दिनांक 17 February 2020 वेळ 1:33 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » July

Monthly Archives: July 2018

जिल्ह्यात गुरुवारपासून मोटर बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मुंबई, दि. 31 : पालघर जिल्ह्यातील दुर्गम पाड्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा मिळावी. तसेच कुपोषित बालके व गरोदर मातांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी गुरुवार, दि. 2 ऑगस्टपासून या भागात मोटर बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ... Read More »

वनवासी कल्याण आश्रमातर्फे मोकाशीपाडा येथे वृक्षारोपण

प्रतिनिधी जव्हार, दि.३०: तालुक्यातील सारसून मोकाशीपाडा येथे वनवासी कल्याण आश्रम, पालघर आणि जेब्स हेल्थ केअर सोल्यूशन प्रा. लि. कंपनीच्या विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी आंबा, फणस, जांभूळ अशा ८०० प्रकारची फळझाडे लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मोकाशीपाडा येथील महिलांनी आलेल्या पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत केले. यानंतर वृक्ष पूजन करून ग्रामस्थांनी गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली व झाडे लागवड करण्यात आली. ... Read More »

पी. एल. श्रॉफ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती

वार्ताहर बोईसर, दि. ३० : चिंचणी येथील पी. एल. श्रॉफ महाविद्यालयातर्फे प्लास्टिक बंदी व स्वच्छतेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे बिघडलेल्या वातावरणाला खीळ बसविण्यासाठी तरुण पिढीने प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच स्वच्छतेच्या सवयी अंगिकाराव्या, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दररोज निर्माण होणार्‍या कचर्‍याचे व्यवस्थापन व पुनर्वापर याबाबत विद्यार्थ्यांना चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. प्लास्टिक बंदी ... Read More »

चेन्नई मूकबधिर बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ पालघरमध्ये मूकबधिरांची रॅली

राजतंत्र न्युज नेटवर्क             बोईसर, दि. ३० : चेन्नई येथे एका अल्पवयीन मूकबधिर मुलीवर ७ महिने सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याने या घटनेचा निषेध म्हणून तसेच या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी पालघरमध्ये शनिवारी मूकबधिर क्रीडा आणि कल्याण मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकरॅली काढण्यात आली. या रॅलीत ३५० मूकबधिर तरुण-तरुणींनी ... Read More »

जिल्हा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

राजतंत्र न्युज नेटवर्क              पालघर, दि. ३० : पालघर जिल्हा निर्मितीला येत्या १ ऑगस्ट रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने वर्धापन दिन तसेच महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. वर्धापन दिनानिमित्त १ ऑगस्ट रोजी ... Read More »

फेक न्यूज : परिणाम आणि दक्षता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

राजतंत्र न्युज नेटवर्क             पालघर, दि. ३० : समाजात फेक न्यूजचे वाढते प्रमाण, त्याचे परिणाम आणि त्याबाबत घ्यावयाची दक्षता या विषयावर १ ऑगस्ट २०१८ रोजी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आणि जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. समाजमाध्यमांद्वारे पसरविल्या जाणार्‍या ... Read More »

मनोरमध्ये खैर तस्करांचा सुळसुळाट

आणखी एक टेम्पो पकडला मनोर/प्रतिनिधी, दि. 30 : वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी नुकताच दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीतून खैराची तस्करी करणारा टेम्पो पकडला असताना आज, सोमवारी पहाटे देखील मनोर वनपरिक्षेत्रात खैराची तस्करी करणारा टेम्पो पकडण्यात आला आहे. वनविभागाच्या कर्मचार्‍यांना पोळा गावच्या हद्दीत सर्वे क्र.29/1 मध्ये अवैध वृक्षतोड झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज, पहाटे चार वाजताच्या सुमारास वनविभागाच्या गस्तीवर असलेल्या कर्मचार्‍यांना पोळा रस्त्यावर एक ... Read More »

डोल्हारा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सीमा गवळी

मोखाडा/प्रतिनिधी, दि. 30 : तालुक्यातील डोल्हारा ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक आज, सोमवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या उपसरपंचपदाच्या लढतीत सीमा गवळी यांच्या विरोधातील एकमेव सुनील दिवे यांचा अर्ज बाद झाल्याने गवळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. पालघर लोकसभा निवडणूकीच्या पूर्वसंधेला अर्थात 27 मे रोजी डोल्हारा ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती. तथापी विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ उद्या संपणार असल्याने आज, 30 ... Read More »

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मनोर येथे रक्तदान शिबिर संपन्न

प्रतिनिधी             मनोर, दि. २९ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेच्या मनोर विभागातर्फे येथील शंकर मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोरच्या सरपंच पौर्णिमा दातेला, माजी उपसरपंच साजिद खतीब, ग्रामपंचायत सदस्य मीना बारी, संजय दातेला, माजी ग्राम पंचायत सदस्य रत्नदीप एडवनकर, रुपेश घरत, सहायक पोलिस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे, जिल्हा साथरोग नियंत्रण ... Read More »

शिक्षक सेनेने केले वृद्धाश्रमात फळे व बिस्किटे वाटप

प्रतिनिधी             कुडूस, दि. २९ : वाडा तालुक्यातील कुडूस नजीकच्या राजपूत फाऊंडेशनद्वारे चालवल्या जाणर्‍या वृध्दाश्रमातील ८० वृृद्धांना शिक्षकसेनेच्या कार्यकर्त्यांनी फळे व बिस्किट पुड्यांचे वाटप केले. याबद्दल वृृद्धांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. वृृद्धांनी यावेळी सद्गतीत स्वरात तुम्ही तुमच्या वृद्ध आई वडिलांना आमच्या मुलांसारखी वृृद्धाश्रमाची वाट दाखवू नका, असे आवाहन तरूणांना केले. तर आम्ही आमच्या आई वडिलांना चांगले सांभाळू, ... Read More »

Scroll To Top