दिनांक 23 April 2019 वेळ 5:50 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » July » 05

Daily Archives: 05/07/2018

नादुरुस्त रस्त्यांसाठी श्रमजीवीचा रास्तारोको, कुडूस नाक्यावर दीड तास रोखला रस्ता

दिनेश यादव             वाडा, दि. ५ : तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांविरोधात आज श्रमजीवी संघटनेने कुडूस नाका येथे तब्बल दीड तास रास्ता रोखून आंदोलन केले. संबंधितांना वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेण्यात टाळाटाळ केल्याने आज श्रमजीवी संघटना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करून सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्तावर बसवून ... Read More »

मधमाशी पालन उद्योग प्रशिक्षणासाठी इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन

राजतंत्र न्युज नेटवर्क               पालघर, दि. ४ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळामार्फत आग्या व सातेरी मधमाशीपालन उद्योग करु इच्छिणार्‍या मधपाळ लाभार्थ्यास तालुक्याच्या ठिकाणी ५ ते १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असुन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता ठाणे जिल्ह्यातील शहापुर, मुरबाड व पालघर जिल्ह्यातील डहाणू, ... Read More »

सुशिक्षित बेरोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रतिनिधी :                  केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती या योजने अंतर्गत कुडूस येथे बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित तरुणांना उद्योग सुरु करण्यासाठी बँकेद्वारे मिळणार्‍या अनुदानाच्या प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.                  कुडूस ... Read More »

केळव्याच्या तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून डहाणू लोकलला लागलेली आग विझवली

वार्ताहर             बोईसर, दि. ०४ : विरार येथे रेल्वे स्थानकात काल मंगळवारी शॉर्टसर्किट मुळे चर्चगेट – डहाणू लोकलला आग लागण्याची घटना घडली. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर हि आग विझवण्यात आली. मात्र ह्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विझवण्याकामी धावून आलेला केळव्याचा एक तरुण देवदूत ठरला. दिलीप मोतीराम भोईर असे या तरुणाचे नाव आहे. काल अंधेरी येथे ... Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी सुनिल भुसारा.

प्रतिनिधी              जव्हार, दि. ०४ : जव्हार- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी सुनील भुसारा यांची दुस-यांदा निवड करण्यात आली आहे, त्या अनुषंगाने जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, नवीन कार्यकारणी लवकरच तयार करण्यात येणार आहे. नवीन जिल्हा कार्यकारिणीमध्ये तरुण व एकनिष्ठपणे पक्षाला वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांचा समावेश जिल्हा कार्यकारणीमध्ये घेतला जाईल असे भुसारा यांनी पत्रकारांशी ... Read More »

जव्हार नगरपरिषद प्रभाग ६ पोट निवडणूक, स्वप्नील औसरकर बिनविरोध

प्रतिनिधी               जव्हार, दि. २६ : जव्हार नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मधील शिवसेनेचे नगरसेवक अमोल औसरकर यांच्या निधनानंतर रीक्त झालेल्या पोटनिवडणुकीत स्वप्नील औसरकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारानी आपले अर्ज माघारी घेतल्याने औसरकर हे विजयी ठरले आहेत.            दिवगंत नगरसेवक अमोल औसरकर यांच्या निधनानंतर ... Read More »

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे आज जिल्हाधिकारी कार्यलयावर धरणे आंदोलन

वार्ताहर                बोईसर : विद्यार्थी, आदिवासी कर्मचारी वर्ग, महिला तसेच स्थानिकांना नोकरीत समावेश करण्यांसह जिल्ह्यातील विविध समस्यांविरोधात ऑल इंडिया आदिवासी एम्पल्योईज फेडरेशन आज गुरुवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.                पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात कार्यरत आहेत. मात्र या योजना कार्यरत ... Read More »

Scroll To Top