दिनांक 22 February 2019 वेळ 3:37 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » June » 05

Daily Archives: 05/06/2018

वाडा : नाटक जत्रेत रंगले लहानगे 

प्रतिनिधी       वाडा, दि. ४  : येथे प्रथमच भरलेल्या नाटक जत्रेत विदुषकांच्या धम्माल विनोदी अदाकारीने उपस्थित लहानग्यांमध्ये हास्याचे रंग भरले तर अन्य सादर झालेल्या नाटकांनीही लहान मुलांसह  मोठ्यांनाही खळखळून हसायला लावल्याने येथे भरलेल्या नाटक जत्रेत लहानग्यांसह उपस्थित रसिक चांगलेच  रंगले होते त्यामुळे नाटक जत्रेच्या माध्यमातून लहान मुलांना नाटक ह्या माध्यमाचा वापर करत वेगळा अनुभव मिळाला.         ... Read More »

सकारात्मक द्रुष्टीने केलेली शेती नेहमीच फायदेशीर ! कृषी उपसंचालक

प्रतिनिधी               वाडा, दि. ४ :  बरेचसे शेतकरी शेती उत्पादन घेत असताना शेतीतून फायदा मिळतच नाही हा नकारात्मक द्रुष्टीकोन घेऊन शेती करीत असतात, आणि शेती परवडत नाही असा बोभाटा मारतात. मात्र जे शेतकरी सकारात्मक द्रुष्टीने शेती करतात त्यांची शेती फायदेशीरच ठरली आहे. असे प्रतिपादन क्रूषि उपसंचालक सुरेश भालेराव यांनी उन्नत शेती सम्रुध्द शेतकरी या ... Read More »

जव्हार : कावेरी महिला ग्रामसंघाच्या पोयशेत येथील कार्यालयाचे उद्घाटन

प्रतिनिधी जव्हार, दि. ०४ : तालुक्यातील हिरडपाडा प्रभागातील पोयशेत येथे महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान अंतर्गत (उमेद) कावेरी महिला ग्रामसंघा ची स्थापना करण्यात आली असून या ग्रामसंघाच्या  कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले.  ग्रामीण भागातील गरीब वंचित महिलांना  उपजीविकेचे साधन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवून तालुक्यातील एकूण ५० ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसंघ स्थापन करण्यात आले आहेत.    हिरडपाडा ग्रामपंचातीचे सरपंच माधव भोये यांच्या हस्ते या कार्यालयाचे व ... Read More »

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्थांकडून वाहनांवर दगडफेक व तोडफोड

वार्ताहर              बोईसर, दि. ०४ : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक तरुणांना जाणूनबुजून डावलले जात असल्याच्या भावनेतून आज, सोमवारी परिसरातील तरुणांनी पंचमार्ग येथील रस्त्यावर बसून आंदोलन केला. यावेळी संयमाचा बांध फुटलेल्या तरुणांनी अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या बसेसवर दगडफेक करत तोडफोड केली. यात काही कामगार किरकोळ जखमी झाल्याचे कळते. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात नोकर भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात ... Read More »

Scroll To Top