दिनांक 19 February 2019 वेळ 3:50 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » June (page 2)

Monthly Archives: June 2018

दहीसरला डोळे तपासणी शिबीर संपन्न.

प्रतिनिधी   मनोर, दि २७ : मीरा रोड येथील भक्तीवेदांत हॉस्पिटल आणि दहिसर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने दहिसरच्या ग्रामपंचायत हॉल मध्ये मोतीबिंदू आणि डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 35 रुग्णांचे डोळे तपासणी करण्यात आली. 12 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून त्यांच्यावर भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराच्या आयोजनात बहुजन विकास आघाडीचे इलियास शेख यांनी विशेष मेहनत  ... Read More »

वटपौर्णिमा निमित्त वटवृक्षाच्या पूजना साठी महिलांची झुंबड!

प्रतिनिधी             वाडा, दि. २७ : हिंदू पंचांगातील जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सुवशिनी आपल्या पतीला उत्तम व दीर्घायुष्य लाभावे व सात जन्म हाच पती लाभावा म्हणून वडाळा प्रदक्षिणा घालून वटवृक्षाची पूजा करतात. Share on: WhatsApp Read More »

तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आरोग्याला अधिक महत्त्व द्यायला पाहिजे – पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे 

प्रतिनिधी              वाडा, दि. २७: वाडा पोलीस स्टेशनच्या वतीने येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.             यावेळी बोलतांना वाडा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे म्हणाले कि, आजची तरुण पिढी वाईट संगतीमुळे, ... Read More »

वाडा पंचायत समितीच्या इमारतीला गळती

दिनेश यादव/वाडा, दि. 27 : पंचायत समितीच्या अनेक कामांचा गाडा जेथुन हाकला जातो त्या पंचायत समितीच्या इमारतीलाच मोठी गळती लागल्याने गळती थांबवण्यासाठी प्लास्टिकची मदत घ्यावी लागली आहे. वाडा पंचायत समितीच्या इमारतीत सभापती, उपसभापती व गटविकास अधिकार्‍यांची दालने तसेच कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, बांधकाम विभाग यांची कार्यालय असून येथूनच पंचायत समितीची व तालुक्यातील विकास कामे केली जातात. ... Read More »

मनोर : ऑनलाइन लॉटरीचा व्यवसाय जोरात, तरुण कर्जबाजारी

नाविद शेख /मनोर, दि. 27 : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मस्तान नाका येथे अनधिकृत ऑनलाइन लॉटरीचा व्यवसाय जोरात सुरू असुन स्थानिक आणि आदिवासी तरुणांना त्याचे व्यसन लागले आहे. त्यामुळे परिसरातील अनेक तरुण कर्जबाजारी झाले असुन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. मस्तान नाका परिसरात पाच महिन्यांपासून ऑनलाइन लॉटरी सुरू आहे. या ऑनलाइन लॉटरीमध्ये तीन पत्ती, कसिनो आणि मटक्यासारखे आकडे लावणे यासारख्या खेळांवर ... Read More »

जव्हारकरांसाठी धोक्याची घंटा, वाढत्या रहदारीमुळे जयसागर धरणातील पाणी दूषी होण्याची शक्यता

प्रतिनिधी            जव्हार, दि. २५ : उंच ठिकाण वसलेल्या जव्हार भागात पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरीहि फेब्रुवारी महिन्यापासूनच येथे पाणी टंचाईला सुरवात होते. जव्हार शहरात पिण्याच्या पाण्यासाठी जयसागर  धरणाचे पाणी हा एकमेव श्रोत आहे. मात्र धरणाशेजारी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रहदारीमुळे धारणामधील पाणी दूषित होवून येत्या काही वर्षात जव्हारकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवू शकते, असे नागरिकांचे ... Read More »

पालघर येथील प्रयोगशील शेतकरी अनंत राऊत काळाच्या पडद्याआड

प्रतिनिधी             डहाणू, दि. २६ : पालघर तालुक्यातील माहीम येथील कृषीभूषण शेतकरी व बागायतदार अनंत नाना राऊत, वय ८६, यांचे  २३ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.            राऊत तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक शासकीय योजना आपल्या भागात आणून विविध पिके घेण्याचे प्रयोग केले. त्यांनी पालघर तालुक्यात प्रयोग परिवार ... Read More »

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

राजतंत्र न्युज नेटवर्क            पालघर दि. २६ : पालघर जिल्ह्यातील मातंग समाजील मांग, मातंग, मिनी मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील विविध अभ्यासक्रमात ६० टक्क्यापेक्षा जास्त गन मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यानी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ... Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय दिन  उत्साहात साजरा

राजतंत्र न्युज नेटवर्क             पालघर दि. २६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन सोहळा व जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण ... Read More »

पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी

राजतंत्र न्युज नेटवर्क               पालघर, दि: २६ : पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार जेजुरकर यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागा मार्फत काढण्यात आलेल्या समता दिंडीला जेजुरकर यांच्या ... Read More »

Scroll To Top