दिनांक 19 February 2019 वेळ 4:20 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » June » 15

Daily Archives: 15/06/2018

आयोजकांविना पार पडली कुडूसची इफ्तार पार्टी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी

प्रतिनिधी : कुडूस, दि. 15 : तालुक्यातील कुडूस पोलीस दूरक्षेत्राच्या प्रांगणात दरवर्षी येथील पोलीसांतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी कुडूससह वाड्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी इफ्तार पार्टीला उपस्थित न राहिल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आयोजकांविना कुडूसची इफ्तार पार्टी पार पडल्याची चर्चा उपस्थित कार्यकर्त्यांत होती. वाडा पोलीसांकडून दरवर्षी तालुक्यात वाडा व कुडूस अशा दोन ठिकाणी इफ्तार ... Read More »

पोलीस अधिकाऱ्याच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सर्वपक्षीय आक्रमक

पोलीस अधिक्षकांकडे केली तक्रार;  बदलीची केली मागणी  प्रतिनिधी वाडा: दि.१५ : वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांचा मनमानी व भ्रष्ट कारभार सुरु आहे.तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ते अपमानास्पद वागणूक देत असल्याने वाड्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी आक्रमक झाले असून शिंदे यांची तत्काळ बदली करा अशी मागणी सर्व पक्षीय संघर्ष समितीने पालघरच्या पोलीस अधिक्षकांकडे एका तक्रारीद्वारे केली आहे.      ... Read More »

शिवसेनेविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

दि. 15 : पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता लागू असताना न नफा ना तोटा या तत्वावर विद्यार्थ्यांना वह्यांची विक्री केल्याप्रकरणी शिवसेनेसह पालघर प्रतिष्ठाणच्या पदाधिकार्‍यांविरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 25 जून रोजी होत असुन या निवडणूकांच्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, बुधवारी ... Read More »

अवैध रेतीउपश्यावर महसूल विभागाची कारवाई.

प्रतिनिधी मनोर, दि. १४ : वैतरणा खाडीकिनारील नावझे, गिराळे गावात सक्शन पंपाद्वारे होणाऱ्या अवैध रेतीउपश्यावर दहीसरचे तलाठी नितीन सुर्वे यांनी कारवाई केली आहे. बुधवारी रात्री (दि. १३) ही कारवाई करण्यात आली असून खाडी किनारी रेतीसाठा करण्यासाठी जेसिबी यंत्राच्या साहाय्याने तयार करण्यात आलेले खड्डे नष्ठ करण्यात आले. उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाई नंतर खाडी किनारी सक्शन पंपाद्वारे ... Read More »

रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण करून राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा केला.

प्रतिनिधी              बोईसर दि, १५ : येथील मनसे कार्यकर्त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करून तसेच वृक्षरोपण करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५० वा  वाढदिवस साजरा केला . यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी सरकारी दवाखान्यातील रुग्ण व हातावर पोट भरणाऱ्या गरीब मजुरांना फळ, बिस्किट्स,पाणी व आईस्क्रिम वाटप केले . तसेच सरकारी रुग्णालयातील समस्याचा आढावा घेतला. दरम्यान आजच्या काळाची गरज जाणून बोईसर परिसरात वृक्षारोपण ... Read More »

वाड्यात मनसे तर्फे फळझाडांचे वाटप 

प्रतिनिधी वाडा, दि. १४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या ५० व्या वाढदिवसा निमित्त मनसे वाडा तालुक्याच्या वतीने ५५० फळझाडांचे वाटप आज खंडेश्र्वरीनाका येथे करण्यात आली. पर्यावरणाचे महत्व जनमानसापर्यंत पोहचावे या उद्देशाने एक अनोखा उपक्रम राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.           या उपक्रमास तालुक्यातून उत्स्फूर्त  असा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी ... Read More »

Scroll To Top