दिनांक 21 May 2019 वेळ 1:05 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » August

Monthly Archives: August 2018

युवासेनेमार्फत मनोर येथे आरोग्य शिबीर संपन्न

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची शिबीरास हजेरी मनोर, दि. 30 (नाविद शेख)  : मनोर नजीकच्या खुटल शासकीय आश्रमशाळेत शिवसेना युवा सेना व युवा सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज, शुक्रवारी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरें यांनी हजेरी लावली. परिसरातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि स्थानिक रुग्णांचा शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. सुमारे 950 विद्यार्थी आणि 200 रुग्णांनी या ... Read More »

मनोर : अनधिकृत रेती वाहतुकीवर कारवाई

मनोर, दि. 30 (नाविद शेख) : मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील वरई गावच्या हद्दीत अनधिकृत रेती वाहतूक करणारे चार ट्रक गुरुवारी पहाटे (ता.30) महसूल विभागाने धडक कारवाई करत जप्त केले. त्यांच्याकडून 4 लाख 75 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनोरचे मंडळ अधिकारी वसंत बारवे, बोईसर मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे आणि तलाठी नितीन सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सफाळे पोलीस ... Read More »

डोल्हारा केंद्रशाळेच्या मुख्याध्यापकांकडून शालेय पोषण आहारात घपला

> अडीच क्विंटल तांदळाचा अपहार > अध्यक्षांनी केला काळाबाजार उघड > मुख्याध्यापकार्ंींी कारवाईची मागणी > शालेय व्यवस्थापन समितीची तक्रार मोखाडा, दि. 31 ( दीपक गायकवाड) : विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी व शिक्षणाची गोडी लागावी म्हणून केंद्र व राज्य सरकारकडून देशभरात शालेय पोषण आहार ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. परंतू दस्तूरखुद्द शाळांकडूनच या योजनेत अपहार होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. असाच प्रकार मोखाडा ... Read More »

कुडूस : कंपनीतील सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कुडूस/प्रतिनिधी : कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील धोडीया कंपनीतून प्रदुषित सांडपाणी सार्वजनिक नाल्यात सोडल्याचा प्रकार उघडकीस आला असुन या सांडपाण्याचा परिसरातील पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होऊन शेती व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) या पक्षाने तहसीलदार राणा यांना देऊन कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. धोडीया कंपनीत धाग्याच्या उत्पादना बरोबरच रासायनिक पावडरचे उत्पादन घेतले जाते. ... Read More »

जिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

पालघर/वार्ताहर : विद्यादानाच्या माध्यमातून समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणार्‍या शिक्षकांचा सन्मान म्हणून शिक्षण विभागातर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. 2017-18 या वर्षाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सरकारने शालेय शिक्षण व क्रीडा विभागस्तरावर 108 शिक्षकांची निवड केली असुन यात पालघर जिल्ह्यातील 4 शिक्षकांचा समावेश आहे. विविध गटात दिल्या जाणार्‍या या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता प्राथमिक शिक्षक गटातून सफाळ्यातील ... Read More »

डहाणूत पिसाळलेल्या कुत्रीची दहशत

दैनिक राजतंत्र अपडेट्स डहाणू दि. २८: डहाणू शहरातील एक भटकी कुत्री पिसाळलेली असून तीच्यापासून नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. या कुत्रीचा वावर विद्युतनगर ते वडकून परिसरात असून ही बातमी लिहिली जात असताना ती वडकूनमधील आनंद विला सोसायटीच्या परिसरात फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. लोकांनी स्वतःची आणि मुलांची काळजी घेणे गरजेचे ठरले आहे. कुत्रीचा बंदोबस्त करण्यासाठी काही नागरिकांनी नगरपालिकेकडे संपर्क साधला ... Read More »

रिलायन्सच्या कारभाराविरुद्ध शेतकरी संतप्त

गॅस पाईपलाईन उखडण्याचे केले आंदोलन  वाडा, दि. 28 : तालुक्यातून 2007 साली रिलायन्स कंपनीची गॅस पाईपलाईन गेली असुन या पाईपलाईनजवळील शेतांची अद्यापही कंपनीने दुरूस्ती केलेली नाही. त्यामुळे या जागेत शेतकर्‍यांना उत्पन्न घेता येत नसल्याने त्यांचे नुकसान होत असुन यासंदर्भात वारंवार कंपनीकडे पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आज बिलावली येथे पाईपलाईन उखडण्याचे आंदोलन केले. मात्र प्रशासनाने त्यात ... Read More »

वसई पंचायत समितीच्या अधिकार्‍याला अडीच लाखांची लाच घेताना अटक

वसई, दि. 28 : शाळेच्या दर्जावाढीला मान्यता मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती 5 लाखांची मागणी करणार्‍या वसई पंचायत समिती शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकार्‍याला पहिला हफ्ता म्हणून 2 लाख 50 हजारांची लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. बिजेश बाकेलाल गुप्ता (वय 52) असे या लाचखोर अधिकार्‍याचे नाव असुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे युनिटने ही कारवाई केली. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगावमधील सेव्हन ... Read More »

बोईसर : एका रात्रीत चार दुकाने फोडली

बोईसर/वार्ताहर (दि. 28) : अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत येथील शॉपिंग सेंटर म्हणून ओळखल्या जाणार्‍या चित्रालय भागातील 4 दुकाने फोडून अंदाजे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. यात जगतभारती साप्ताहिकाच्या कार्यालयाचाही समावेश असुन येथील सीसीटिव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहे. या चोरट्यांनी जगतभराती या साप्ताहिकाच्या कार्यालयामध्ये रात्री 2.30 च्या सुमारास प्रवेश करुन लॅपटॉप लंपास केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. तर ... Read More »

पेसाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न!

पालघर, दि. 28 : जिल्ह्यात आदर्श पेसा गाव निर्मितीसाठी सर्व तालुकास्तरीय अधिकारी, ग्रामसेवक आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वय साधून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पंचायत क्षेत्र विस्तार कायदा 1996 (पेसा) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित कार्यशाळेत केले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी ... Read More »

Scroll To Top