दिनांक 17 July 2019 वेळ 4:47 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » June

Monthly Archives: June 2018

नैसर्गिक नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडल्याने नागरिक संतप्त

वार्ताहर             बोईसर, दि. २९ : तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांमधून पावसाळ्यात वाहत्या नाल्यांचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडण्यात येते. अश्याच प्रकारे कोलवडे येथील नाल्यातून रासायनिक सांडपाणी वाहत असल्याहा प्रकार घडल्याने येथील नागरिक समाप्त झाले आहेत.  एमआयडीसीत हजारोच्यावर कारखाने कार्यरत आहेत. यामध्ये स्टील, रसायन, कापड असे  उत्पादन करणार्या लहान मोठ्या कारखान्यांचा समावेश आहे. हे कारखाने अनेक वेळा रासायनिक सांडपाणी ... Read More »

कुडूस येथे बेरोजगारांसाठी मेळाव्याचे आयोजन

अशोक पाटील/कुडूस, दि. 29 : केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती या योजने अंतर्गत बेरोजगार तरूणांना बँकेद्वारे अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरूणांना या योजनेचा लाभ व्हावा या उद्देशाने कुडूस येथील ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये 3 जुलै रोजी सुशिक्षित बेरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरूणांना याचा लाभ ... Read More »

अतिवृष्टीमुळे डहाणू पूर्वेतील रेल्वेच्या हद्दीतील रस्ता खचला

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 29 : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डहाणू पूर्वेला असलेल्या 5 नंबरच्या रेल्वे लाईनजवळ सिमेंटचा रस्ता खचला आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्याशेजारी असलेला लोखंडी संरक्षक कठडा देखील पडला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. डहाणूत लोकलची उपनगरीय सेवा सुरू झाली त्यावेळी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला 5 नंबरच्या रेल्वे लाईनजवळ सिमेंटचा रस्ता, त्याला लागूनच सिमेंटच्या चौकोनी ठोकळ्यांवर बसविण्यात आलेला ... Read More »

मनोर : चिल्हार कानल पाड्यात घर कोसळले

नावीद शेख/मनोर, दि. 29 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार आवढानी ग्रामपंचायत हद्दीतील कानल पाड्यातील सखाराम रेंजड यांच्या राहत्या घराचा एक भाग आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कोसळला. मोठा आवाज झाल्याने प्रसंगावधान राखत सखाराम रेंजड आणि त्यांची पत्नी घराबाहेर पडल्याने या दुर्घटनेतून ते सुखरुप बचावले. या घरात सहा सदस्य राहत होते. घर कोसळल्याने पावसाळ्यासाठी बेगमी करून ठेवलेले भाताचे कणगे, तांदूळ, मुलांच्या शाळेची पुस्तके, ... Read More »

ई-सेवा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद व एल अँड टी मध्ये सामंजस्य करार

पालघर, दि. 29 : गाव-खेड्यांमध्ये डिजिटल साक्षरता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील 10 गावांमध्ये कियोस्क यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी पालघर जिल्हा परिषद, प्रथम इन्फोटेक, एल अँड टी पब्लिक चेरीटेबल ट्रस्ट आणि एस.आय.पी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज, सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत झरी, कोचाई, गिरगाव, उपलाट, सुत्रकार, ... Read More »

बुलेट ट्रेनविरोधात शिवसेनेचा उद्यापासून जनसंपर्क दौरा

वैदेही वाढाण/बोईसर : पालघर जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या बुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा द्रुतगती मार्ग प्रकाल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने पालघर जिल्ह्यामध्ये जनसंपर्क दौरा आयोजित केला असुन त्यानुसार उद्या, 30 जुन रोजी तलासरी तालुक्यातील कवाडा येथून या दौर्‍याला सुरुवात होणार आहे. बुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गासाठी पालघर जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासी बांधवांच्या जमिनी जाणार आहेत. पालघर जिल्ह्यातील 114 गावांमधून बुलेट ट्रेनसाठी जमीन ... Read More »

पोलिस निरीक्षक सुदाम शिंदेंविरोधात श्रमजीवी आक्रमक

दिनेश यादव/वाडा, दि. 29 : वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्याविरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असुन शिंदेच्या मनमानी कारभारा विरोधात आज, शुक्रवारी श्रमजीवीने हजारोंच्या संख्येने वाडा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. मोर्चाद्वारे शिंदेंच्या कार्यपद्धतीचा जाब विचारून त्यांच्या बदलीची मागणी या मोर्चातून करण्यात आली. श्रमजीवीचे सरचिटणीस विजय जाधव यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. तालुक्यातील विविध प्रकरणात शिंदे यांनी हितसंबंध जोपासून ... Read More »

दुचाकींच्या अपघातात 1 ठार, 2 जखमी

डहाणू, दि. 28 : कासा-सायवण रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल, 27 जुन रोजी कासा-सायवण रस्त्यावरील वाघाडी गावच्या हद्दीत हा अपघात घडला. एम.एच.04/सी.सी.9919 या क्रमांकांच्या दुचाकीवरुन भरधाव वेगात आलेल्या तरुणाने विरुद्ध दिशेने येणार्‍या एम.एच.48/ए.जे.3992 या क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात धडक ... Read More »

हात नदीचे पाणी घरात शिरल्याने कोल्हे पाडा ग्रामस्थांचे नुकसान

नावीद शेख/मनोर, दि. 28 : सोमवारी, 25 जुन रोजी झालेल्या अतिवृष्टीत चिल्हार-बोईसर रस्त्यावरील खुटल गावातील कोल्हे पाडा येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. दरम्यान येथील घरामंध्ये पाणी शिरण्यास कारणीभूत ठरलेला पूल तातडीने हटविण्यात यावा याकरिता श्रमजीवी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. बोईसर-चिल्हार रस्ता रुंदीकरणाचे काम बिटकॉन कंपनीमार्फत सुरू आहे. रस्ता रुंदीकरणासाठी खुटल येथील हात नदीवरील जुना पूल ... Read More »

दांडेकर महाविद्यालयात फार्मास्युटीकल केमिस्ट्री अभ्यासक्रमाचा प्रारंभ

राजतंत्र न्युज नेटवर्क  : पालघर, दि. 28 : सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, टाटा समाज विज्ञान संस्था (मुंबई), लुपिन समुह, तारापूर आणि चेन्नई येथील स्कील फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहयोगातून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात फार्मास्युटीकल केमिस्ट्री या विषयाचा बॅचलर ऑफ वोकेशनल पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा महाविद्यालयात पार पडला. दांडेकर महाविद्यालयात भावी काळातील तज्ञ आणि कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, ... Read More »

Scroll To Top