दिनांक 23 April 2019 वेळ 5:45 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » July » 03

Daily Archives: 03/07/2018

किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 800 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकलींचे वाटप

वैदेही वाढाण/बोईसर, दि. 3 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधे अभावी आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये या उद्देशाने किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालघर तालुक्यातील दहीसर तर्फे मनोर केंद्रातील 10 शाळांतील 800 विद्यार्थ्यांना रेनकोट, तीन हजार वह्या व 100 सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार विलास तरे, बीडीओ प्रदीप घोरपडे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, जिल्हा परिषद सदस्य जिवन सांबरे, पंचायत ... Read More »

जिल्ह्यातील 471 रोजगार सेवकांचे मानधन वर्षभरापासून प्रलंबीत

> तांत्रिक सहाय्यकही वंचित; > 50 लाखांचे मानधन थकले; > मानद कर्मचार्‍यांची ओढातान दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 3 : पालघर जिल्ह्यातील 471 रोजगार सेवकांना मागील वर्षभरापासून मानधन मिळालेले नाही. तर 24 तांत्रिक सहाय्यकांचेही मानधन अटकलेले आहे. रोजगार सेवक व तांत्रिक सहाय्यकांच्या मानधनाबाबत आयूक्त कार्यालयाकडून दिरंगाई होत असल्याने या मानद कर्मचार्‍यांची मोठी आर्थिक ओढातान होत आहे. जिल्ह्यातील अत्यल्प मानधनावर कार्यरत असलेल्या 471 रोजगार ... Read More »

कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते बाबूराव लहांगे यांचे निधन

प्रतिनिधी            वाडा, दि. २: कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते तथा ठाणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती बाबूराव काशीनाथ लहांगे यांचे रविवार दिनांक १ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. बाबूराव लहांगे हे कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते होते तसेच ते ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून दोन वेळा निवडून आले होते. यामध्ये एक वेळेस त्यांनी समाज कल्याण समितीचे ... Read More »

वाडा तालुका कृषि कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण

प्रतिनिधी            वाडा, दि. २ : राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असुन काल ठिकठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वाडा येथे तालुका कृषि कार्यालयासमोरील कृषि फाँर्ममध्ये  उपविभागीय  कृषि अधिकारी प्रविण गवांदे व कृषि भुषण शेतकरी अनिल पाटील यांच्या हस्ते नारळाची रोपे लाऊन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.         स्व. वसंतराव ... Read More »

दहिसर वनपरिक्षेतत्रात वनमहोत्सवास सुरुवात, आमदार विलास तरे यांच्या हस्ते वृक्षारोपण

प्रतिनिधी             मनोर,ता.२ : दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीत १३ कोटी वृक्षलागवड महोत्सवाची सुरुवात गुंदावे येथे आमदार विलास तरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करून करण्यात आली. १ जुलै ते ३१ जुलै पर्यत चालणाऱ्या वनमहोत्सवात दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीत ४८ हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. बांबू, साग, वावळा, खैर, पळस, करंज, कुसुम, आपटा या जातीच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. ... Read More »

धर्मवीर ग्रूप कडून गरीब विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप, शिक्षण घेत असलेल्या तरुणाईचा स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी          वाडा, दि. २ :  तालुक्यातील शिक्षण घेत असलेल्या तरुणांनी एकत्र येत ‘धर्मवीर’ या नावाने ग्रुप तयार केला असून या ग्रुपच्या माध्यमातून ही तरुण मंडळी अनेक लहान-मोठे सामाजिक उपक्रम राबवत असतात.          आज तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता या तरुणांनी स्वत:च्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या पैशातून बचत करत पैसे जमा केले. आणि ... Read More »

जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आदिवासी युवा संघ कार्यकारणी निवड

प्रतिनिधी          जव्हार, दि. २ : आदिवासींची पारंपरिक कला सण व उत्सव तसेच दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आदिवासी युवा संघाची नव्याने कार्यकारिणी निवड करण्यात आली. या आदिवासी युवा संघ कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी म्हणून महेश सखाराम भोये यांची निवड तर उपाध्यक्षपदी एकनाथ दरोडा, मनोज गवते, राहुल घेगड, दिनेश जाधव, संकेत माळगावी यांची निवड करण्यात ... Read More »

Scroll To Top