दिनांक 20 January 2019 वेळ 8:34 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » March » 11

Daily Archives: 11/03/2018

१२ मार्च पासून पालघर जिल्ह्यात पोलीस भरती

Maharashtra-Police-job

RAJTANTRA MEDIA १२ मार्च पासून पालघर जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने पोलीस शिपाई पदासाठी भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडीओ कॅमेरांद्वारे नजर ठेवली जाणार असून हे कॅमेरे यूट्यूबशी जोडले जाणार आहेत. यामुळे कोणालाही घरबसल्या भरती प्रक्रियेवर नजर ठेवता येईल. भरती प्रक्रियेसाठी आलेले अधिकारी व कर्मचारी यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदवली जाणार आहे. १६०० मीटर व ... Read More »

त्वरित मदत न दिल्याप्रकरणी बीएआरसीचे फायर ऑफिसरवर गुन्हा

Boisar Novaphene Fire

RAJTANTRA MEDIA बोईसर येथील औद्योगिक वसाहतीत ८ मार्च रोजी रात्री नॉव्हेफेन व अन्य ५ रासायनिक कारखान्यांना आग लागल्याप्रकरणी त्वरित मदत न दिल्याच्या आरोपाखाली पालघरच्या जिल्हाधिकारी यांनी भाभा अनु संशोधन केंद्राचे अग्निशमन अधिकारी बोरकर यांचे विरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आगीत ३ जणांचा मृत्यू झाला होता. आग लागल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बोरकर यांना फोन केला असता त्यांनी, मला वरिष्ठांच्या ... Read More »

सूर्या पाणी बचाव आंदोलन समितीने सर्वेक्षणाचे काम बंद पाडले

Surya Andolan

सूर्या प्रकल्पाचे पाणी बाहेर वळविण्यास स्थानिकांच्या असलेल्या विरोधास न जुमानता धरणा नजीक सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले होते. हे कळताच स्थानिक ग्रामस्थांना सूर्या बचाव आंदोलन समितीने बळ देऊन काम बंद पाडले. तेथील सर्व मशिनरी हुसकावून लावण्यात आली. यावेळी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, जितेंद्र राऊळ, पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, पांडुरंग बेलकर, स्थानिक सरपंच शिवराम काकड, वेती वनहक्क समितीचे प्रकाश हाडळ उपस्थित होते. Read More »

संजय पाटील यांची शिक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Sanjay Patil

डहाणू दि. ११: येथील माजी नगरसेवक संजय पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पाटील हे स्वतः शिक्षक असून सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. यापूर्वी ते डहाणू नगरपरिषदेचे सदस्य होते. सध्या त्यांच्या पत्नी शिवसेनेतर्फे डहाणू नगरपरिषद सदस्य आहेत. Read More »

Scroll To Top