दिनांक 21 May 2019 वेळ 11:14 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » April

Monthly Archives: April 2018

मातृभूमी आदिवासी सेवाभावी संस्था यांची सर्वसाधारण सभा संपन्न 

प्रतिनिधी                 जव्हार, दि. ३० : मातृभूमी आदिवासी सेवाभावी संस्था वाडा यांची सर्वसाधारण सभा आज जव्हार येथील आदिवासी भवन येथे पार पडली या सभेत आदिवासीच्या प्रश्नांवर तसेच पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली.              अध्यक्ष मधुकर राऊत यांनी भूषविले. प्रथम क्रांतीकारकांच्या प्रतिमेला हार व श्रीफळ वाहून पूजा करून कार्यक्रमाची ... Read More »

युपीएससी मध्ये पालघर जिल्ह्यातून वाड्याचा एकमेव हेमंत पाटील यशस्वी

प्रतिनिधी             वाडा, दि. २९ :- केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी)२०१७  या वर्षाचा निकाल शुक्रवारी जाहिर झाला. वाडा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या मौजे शिलोत्तर या खेडेगावातील हेमंत केशव पाटील हा विद्यार्थी देशात ६९६ क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. संपूर्ण पालघर जिल्ह्यात तो एकमेव विद्यार्थी आहे. यापूर्वी सन २०१२ च्या युपीएससी परीक्षेत वाडा तालुक्यातील मौजे पीक येथील चिन्मय पाटील ... Read More »

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात

बोईसर            दि. २९: येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने भाजपला पाठिंबा न देता रिंगणात उमेदवार उतरवायचा ठरविल्यास भाजपसमोर पराभवाची छाया अधिक गडद होऊ शकते. असे असले तरी शिवसेनेला उमेदवार उभा करणे आणि निवडून आणणे म्हणजे सन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी असा प्रकार ठरणार ... Read More »

वाड्यात पुन्हा सापडला बॉम्ब तालुक्यातील सासणे गावातील टेकडीवर सापडला बॉम्ब 

    वाडा, दि. २७: दोनच दिवसांपूर्वी वाडा तालुक्यातील देवळी गावातील शेतात बॉम्ब सापडल्याची घटना ताजी असतानाच तालुक्याती ल सासणे या गावातही दुसरा जिवंत बॉम्ब सापडल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली आहे.             देवळी  गावापासून ४ किलोमीटरवर असणाऱ्या सासणे या गावापासून जवळ असलेल्या प्रफुल्ल गवळी यांची बागायत असलेल्या एका टेकडीवर हा जिवंत बॉम्ब असल्याची माहिती शुक्रवारी ( ... Read More »

पालघर लोकसभा मतदारसंघ निवडनुक : प्रथमच व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर होणार

वार्ताहर            बोईसर, दि. २७ : पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार अँड चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २८ मी रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत ईव्हीएम मशीनशी व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर करण्यात येणार असून निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी विविध समित्यांचे गठन केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.   ... Read More »

इस्काॅन संस्थेने विद्यार्थ्यांना दिले विज्ञान व गणिताचे विशेष प्रशिक्षण

प्रतिनिधी              कुडूस, दि, २७ : वाडा तालुक्यातील गालतरे येथे गोवर्धन इको व्हिलेज इस्काॅन ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या शिक्षण विभागांतर्गत गणित व विज्ञान विषय सोप्या व अचूक पद्धतीने कमी वेळात समजून कसा घ्यावा व प्रश्नांची उत्तरे कमी वेळात अचूक  कशी लिहावीत या विषयी तज्ञ प्रशिक्षित शिक्षकांकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले.        ... Read More »

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान

राजतंत्र न्यु नेटवर्क                 दि. २६ : पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार ऍड चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २८ मे रोजी पोटनिवडणूक होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होणार असुन ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. खासदार एड. वनगा यांचे ३० जानेवारी रोजी दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. ... Read More »

पालघरमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

राजतंत्र न्यु नेटवर्क दि. २६ : तालुक्यातील आगवनमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घटना घडली आहे. खुशबी माच्छी आणि सुरक्षा माच्छी अशी मृत मुलींची नावे असल्याचे समजते आहे. बुधवारी दुपारी दोघी तलावात आंघोळीला गेल्या असता पाय घसरल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यावेळी स्थानिकांनी तात्काळ या दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढून धवळे रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघीनांही ... Read More »

बॉम्ब सापडला, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असल्याचा अंदाज

राजतंत्र न्यु नेटवर्क              वाडा, दि. २५ : वाड्यात जीवनात बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे, हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्कराने फेकलेला जीवनात बॉम्ब असल्याचा अंदाज आहे. वाडा तालुक्यातील देवळी गावात जिवंत बॉम्ब सापडला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्कराने केलेल्या सरावाच्या वेळी हा बॉम्ब फेकला असावा, असा अंदाज स्थानिक रहिवाश्यांनी व्यक्त केला आहे. या बॉम्बची तपासणी ... Read More »

कृषी विभागामार्फत २ मी रोजी किसान कल्याण कार्यशाळा

राजतंत्र न्यु नेटवर्क               पालघर, दि. २५ : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट्य ठेवून शासनातर्फे राज्यभरात ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत २ मी रोजी राज्यात सर्व तालुका स्तरावर किसान कल्याण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत कृषी व कृषी संलग्न विभागाशी संबंधित विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये ... Read More »

Scroll To Top