दिनांक 19 February 2019 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » June » 17

Daily Archives: 17/06/2018

केळवे समुद्र किनाऱ्यावर ४ मुले बुडाली

राजतंत्र न्यु नेटवर्क               पालघर, दि. १७ : पालघर जिल्ह्यातील सुप्रसिध्द अश्या केळवे पर्यटनक्षेत्रात फिरण्यासाठी आलेल्या ४ पर्यटक युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या ७ युवकांपैकी ४ जण बुडून मृत्युमुखी पडले असून उर्वरित ३ जण बचावली आहेत. हे सर्व जण नालासोपारा येथील रहिवासी असून २० वर्षाखालील आहेत. आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ... Read More »

मनोर परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी.

राजतंत्र न्युज नेटवर्क             मनोर, दि. १६ : मनोर परिसरात मुस्लिम लोकवस्ती असलेल्या टेन, दहिसर, सोनावे आणि काटाले येथे काल चंद्र दर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली. यावेळी लहान मुलांनी रोझे पूर्ण केल्याने त्यांचे इदी देऊन कौतुक करण्यात आले.            मनोर तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक मशिदी मध्ये सकाळी ... Read More »

महावितरणच्या मुख्य वाहिनीमध्ये बिघाड, जिल्ह्याचा रविवार अंधारात

प्रतिनिधी बोईसर, दि. १७ : शनिवारी पावसाच्या हलक्या सरींना झालेली सुरुवात महावितरणला झेपलेली नसून अर्धा पालघर जिल्हा शनिवारी रात्री अंधारात राहिला. रविवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे लोकांचा हिरमोड झाला.              शनिवारी पावसाच्या हलक्या सरी ने सुरवात झालेल्या  पहिल्या पावसातच  रात्री वीज पुरवठा खंडित  झाला. शनिवारी बोईसर शहरात संपूर्ण रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.     ... Read More »

दाखले वाटप शिबीर संपन्न.

प्रतिनिधी             मनोर, ता.१७ : मनोरच्या मंडळ अधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाकरिता आवश्यक असलेलेदाखले वाटप शिबीर नुकतेच पार पडले.             जून महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षांचे निकाल लागले आहेत. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जातीचे दाखले, उत्पनाचे दाखले आणि नॉन क्रिमिकलेयर सारख्या दाखल्याची आवश्यकता भासते. दहावी बारावीचे निकालाच्या तारखांमध्ये जास्त अंतर नसल्याने तहसीलदार कार्यालयात ... Read More »

चिल्हार फाट्यावरील पागी पाडयाचा वीजपुरवठा सुरळीत सुरु

राजतंत्र न्युज नेटवर्क              मनोर, ता.१७ : चिल्हार फाटा येथील पागी पाडयाचा वीजपुरवठा शुक्रवार (ता.१५)सायंकाळी पूर्ववत करण्यात आला. दैनिक राजतंत्र मध्ये विजेविना चिल्हार पागी पाडा तीन दिवसांपासून अंधारात” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच महावितरण च्या अभियंत्यांनी हालचाल करून ताबडतोब वसई च्या कंत्राटदारामार्फत शुक्रवारी सकाळी काम सुरू केले. सायंकाळपर्यंत नवीन खांब उभे करून त्यावर जुनेच रोहित्र बसविण्यात आले. ... Read More »

वाडा : नव्या मुख्याधिकाऱ्यांच्या स्वागताला धावले सारे नगरसेवक 

प्रतिनिधी वाडा, दि. १७ : वाडा नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदावर नव्यानेच हजर झालेल्या  प्रबोधन मवादे यांच्या स्वागताला नगर पंचायतीचे बहुतांश नगरसेवक धावल्याने ह्यात  नगरसेवकांची हतबलताच दिसून आली.              वाडा नगरपंचायतीची एप्रिल २०१७ मध्ये स्थापना झाल्यापासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने वाडा शहर समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. सुरवातीला प्रशासक म्हणून तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी कार्यभार पाहिला. तर डिसेंबर ... Read More »

फरळेपाड्याने जपून ठेवले पहिले पाऊल  शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी जव्हार, दि. १७ : विविध उपक्रम राबवून नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या डिजीटल शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फरळेपाडा प्राथमिक शाळेने चालू शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव आणि नवागतांच्या स्वागतासाठी शाळेतील पहिले पाऊल हा अनोखा उपक्रम राबवला. ज्या प्रमाणे एखादी नववधू लग्न करून सासरी येते, त्या घरात कुंकूवाच्या पाऊल ठशांनी तिचा गृहप्रवेश लक्ष्मीच्या पाऊलांनी होतो. तिच्या जीवनाचा एक अध्याय संपून ... Read More »

Scroll To Top