दिनांक 19 February 2019 वेळ 3:38 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » June (page 4)

Monthly Archives: June 2018

अटकेतील पत्रकारांना जामीन

राजतंत्र न्युज नेटवर्क             पालघर, दि. २५ : सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आज तक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी हुसेन खान आणि हिंदुस्तान टाईम्सचे प्रतिनिधी राम परमार यांना आज पालघर येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पालघर पोलीसांनी वाघोबा खिंडीत केलेल्या गोळीबाराचे वृत्त घेण्यासाठी हे पत्रकार पालघर पोलीस स्टेशनला गेले होते. आज ... Read More »

मोखाडा तालुक्यातील दुर्गम ब्राम्हणपाड्यात सौरऊर्जा पंपाद्वारे पाणी पुरवठा

प्रतिनिधी           जव्हार, दि. २४ : पालघर जिल्हात मोखाडा हा अत्यंत दुर्गम तालुका म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायती हद्दीतील ब्राम्हणपाडा येथील ग्रामस्थ अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरत होते. पाड्यापासून १७०० मीटर अंतरावर असलेल्या विहारीवरून पाणी आणतांना महिलांसह सर्वच ग्रामस्थांचे मोठे हाल होत असत. मात्र आता प्रगती प्रतिष्ठान संस्थेने ब्राम्हणपाडा येथे सौरऊर्जा पंपाद्वारे नळपाणी योजना आणल्याने गावातंच ... Read More »

बोईसरमध्ये पावसाची दमदार हजेरी अनेक ठिकाणी पाणी साठल्याने नागरिकांचे हाल

वार्ताहर           दि. २४ : पालघर जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बोईसरमधील अनेक ठिकाणी नद्या नाले तुडुंब भरून वहात आहेत. पहाटेपासून सुरु झालेला पाऊस ५ ते ६ तास कोसळल्याने येथील सखोल भागात पाणी साचले आहे. तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने व रस्त्यांवर पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. बोईसर- पालघर दरम्यान रेल्वे रूळांवर पाणी ... Read More »

महामार्गावरील अपघातात चौघांचा मृत्यू, ३ जखमी क्रूझर जीपचा टायर फुटूल्याने झाला अपघात

प्रतिनिधी           मनोर, ता.२४ : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे येथे जीपच्या टायर फुटून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत.           शनिवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास महामार्गाच्या गुजरात मार्गिकेवरून मुंबईकडे चाललेल्या एम. एच. १५ इ. एक्स. ७५५९ या क्रमांकाच्या क्रुझर जीपचा ढेकाळे पुलाजवळ टायर फुटला. त्यामुळे वेगात असलेली जीप ... Read More »

वैतरणा नदीवरील पारगाव पुलाचे काम अंतिम टप्यात, सफाळे वरई मार्गावरील वाहतूक एक दिवस बंद राहणार

प्रतिनिधी          मनोर, ता. २३ : सफाळे वरई राज्य मार्गाच्या  वैतरणा नदीवरील पारगाव पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे  मंगळवारी (ता.२६) वरई सफाळे मार्ग एक दिवसासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.         अवैध वाळू उपशामुळे पारगाव पुलाचा खांब झुकला होता. त्यामुळे अवजड वाहतूक डिसेंबर २०१५ पासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. झुकलेल्या खांबाजवल नवीन खांब ... Read More »

अतिवृष्टीमुळे आदिवासीचे घर कोसळले, भर पावसात घरातील आठ सदस्यांना झोपडीचा आसरा

प्रतिनिधी           मनोर,ता.२४ : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाट्यानजीकच्या कानल पाडा येथील लक्ष्मण झुनर यांचे घर आज झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळले.सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.           चिल्हार आवढाणी ग्रामपंचायत हद्दीत कानल पाडा येथे आदिवासी बहुल वस्ती आहे. लक्ष्मण जुनर यांनी २००४ साली येथे घर  बांधले होते. आज झालेल्या अतिवृष्टीमुळे घराचे प्रथम छप्पर ... Read More »

राहुल गांधींवर गुन्हा दाखल करा! संजीव जोशी यांची पोलीसांकडे तक्रार

राजतंत्र न्यूज नेटवर्क दि. २४: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्यावर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ चे कलम ७४ अन्वये कारवाई करावी अशी लेखी तक्रार दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू पोलीसांकडे केली आहे. पोलीस याप्रकरणी काय भूमिका घेतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी खासगी विहिरीत पोहोण्यास गेल्याच्या कारणाने ... Read More »

पत्रकारांच्या विरोधात पोलीसांची दडपशाही वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर जुलमी कारवाई

राजतंत्र न्यूज नेटवर्क पालघर, दि. २४ : कथीत दरोडेखोरांना अटक केल्याप्रकरणी बातमी घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या आज तक ह्या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी हुसेन खान आणि हिंदुस्तान टाईम्स ह्या इंग्रजी दैनिकाचे प्रतिनिधी राम परमार यांना पालघर पोलीसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवत अटक केली आहे. ह्या कारवाईच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. पत्रकारांना धक्काबुक्की करुन उलट खोटी तक्रार ... Read More »

प्रज्ञा शोध परिक्षेत अमी गोगरी जिल्ह्यात पहिली

डहाणू दि. २४: पूणे स्थित वाडीया महाविद्यालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्य पातळीवरील प्रज्ञा शोध परिक्षेत डहाणूतील एच. एम. पी. स्कूलची विद्यार्थीनी कुमारी अमी पंकज गोगरी ही पालघर जिल्ह्यात पहिली आली आहे. अमी ही प्राध्यापक डॉ. पंकज गोगरी यांची कन्या आहे. अमी यापूर्वी शिष्यवृत्तीच्या परिक्षेत देखील उत्तीर्ण झाली होती. तीच्या या यशाचे डहाणूतील नागरिकांकडून कौतुक होत आहे. Share on: WhatsApp Read More »

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुक : सुवर्णा पाटील यांना सामाजिक संघटनांचा वाढता पाठिंबा 

प्रतिनिधी            वाडा, दि. २२ : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या होत असलेल्या निवडणुकीत वाडा तालुक्याच्या सुपुत्री सुवर्णाताई पाटील ह्या एकमेव महिला उमेदवार असून संपूर्ण कोकणातील विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा त्यांना मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.             पदवीधर मतदारसंघातून सुवर्णाताई पाटील ह्या प्रथमच निवडणूक लढवीत आहेत. प्रचाराच्या निमित्ताने संपूर्ण कोकणातील पालघर, ठाणे, रायगड,  रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या ... Read More »

Scroll To Top