll To Top