दिनांक 17 February 2020 वेळ 11:45 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » July » 20

Daily Archives: 20/07/2018

वाड्यात मनसेचे अनोखे आंदोलन खड्यांना दिली लोकप्रतिनिधीची नावे 

प्रतिनिधी              वाडा, दि. २०: तालुक्यातील बहुतांशी रस्ते  खड्ड्यात गेले असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. मात्र प्रशासन तसेच तालुक्यातील मंत्री, आमदार,खासदार याची दखल घेत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांवरील खड्यांना मंत्री, खासदार व आमदार यांची नावे देण्याचे अनोखे आंदोलन आज  वाडा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून छेडण्यात आले.             भिवंडी – ... Read More »

मोखाड्यातील 21 शाळांच्या इमारती पाडण्याचा प्रस्ताव मंजूर

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 20 : मोखाडा तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याच्या प्रस्तावाला पालघर जिल्हा परिषदेकडून तत्वतः मंजूरी देण्यात आलेली आहे. शेलमपाडा येथील दोन वर्ग खोल्या मंगळवारी रात्री अतिवृष्टीमुळे जमीनदोस्त झाल्यानंतर इतर शाळांच्या धोकादायक इमारती पाडण्याच्या प्रस्तावाला चालना मिळाली आहे. तालुक्यातील 38 शाळागृहे धोकादायक असून कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषदेच्या मोखाडा बांधकाम उप विभाग आणि ... Read More »

प्रवेशाचे आमिष देणार्‍यांपासुन सावध रहा

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे आवाहन राजतंत्र मीडिया/पालघर, दि. 20 : सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे आश्वासन देऊन विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून पैसे उकळविणार्‍या व्यक्तींपासून सावध रहावे, असे आवाहन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमाबरोबरच विविध प्रकारचे सहशैक्षणिक व शिक्षणेत्तर ... Read More »

माजी सैनिकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

राजतंत्र न्युज नेटवर्क             पालघर, दि. १९ : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा आणि युद्ध विधवा यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली आज, गुरुवारी, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यानी माजी सानिकाच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या समस्यां सोडविण्याबाबत आश्वासन दिले. यावेळी ११ कुटुंबांनी आपल्या समस्यांबाबतचे अर्ज दाखल केले.     ... Read More »

कासा : १० लाखांचा गुटखा पकडला

राजतंत्र न्युज नेटवर्क             दि. १९ : गुजरात राज्यातून चोरट्या पद्धतीने विक्रीसाठी आणला जात असलेल्या १० लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात डहाणू तालुक्यातील कास पोलिसांना यश आले आहे. एका ट्रकमध्ये भरून हा गुटखा राज्यात बेकायदा विक्रीसाठी आणला जात होता.           १६ जुलै रोजी पोलिसांनी मुंबई – अहमदाबाद महामार्गावरून एम. एच. १०/ झेड ... Read More »

घरफोडी करणारी टोळी गजाआड १० गुन्ह्याची उकल, १ लाखांचा ऐवज हस्तगत

राजतंत्र न्युज नेटवर्क              दि. १९ : जिल्ह्यातील बोईसर, पालघर व डहाणू शहरात रात्रीच्या सुमारास घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला गंजाआड करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून यात एक सराईत चोरट्याचा समावेश आहे. या टोळीकडून एकूण १० गुन्ह्याची उकल करण्यात अली असुन एकूण १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ... Read More »

डहाणूतील दिवाणी न्यायालयात आयोजित लोकन्यायालयात ३६ प्रकरणे निकाली

प्रतिनिधी            दि. १९ : डहाणू येथील दिवाणी न्यायालयात नुकतेच सह दिवाणी न्यायाधीश एस. ए. मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली आणि सह दिवाणी न्यायाधीश ओ. जे. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डहाणू तलासरी वकील संघटनेचे अध्यक्ष बी. एल. माछी, सचिव आर. एम. कडू आणि इतर सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि ... Read More »

कुडूस ग्रामपंचायतीच्या उप सरपंचपदी डाॅ गिरीश चौधरी यांची बिनविरोध निवड. 

प्रतिनिधी           कुडूस, दि. १९ : वाडा तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुडूस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी डाॅ. गिरीश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर प्रथम उप सरपंच म्हणून अंजुमन सुसे यांची निवड करण्यात आली होती. तर त्याच वेळी दोन वर्षाच्या कालावधीनंतर हे पद डाॅ. गिरीश चौधरी यांना द्यावे असे ठरल्याने, सुसे यांनी स्वखुशीने या पदाचा ... Read More »

मोखाड्यात शाळेची ईमारत कोसळली ४७ विद्यार्थी बचावले शिक्षण विभागाची अनास्था, जि.पचा भोंगळ कारभार

प्रतिनिधी             मोखाडा. दि. १९ : तालुक्यातील शेलमपाडा जिल्हापरिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या मंगळवारी मुसळधार पावसामूळे कोसळल्या आहेत.सुदैवाने रात्री उशिरा हि घटना घडल्याने ४७ विद्यार्थी बचावले आहेत. सद्यस्थितीत एका समाजमंदिरात विद्यार्थ्यांची तात्पूर्ती शिक्षणाची व्यवस्था करण्यांत आलेली आहे.या घटनेमुळे .जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.             ... Read More »

ग्रामपंचायत शेल्टे व टर्नकी कंपनीतर्फे वृक्षारोपण

राजतंत्र न्युज नेटवर्क               वाडा, दि. १९: तालुक्यातील ग्रामपंचायत शेल्टे व ए.एन.जे टर्नकी प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेल्टे ग्रामपंचायत हद्दीमध्ये व कंपनीच्या आवारात ग्रामस्थांच्या श्रमदानाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीमार्फत ७०० झाडे व कंपनीकडून १००० झाडे उपलब्ध करून देण्यात आली.               शेल्टे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ... Read More »

Scroll To Top