दिनांक 11 December 2018 वेळ 12:01 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » August » 02

Daily Archives: 02/08/2018

ट्रेलरच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

LOGO-4-Online

प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : कंचाड फाटा येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रेलरने दिलेल्या धडकेत 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रबीर घोष असे सदर तरुणाचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास खुपरी येथून प्रबीर घोष व सुरेश थापा हे दोघे कंचाड फाटा येथे भाजी आणण्यासाठी जात असताना वाड्याहून भिवंडीच्या दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या एच.आर. 55/ ए.बी. 0194 या क्रमांकाच्या ट्रेलरने प्रबीर ... Read More »

बोईसरमध्ये डेंग्यूचा बळी!

BOISAR DENGUE

>> 24 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू प्रतिनिधी/बोईसर, दि. 2 : शहरातील एका 24 वर्षीय तरुणाचा डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाला आहे. रमेश तिवार असे सदर तरुणाचे नाव असुन शहरात डेंग्यूचा शिरकाव झाल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे . मिळालेल्या माहितीनुसार, मुळ नेपाळी असणारा रमेश तिवार हा तरुण एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. अचानक आजारी पडलेला रमेश बोईसर ... Read More »

जय महाराष्ट्र कार्यक्रमात पालकमंत्री सवरा व जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे

JAY MAHARASHTRA

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा आणि पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत ... Read More »

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वाड्यात धरणे आंदोलन

WADA MARATHA AANODALN

वाडा/प्रतिनिधी, दि. 2 : मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात विविध माध्यमातून आंदोलने सुरु आहेत. या पार्श्‍वभुमीवर आता तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या रविवारी (5 ऑगस्ट) धरणे आंदोलन व रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाडा तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक सद्यस्थिती अतिशय बिकट आहे. त्याचबरोबर आरक्षण नसल्यामुळे या समाजामध्ये उच्च शिक्षित ... Read More »

फेक न्यूज : परिणाम आणि दक्षता या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न

FAKE NEWS KARYASHALA

राजतंत्र न्युज नेटवर्क             पालघर, दि. ०१ : काही समाजकंटकांकडून जाणूनबुजून फेक न्यूज पसरवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन अशा फेक न्युजमुळे मागील काही महिन्यांत देशभरात जमावाने मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या. यात अनेक निष्पाप लोकांना जिव देखील गमवावा लागला. या फेक न्यूज थांबवण्यासाठी विविध स्तरावर पावले उचलली जात असताना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने तसेच ... Read More »

जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण शून्यावर आणणार जिल्ह्याच्या चौथ्या वर्धापन दिनी पालकमंत्री सवरांचे प्रतिपादन

JILHA VARDHAPAN DIN

राजतंत्र न्युज नेटवर्क          पालघर, दि. ०१ : जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी चार वर्षात शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच परिणाम म्हणून कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. तथापि यावर आम्ही समाधानी नसून कुपोषणाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले. पालघर जिल्ह्याचा चौथा वर्धापन ... Read More »

पालघर : एसटीला अपघात, 45 प्रवाशी जखमी

SAFALE ACCIDENT

राजतंत्र न्यूज नेटवर्क          सफाळे, दि. ०१ : सफाळेजवळ आज, बुधवारी सकाळी राज्य परिवहन महामंडळाची बस उलटून झालेल्या अपघातात ४५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. एम.एच.२०/डी. ९७०७ या क्रमांकाची टेंभीखोडावे-सफाळे ही बस आज सकाळी ७.३० च्या सुमारास मांजुर्ली येथे आली असता अचानक रस्त्यावरील मातीच्या राशीवरुन पलटी झाली. यावेळी सुमारे ७० ते ७५ प्रवाशी बसमधुन प्रवास करीत होते. ... Read More »

वाडा पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

WADA AAROGYA SHIBIR

राजतंत्र न्युज नेटवर्क वाडा, दि.०१ : समाजासाठी दिवस रात्र कर्तव्य बजावणार्‍या पोलिस बांधवांसाठी समता विद्याविहार समितीच्या वतीने वाडा पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सतत बंदोबस्त, दिवस पाळी, रात्र पाळी, मोर्चे, सभा, संमेलन, सार्वजनिक उत्सव, मिरवणूका आदी महत्त्वाच्या प्रसंगी कुटुंब व स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देवू न शकणार्‍या पोलिस बांधवासाठी समता विद्याविहार समितीच्या वतीने बुधवारी (दि.१) आयोजित केलेल्या या ... Read More »

दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

WADA AAG

प्रतिनिधी वाडा, दि. ०१ : वाडा बस स्थानकासमोर असलेल्या एका दुकानाला रात्री आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रेमचंद गंधे यांचे कोल्ड ड्रिंक व बिस्किट, साबण इत्यादी किरकोळ वस्तू विक्रीचे छोटेसे दुकान असून सोमवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक या दुकानाला आग लागली. यावेळी दुकानाचे शटर बंद असल्याने व आतून आगीचा भडका उडाल्याने शटर उघडून आग विझवणे जिकिरीचे झाले होते. ... Read More »

Scroll To Top