दिनांक 19 June 2019 वेळ 8:23 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » May (page 2)

Monthly Archives: May 2018

वाळवंडा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी तिरंगी लढत, ९ पैकी ५ सदस्य बिनविरोध ४ सदस्यांसाठी होणार निवडणूक

प्रतिनिधी            जव्हार. दि. २३ : आठ गावपाड्यांचा समावेश असलेल्या वाळवंडा ग्रामपंचायत निवडणूकीत थेट सरपंच पदासाठी ३ अर्ज दाखल झाले आहेत. तर ९ सदस्यांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असुन, उरलेल्या ४ जागांसाठी येत्या २७ मे रोजी मतदान होणार आहे. यामुळे वाळवंडा निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत आहे.            वाळवंडा ग्रामपंचायतमध्ये खंडीपाडा उंबरवांगण, वाळवंडा, ... Read More »

मनोरच्या सायलेंट रिसॉर्टमधील तरण तलावात मलमिश्रीत दूषित पाणी.

प्रतिनिधी            मनोर, दि. २३ : मनोरच्या सायलेंट रिसॉर्ट मधील तरण तलावात मानवी विष्ठा मिश्रित दूषित पाणी असल्याचा  धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत रिसॉर्ट वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मनसेचे विक्रमगड तालुका अध्यक्ष परेश रोडगे यांनी पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना  केली आहे.             सध्या उन्हाळी सुट्टीचे दिवस आणि तापमानाचा ... Read More »

भाजपवाले मुंबईतील पाकिटमार सारखे फोटोमार-आमदार डॉ. नीलम गोऱ्हे*

राजतंत्र न्यु नेटवर्क              मनोर, दि. २३ : भाजपवाले मुंबईतील पाकिटमार सारखे फोटोमार असल्याची बोचरी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोरे यांनी केली.  पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूसाठी प्रचारदौऱ्यांवर आलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ नीलम गोऱ्हे यांनी तालुक्यातील गोवाडे गावात महिलांशी संवाद साधला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील,पंचायत समिती सदस्य श्रद्धा घरत, महिला आघाडीच्या ममता चेंबूरकर, ज्योती ... Read More »

शिवसेना व भाजप उर बडवून मतांचा जोगवा मागत आहेत – सचिन सावंत

वार्ताहर            बोईसर, दि. २१ : गेली चार वर्ष विकासाची कोणतीही कामे केली नसल्यानेच मतांसाठी मृत व्यक्तींचा वापर करण्याची वेळ भाजप आणि शिवसेनेवर आली आहे. एके ठिकाणी पालघर जिल्ह्याचा विकास हा सत्ताधा-यांमुळे आयसीयुमध्ये मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे आणि दुसरीकडे भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष ऊर बडवून मतांचा जोगवा मागत आहेत अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ... Read More »

उज्जैनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

प्रतिनिधी            कुडूस, दि. २१ :  वाडा तालुक्यातील उज्जैनी ही शाळा आदिवासी वस्तीत मोडत असून येथील बहुसंख्य लोक दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील आहेत. त्या मुळे त्यांना आपल्या मुलांना शैक्षणिक साहित्य विकत घेऊन देवू शकत नाही. ही अडचण लक्षात घेवून येथील मुख्याध्यापक व व जायंटस ग्रुप ऑफ वाडाचे उमेश खिराडे यांनी इसीएल टेलिकॉम प्रा. लि.  या कंपनीच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी ... Read More »

जव्हार : विनवळ गावात जगदंबा मातेचा बोहाडा उत्साहात साजरा

वार्ताहर. जव्हार, दि. २१ : शेकडो वर्षांपासून अादिवासींची परंपरा आणि संस्कृतीचे प्रतिक समजला जाणारा तसेच तालुक्यात दरवर्षी साजरा केला जाणारा जगदंबा मातेचा उत्सव अर्थात बोहाडा तालुक्यातील विनवळ गावात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. १९ ते २१ मी अशा तीन दिवस या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. . बोहाडा अर्थात गावदेवी जगदंबा उत्सवाला गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. हा उत्सव रात्रीच्या वेळेस साजरा केला ... Read More »

वाड्यात भीषण अपघातात एक ठार एक गंभीर जखमी

प्रतिनिधी              वाडा, दि. २० : भरधाव वेगात असलेली दुचाकी अनियंत्रण होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.              तालुक्यातील कोणे येथे शनिवार दि. १९ संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. कोणे गावाकडून शिरिष पाडाच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या झेड.एम.एच.०४/१५३२ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाचा गाडीवरील ... Read More »

हातेरी ग्रामपंचायतीला केंद्रीय सहसचिवांची भेट. पाणी पुरवठा, स्वच्छता, ग्रामपंचायत विकासात्मक कामांची पाहणी.

प्रतिनिधी जव्हार, दि. २० : तालुक्यातील हातेरी ग्रामपंचायतील पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता व स्वच्छता तसेच ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या विकासात्मक कामांची पाहणी करण्यासाठी काल शनिवारी केंद्रीय सहसचिव व्ही. राधा यांनी हातेरी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी आदिवासींचे तारपा नृत्य व संबळ वाद्य, वाजवून व्ही. राधा यांचे स्वागत केले.              तालुक्यातील हातेरी ग्रामपंचायतील माळघर, दापटी, कोकणपाडा, ठाकूरपाडा, रुईपाडा, आदी पाड्यांच्या ... Read More »

जव्हार तालुक्यात पोलिस शिपाई ची कमतरता     

प्रतिनिधी जव्हार, दि. २० : जव्हार पोलीस स्टेशन हद्दीत ८८ पोलीस शिपाई पंद मंजूर आहेत. मात्र यातील पोलीस शिपायांची ४२ पदे रिक्त असल्याने ४६ पोलिसांवर जव्हार तालुक्याची जबाबदारी आहे. यात १ पोलीस निरीक्षक व २ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. या रिक्त पदांचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने रिक्त पदे तातडीनं ए भरण्यात यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.     ... Read More »

निवडणुकीनंतर वनगा परिवाराला मातोश्रीचे दरवाजे बंद होतील! मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका 

प्रतिनिधी              डहाणू, दि. २० : दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. पालघर जिल्ह्यात भाजपा रुजविण्यासाठी वनगा साहेबांनी प्रचंड काम केलं. त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारातील व्यक्तीलाच भाजपकडून तिकीट देण्यात येणार होत, मात्र शिवसेनेने विश्वासघात करून वनगा परिवाराला तिकीट दिलं. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर श्रीनिवास वनगा व वनगा परिवार यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद असतील, ... Read More »

Scroll To Top