दिनांक 16 January 2019 वेळ 4:38 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » July » 12

Daily Archives: 12/07/2018

डहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक निमिल गोहिल अडचणीत!

NIMIL GOHIL

नगरसेवक पद धोक्यात; फौजदारी कारवाईचे आदेश! राजतंत्र न्यूज नेटवर्क / दि. १२: डहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक निमिल गोहिल यांना एकाच वेळी २ जातीचे दाखले मिळविणे अडचणीत आणणारे ठरले आहे. डहाणूचे उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावले आहेत. त्यांचे नगरसेवकपदही संपूष्टात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निमिल हे डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये नागरिकांच्या मागास ... Read More »

पालघर एसटी विभागीय कार्यालयामध्ये आढळले घुबड

PALGHAR GHUBAD1

पालघर/बोर्डी, दि. 12 : आज, गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकाच्या पुर्वेला असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आवारात भले मोठे घुबड आढळून आले. एसटी कार्यालयातील कर्मचारी अमोल गोवारी यांच्या नजरेस हे घुबड पडल्यानंतर त्यांनी पालघर येथील पक्षी मित्रांना बोलावुन घुबड त्यांच्याकडे सुपुर्द केले. Share on: WhatsApp Read More »

पालघर पोलीसांना मोठे यश: २६ गुन्ह्यांची उकल

DARODEKHOR ATAK1

6 दरोडेखोरांसह 2 सोनसाखळी चोरटे गजाआड राजतंत्र मिडीया / पालघर दि. १२ : अलीकडेच पालघर ते मनोर दरम्यानच्या रस्त्यावरील वाघोबा खिंडीत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील 2 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून पिस्तूल हस्तगत करण्यात पोलीसांना यश मिळाले असून काही दिवसांपुर्वीच एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याप्रकरणी 4 आरोपींना देखील मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. त्या शिवाय पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोटारसायकलवरुन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या ... Read More »

रासायनिक खतांची खरेदी करताना काळजी घ्या, प्रशांसनाचे आवाहन

LOGO-4-Online

राजतंत्र न्युज नेटवर्क               पालघर, दि. 10 : खरीप हंगामात पिकांसाठी रासायनिक खते खरेदी करताना शेतकर्‍यांनी अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रांतून व केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या गुणवत्ता व दर्जाची हमी देणार्‍या अधिकृत ग्रेडच्या खत खरेदीस प्राधान्य द्यावे. कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना विक्री होत असलेल्या ठिकाणाहून खत खरेदी करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले ... Read More »

बोईसर : उत्तर क्षेत्रीय संस्थेच्या वतीने विद्यार्थाना मोफत वह्या वाटप

BOISAR VAHYA VATAP

वार्ताहर बोईसर, दि. 5 : उत्तर क्षेत्रीय संस्थेच्या वतीने आज बोईसर येथील नवापूर रोड जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. बोईसरमध्ये कार्यरत असलेल्या उत्तर क्षेत्रीय संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष सत्यप्रकाश सिह यांच्या संकल्पनेतून मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी हनुमान सिंह, ब्रह्मदेव ... Read More »

सजग लहानग्या भावामुळे मोखाड्यातील तिघे बचावले

MOKHADA POOR-1

प्रतिनिधी             मोखाडा, दि. 11 : तालुक्यातील नाशेरा येथील गुरूनाथ मोहन भागडे (21), विमल गुरूनाथ भागडे (18) व रवी बच्चू भागडे (20) हे तिघे शेतावरून घराकडे परतत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. परंतू गुरूनाथचा लहानगा भाऊ जयेश याच्या सजगतेमूळे या तिघांचेही प्राण वाचवणे शक्य झाले आहे.           या बाबत गुरूनाथ व ... Read More »

बोईसर : ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी जैन बांधवांनी केली जेवणाची सोय

BOISAR TRAIN PRAVASHI

वार्ताहर             बोईसर, दि. 11 : अतिवृष्टीमुळे बोईसर स्टेशनवर अडकून पडलेल्या लखनऊ बांद्रा एक्स्पे्रेस व डहाणू-पनवेल मेमोतील प्रवाशांसाठी येथील जैन बांधवांनी नाश्ता, जेवण, पाणी व औषधांची सोय करुन माणुसकीचे दर्शन घडवले. काल, रेल्वे स्थानकात प्रवाशी अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर बोईसरमधील जैन समाज सल्लागार महावीर सोळंकी, समाज अध्यक्ष मुकेश जैन, राकेश खोखावत, अरविंद कोठीफोडा, नरेश भोगर, जितेंद्र ... Read More »

विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

BOISAR MULGA MRUTYU

वार्ताहर            बोईसर, दि. 11 : ट्युशन क्लासेसच्या नावाखाली भरपावसात विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बोईसर येथे घडली असुन राकेश यादव असे सदर मुलाचे नाव आहे.            न्यू राऊत वाडी येथे राहणारा राकेश यादव हा आदर्श विद्यालयात 8 वी इयत्तेत शिक्षण घेत होता. काल, मंगळवारी अतिवृष्टीमुळे ... Read More »

डहाणूरोड रेल्वेस्थानकातील 20 मिनिटांच्या रेल रोकोनंतर अरावली एक्सप्रेस मुंबईकडे रवाना

Dahanu Road Rly Stn

शिरीष कोकीळ/डहाणू दि. १२: अरावली एक्स्प्रेसची वाहतूक डहाणू रोड स्थानकात स्थगित करण्यात आल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत आज सकाळी रेल रोकोला सुरुवात केली होती. बलसाड फास्ट पॅसेंजरला या रेल रोकोचा फटका बसला. अखेर रेल्वेने अरावली एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंतत सोडण्याचं मान्य केल्यानंतर प्रवाशांनी रेल रोको मागे घेतला. जवळपास २० मिनिटांनंतर हा रेल रोको मागे घेण्यात आला. Share on: WhatsApp Read More »

Scroll To Top