दिनांक 16 January 2019 वेळ 3:37 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » March (page 5)

Monthly Archives: March 2018

रविवारी नरपडची साईबाबा यात्रा 

IMG-20180322-WA0002

डहाणूतील नरपडच्या साईबाबा मंदिर येथे सालाबादप्रमाणे श्री रामनवमी निमित्त रविवार, दिनांक 25 मार्च 2018 रोजी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व बंधूभगिनी व साई भक्तांनी श्री साई दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन साईनाथ संस्कृतीक ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर भिकाजी राऊत यांनी केले आहे. या दिवशी पहाटे 4:30 वाजता काकड आरती, दुपारी 12:39 वाजता रामजन्मउत्सव व आरती, संध्याकाळी 7:30 वाजता साईबाबाची आरती असा कार्यक्रम असल्याचेही राऊत यांनी ... Read More »

रोजगार हमीच्या कामावरून २ गटात मारामारी

राजतंत्र न्युज नेटवर्क वाडा, दि.२१ तालुक्यातील योगदा ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव येथे रोजगार हमीच्या काम मागणी पत्रात नावे का घेतली नाही? याचा जाब विचारल्याने झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत होऊन रात्रीच्या सुमारास जखमी झालेल्या तब्ब्ल ९ जणांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर वडापाडा व आसपासच्या परिसरातील शेकडो मजुरांनी वाडा पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. मंगळवारी (दि. २०) रात्री आठ ... Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत

राजतंत्र न्युज नेटवर्क     डहाणू, दि .21:  तालुक्यातील कसा येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असुन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाणेडे येथे रहावयास असलेल्या पीडित मुलीसोबत ९ फेब्रुवारी रोजी आरोपीने हे कृत्य केले. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिल्याने पीडितेने यावर मौन बाळगले ... Read More »

पालघर : मुजोर प्रवाशाची महिला एसटी कंडक्टरशी गैरवर्तणूक

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि . २१ मुजोर प्रवाशाची महिला एसटी कंडक्टरशी गैरवर्तणूक करून तिच्या कानशिलात लगवणाऱ्या मुजोर प्रवाशाला पालघर पोलीसांनी अटक केली आहे. पालघर एसटी आगाराकडून रात्री ९. ४५ वाजता स्टेशन ते सातपाटी बस सेवा पुरवली जाते. मुंबईहून येणारी लोकशक्ती एक्स्प्रेस ट्रेन अनेकवेळा पालघर स्थानकात उशिरा पोहोचत असल्याने व हि बस सुटल्यानंतर या मार्गावर दुसरी बस फेरी नसल्याने या ... Read More »

वाडा : कुडूस येथे महिला मेळावा संपन्न

प्रतिनिधी दि. २१ एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत कुडूस येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . पालघर जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती धनश्री चौधरी यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन झाले. वाडा एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत कुडूस हा दुसरा भाग आहे. या विभागाच्या सभागृहात या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्र्विनी शेळके, उपसभापती नंदकुमार पाटील, ... Read More »

बहिणीचा अंतिम संस्कार करून दिला 10 वी चा पेपर

डहाणू तालुक्यातील नरपड येथील अ. ज. म्हात्रे विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मोठ्या बहिणीचे निधन झाल्यानंतरही शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे त्याने १० वीची परीक्षा दिली आहे. कु.अजय कलंगडा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अजयची मोठी बहीण अंजली हिचे 20 मार्च रोजी रात्री 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. अजयच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे. अजयची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. अजय अ. ज.म्हात्रे ... Read More »

उद्या शरद पवार डहाणू दौऱ्यावर

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार हे उद्या, २४ मार्च रोजी डहाणू येथे येत असून ते विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधणार आहेत. डहाणू औष्णिक विज प्रकल्पातील सभागृहात सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते लोकांना उपलब्ध असतील. डहाणू तालुक्यावर उद्योगबंदी लादणारी १९९१ ची केंद्र सरकारची अन्यायकारक अधिसू्चना रद्द करण्यासाठी अनुभवी नेतृत्व असलेल्या शरद पवार यांच्या उपलब्धतेचा लोकांनी लाभ उठवावा असे आवाहन माजी ... Read More »

बोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

बोईसर, दि. २१ : स्वच्छ व सुंदर शहर कोणाला नकोय. मात्र वाढत्या नागरिकरणातून निर्माण होणारे प्रश्न सोडविणे ग्रामपंचायतसारख्या मर्यादित अधिकार, अपूरा निधी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवाक्याबाहेरचे बनले आहेत. त्यामुळे  बोईसर व त्या लगतच्या  परिसरातील   कचऱ्याचा प्रश्न  गहन बनला आहे. या परिसरात कचरा टाकण्यासाठी डंपींग ग्राउंड नसल्याने कचरा नेमका टाकावा कुठे? यावरून परिसरातील ग्रामपंचायतींचे आपसात वाद उभे ठाकलेत. त्यामुळे ... Read More »

वावटळीमुळे शाळेचे छप्पर कोसळले ; सुदैवाने विद्यार्थी बचावले

20180321_130755

प्रतिनिधी वाडा, दि. २१ : येथील सोनारपाडा ह्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छप्पर हवेच्या जोरदार वावटळीत लोखंडी कैचीसह  उन्मळून कोसळले गेल्याने शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे , मात्र ह्या घटनेच्या काही क्षण आधी शाळा सुटण्याच्या सुमारास विद्यार्थी व शिक्षक वर्गाबाहेर पडल्याने बचावले.            वाडा शहराच्या हद्दीतील सोनारपाडा ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन इमारती आहेत. शाळेच्या ... Read More »

रोजगार हमीच्या कामावरून दोन गटात हाणामारी

प्रतिनिधी   वाडा, दि. २१ : तालुक्यातील ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील वडपाडा येथे रोजगार हमीच्या काम मागणी पत्रात  आमची नावे का घेतली नाही याचा जाब विचारल्याने झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत होऊन रात्रीच्या सुमारास जखमी झालेल्या तब्बल नऊ जणांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर वडपाडा व आसपासच्या परिसरातील शेकडो मजुरांनी वाडा पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.     मंगळ्वारी ... Read More »

Scroll To Top