दिनांक 16 January 2019 वेळ 4:05 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April » 19

Daily Archives: 19/04/2018

पोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त

Palghar News

  पालघर, दि. 18 : गांधीनगर झोपडपट्टीजवळ पोलीसांनी टाकलेल्या धाडीत 8 कीलो 430 ग्रेम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची कींमत सुमारे 80,420 रु. इतकी आहे. पालघर शहराजवळील गांधीनगर झोपडपट्टी जवळील मैदानात एक ईसम गांजा विक्रीकरिता येणार असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला मिळाली होती. त्यानुसार पालघरचे पोलिस अधिक्षक मंजूनाथ सिंगे व पोलिस उप अधिक्षक विश्‍वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ... Read More »

कुडूस एस.टी. थांब्याला भाजी विक्रेत्यांचा विळखा.

2

प्रतिनिधी: कुडूस दि. 18 : कुडूस हे वाडा महामार्गावरील मुख्य थांब्याचे ठिकाण असून येथे ठाणे, मुंबई, भिवंडी, कल्याण तसेच जव्हार पालघर वाडा याठीकाणी ये जा करणार्‍या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र एस. टी. थांब्यालाच भाजी विक्रेत्यांनी वेढल्याने प्रवाशांना एसटीत चढण्यास व उतरण्यास मोठी कसरत करावी लागते. कुडूस हे बाजारपेठेचे मोठे ठिकाण असुन येथे इंग्रजी, मराठी व हिन्दी माध्यमातून शिक्षण घेणार्‍या ... Read More »

डहाणूमध्ये मेणबत्ती मोर्चा

Dahanu News 3

डहाणू दि. 18: जम्मू काश्मिरसह देशाच्या विविध भागात बलात्कार्‍यांच्या शिकार झालेल्या अल्पवयीन मुलींबाबत संवेदना व्यक्त करण्यासाठी काल (17) डहाणूमध्ये भव्य असा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. डहाणूरोड रेल्वे स्थानकापासून लोकमान्य टिळक (जनता बँक) चौकापर्यंत निघालेल्या या मेणबत्ती मोर्चात महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी झाला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नजरेत भरण्याइतकी होती. Share on: WhatsApp Read More »

ग्राहक संरक्षण परिषद बरखास्त करा प्रकाश अभ्यंकर यांची मागणी

Dahanu News 2

डहाणू दि. 18: जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ग्राहक संरक्षण परिषद म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय असून अशी बिनकामाची परिषद बरखास्त करावी अशी मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टिसचे सचिव प्रकाश अभ्यंकर यांनी पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्याऐवजी जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर ग्राहक न्यायालय स्थापन होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती अभ्यंकर यांनी केली आहे. पालघर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये ग्राहकांच्या तक्रारी स्विकारल्या जातात. त्यांच्या सुनावणीसाठी ... Read More »

मोबाईलचे आय एम इ आय क्रमांक बदलणार्‍याना अटक

Dahanu News 1

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. 18: प्रत्येक मोबाईलला उत्पादक कंपन्यांमोबाईलचे आय एम इ आय क्रमांक बदलणार्‍याना अटकनी आयएमइआय क्रमांक दिलेले असतात. या आय एम इ आय क्रमांकाच्या साहाय्याने पोलीस चोरीला गेलेल्या मोबाईलचा मागोवा घेऊ शकतात. पोलीसांचा पिच्छा सोडविण्यासाठी चोर चोरलेल्या मोबाईलचा आयएमइआय क्रमांक बदलून मग तो विक्री करतात. अशा गैरधंदा करणार्‍या टोळीला पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नालासोपारा (पूर्व) येथून अटक ... Read More »

वाड्यात शिवजयंती उत्साहात साजरी

Vada News 3

प्रतिनिधी वाडा, दि. 18: वाडा शहर शिवसेना शाखेच्या वतीने आज शिवजयंती उत्सव गुलाल उधळत ढोलताश्यांच्या गजरात, मोठ्या जल्लोषात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनूसार दरवर्षी अक्षयतृतीयेला शिवसेना वाडा शहर शाखेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात येते. शहरातील गणेश मैदान येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे सर्व उपस्थित मान्यवरांनी पूजन करून महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रमा दरम्यान कार्तिकी ... Read More »

Scroll To Top