दिनांक 17 July 2019 वेळ 3:49 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » July » 22

Daily Archives: 22/07/2018

डहाणूच्या समुद्र किनारी शेकडो किलो प्लास्टिकचा कचरा

राजतंत्र मीडिया /दि. 22 : काही दिवसांपुर्वीच राज्य शासनातर्फे प्लास्टिक व थर्माकॉलवर बंदी घालण्यात आली. या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिला तर अनेकांनी नाराजी दर्शवली. मात्र मागील काही दिवसांत समुद्राला आलेल्या उधाणातून समुद्राच्या पोटात जमा झालेला लाखो टन कचरा राज्याच्या विविध समुद्र किनार्‍यावर फेकला गेला असुन यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्यांचा समावेश आहे. डहाणू समुद्र किनार्‍यावरही हीच परिस्थिती असुन 19 जुलै ... Read More »

डहाणू नगरपरिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली

नगराध्यक्ष भरत राजपूत भडकले; जगदीश राजपूत यांनी खूर्ची उगारली! राजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू दि. 22: डहाणू नगरपरिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणावाची पातळी वाढली असून काल (21) झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगराध्यक्ष भरत राजपूत यांचा संयम सुटला व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर आवाज चढवला. त्याच्या एक पाऊल पुढे जात नगराध्यक्षांचे बंधू जगदीश राजपूत यांनी आक्रमक होत विरोधकांवर खुर्ची उचलून फेकण्याचा पवित्रा ... Read More »

जव्हार : मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र अचानक बंद

>> शेकडो विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान, >>अभ्यास केंद्र सुरु करण्याची जव्हारकरांची मागणी मनोज कामडी/जव्हार, दि. 22 : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जव्हार महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र अचानक बंद केल्याने या केंद्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तालुक्यात केवळ एकच कनिष्ठ महाविद्यालय असल्याने येथील विद्यार्थ्यांना आता तलासरी किंवा पालघर केंद्रात प्रवेश घ्यावा लागणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ... Read More »

पालघर, डहाणू व तलासरी तालुक्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस

राजतंत्र मिडिया, दि. 22 : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि तलासरी या 3 तालुक्यांमध्ये चालू वर्षी सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला आहे. तर अन्य सर्वच तालुक्यांनी सरासरी केव्हाच ओलांडली आहे. आजपर्यंत सर्व तालुक्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसामध्ये दरवर्षीचे सरासरी पर्जन्यमान दर्शवले आहे. 1) पालघर – 201 सेमी (95 सेमी) 212 टक्के. 2) डहाणू – 195 सेमी (97 सेमी) 201 टक्के. 3) ... Read More »

पालघर पोलीसांची अवैध दारु धंद्यांवर कारवाई

97 हजाराची दारु जप्त, 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल राजतंत्र मीडिया/दि. 26 : पालघर जिल्हा पोलीसांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध दारु धंद्यांवर कारवाई करत एकुण 96 हजार 805 रुपये किंमतीची दारु जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी 25 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अर्नाळा, जव्हार, कासा, केळवा, बोईसर, पालघर, मनोर, सफाळा, तारापुर, सातपाटी, विक्रमगड, वालीव, घोलवड, तलासरी, तुळींज, वाणगांव आदी ... Read More »

मनोरमध्ये रानभाजी महोत्सव संपन्न!

प्रदर्शनात 65 प्रकारच्या रानभाज्या, फळे आणि औषधी वनस्पतींचा समावेश नावीद शेख/मनोर, दि. 21 : आदिवासी एकता मित्र मंडळामार्फत मनोरच्या शंकर मंदिर सभागृहामध्ये शनिवारी (दि.21) रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 65 प्रकारच्या रानभाज्या, रान फळे आणि औषधी वनस्पती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल आहे. येथील आदिवासी समाजाची वस्ती जंगल, डोंगर, दर्‍या-खोर्‍या§मध्ये आहे. पावसाळ्यात या जंगलात ... Read More »

Scroll To Top