दिनांक 26 May 2020 वेळ 9:41 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » September

Monthly Archives: September 2018

वाडा : दुचाकी अपघातात 1 ठार

प्रतिनिधी/वाडा, दि. 30 : भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावर काल शनिवारी दुचाकीला झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला असुन प्रभाकर पाटील असे सदर इसमाचे नाव आहे. शनिवार रात्री आठ वाजताच्या सुमारास महामार्गावरील पाहुनीपाडा ते नेहरोली दरम्यान हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर पाटील यांच्या दुचाकीने त्यांच्या पुढे चाललेल्या अज्ञात वाहनाला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल ... Read More »

पोषण अभियानांतर्गत उत्कृष्ट अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका व आशा स्वयंसेविकांचा सन्मान

राजतंत्र मीडिया/पालघर, दि. 27 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या पोषण अभियानांतर्गत उत्कृष्ट अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका व आशा स्वयंसेविकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. बालकांच्या बौद्धिक, शारिरिक आणि सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेले पोषण अभियान जिल्ह्यात मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्यसेविका ... Read More »

जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांचे होणार स्वच्छता सर्वेक्षण

ग्रामीण भागातील शासकीय विहिरी, हातपंप, नळयोजनांचे होणार सर्वेक्षण राजतंत्र मीडिया/पालघर, दि. 27 : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित, मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच दुषित पाण्यामुळे होणार्‍या रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवले जावे यासाठी पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे वर्षातून दोन वेळा सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार 1 ऑक्टोबर ... Read More »

कास पठारावर गवसलेले बालपण

या सहलीत सामील झालो नसतो तर ती चूक ठरली असती असे प्रत्येकाला वाटले. ही सहल म्हणजे एक मेडीटेशनच होते. जे सहलीत आले नाहीत त्यांनाही ते न आल्याची रुखरुख नक्कीच वाटेल. सर्गसौंदर्याने नटलेल्या, मिनी माथेरान म्हणून ओळख असलेल्या जव्हार मध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. जव्हार मध्ये एसएससी पर्यंतचे शिक्षण घेणारे आम्ही तीस-पस्तीस मित्र-मैत्रिणी एकमेकांच्या संपर्कात असतो. यातले काहीजण अजून परस्परांना भेटू ... Read More »

दांडेकर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा दोन छात्रांची थल सेना कॅम्पसाठी निवड

राजतंत्र न्यूज नेटवर्क पालघर, दि. 26 : सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या 8 महाराष्ट्र गर्ल्स व 3 महाराष्ट्र बॉईज बटालिअन अंतर्गत येणार्‍या गर्ल्स व बॉईज एन.सी.सी. युनिट्समधून अनुक्रमे सार्जंट तन्वी अरूण पाटील व सार्जंट पारस दिगंबर पवार या दोन छात्रांची दिल्ली येथे होत असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा थल सेना कॅम्प (टी.एस्.सी.) साठी निवड झाली आहे. रिपब्लिक डे कॅम्पच्या धर्तीवर सातत्यपूर्ण निवड प्रक्रियेतून ... Read More »

सातपाटी पोलीसांकडुन गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त

राजतंत्र न्यूज नेटवर्क पालघर, दि. 26 : काल, मंगळवारी सातपाटी पोलीसांनी नांदगाव मराळे येथील झुडपात उभारण्यात आलेल्या झोपड्यावर छापा मारुन गावठी हातभट्टीची दारु व ही दारु बनविण्यासाठी लागणारी साधने असा एकुण 3 लाख 59 हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. तसेच हा अड्डा चालवणार्‍या इसमाविरोधात सातपाटी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (क)(फ)(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात ... Read More »

पालघरच्या तहसीलदारांची दगड खाणींवर कारवाईची नोटीस

प्रतिनिधी/मनोर, दि. 25 : मनोर नजीकच्या लालोंढे तलाठी सजा हद्दीतील तीन दगड खाण धारकांना ग्रामस्थांची तक्रार आणि अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंडनीय कारवाईसाठी पालघरच्या तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. लालोंढे गावातील तीन दगड खाणींबाबत स्थानिक रहिवाशांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. खाणीत केल्या जाणार्‍या स्फोटांमुळे घराला हादरे बसणे, भिंतींना तडे जाणे, खाणीतील दगड घरावरील पत्र्यावर पडून पत्रे ... Read More »

वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेची मागणी

> कडक उन्हामुळे भातपिके करपू लागली, शेतकरी चिंतातूर प्रतिनिधी/वाडा, दि. 25 : गेल्या महिनाभर पावसाने दडी मारल्याने व कडक उन्हामुळे तालुक्यात सर्वत्र भातपिके करपू लागली आहेत. शेतातील उभे भातपीक पाण्याअभावी तडफडून मरु लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने एका निवेदनाद्वारे वाडा तहसीलदार दिनेश कुर्‍हाडे यांच्याकडे केली आहे. वाडा तालुक्यात 18 हजार हेक्टर ... Read More »

सर्पदंशाने आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू

प्रतिनिधी/मनोर, दि. 25 : चिल्हार बोईसर मार्गावरील खुटलच्या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा आज, मंगळवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. करण राजाराम मंडळ (8 वर्षे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. खुटल गाव ते खुलात पाडा असा रस्ता नसल्याने येथे पायवाटेने जावे लागते. सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यावर खुटलवरून खुलातपाड्याकडे परतत असताना पायवाटेवर करणला विषारी सापाने दंश केला होता. त्यानंतर करणला ... Read More »

डहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन

RAJTANTRA MEDIA डहाणू दि. २४: आज पालघर जिल्हा पोलीसांनी हॉटेल पिंक लेक मध्ये छापा मारुन अटक केलेल्या आरोपींमध्ये रामवाडी मित्र मंडळाचा अध्यक्ष शेखर सहामते याला अटक झाल्यामुळे या जुगाराच्या अड्ड्याचा संबंध रामवाडी मित्र मंडळाशी जोडला गेला आहे. सहामते हा डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांचा निकटवर्तीय असून राजपूत यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या रामवाडी मित्र मंडळाचा तो डमी अध्यक्ष आहे. या मंडळाच्या ... Read More »

Scroll To Top