दिनांक 20 January 2019 वेळ 9:32 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » February

Monthly Archives: February 2018

शब्दांना समजून घेऊन त्यांचा तारतम्यांने वापर करावा! – सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका सौ. दिपाली केळकर

DSC_2172

प्रत्येक शब्दाला स्वतःचे असे व्यक्तिमत्व असते. त्याचा स्वतंत्र असा स्वभाव असतो. शब्दांना समजून घेऊन त्यांचा तारतम्यांने वापर करावा असे प्रतिपादन दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका सौ. दिपाली केळकर यांनी पालघर येथे बोलताना केले. त्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या मराठी वाड्.मय मंडळातर्फे ‘मराठी राजभाषा दिनानिमित्त’ ‘आयोजीत शब्दांच्या गावाची सैर’ या कार्यक्रमात बोलत होत्या. शब्दांच्या गावाची सफर घडविताना शब्दांचे अर्थ हे संदर्भानुसार, व्यक्तिनुसार बदलतात, काही शब्द ... Read More »

लाच घेताना सरकारी वकिलावर झडप 

राजतंत्र मिडीया पालघर, दि. २७: कोर्टात आरोपीच्या विरोधात कमजोर युक्तिवाद करुन अनैतिकरित्या साहाय्यभूत भूमिका घेणाऱ्या सरकारी वकिलावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली आहे. दिनेश संतोष पाटील असे या वकिलाचे नाव आहे. दिनेश हा पालघर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सरकारी वकिल म्हणून काम पहात होता. मनोर (पालघर तालुका) येथे रहाणाऱ्या एका इसमाच्या विरोधात या न्यायालयात विनयभंगाच्या आरोपाखाली खटला सुरु ... Read More »

समायोजनातील गैरव्यवहाराप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई

प्रतिनिधी पालघर, दि. २७  : अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील ८०  परिचर (शिपाई) यांना पालघर जिल्हा परिषदेत सामावून घेताना मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाला असून, शासन निर्णयाला बगल देत समायोजन प्रक्रिया राबविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी आपले हितसंबध जोपासत ह्या परिचर कर्मचाऱ्यांना नियुक्त्या दिल्याने ह्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. ह्या प्रकरणाची खात्याअंतर्गत चौकशी केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी ... Read More »

नाशिकच्या इंडोकिड्स प्रि स्कूल कडून आदिवासी भागात वस्तू वाटप

FB_IMG_1519788241342.jpg

राजतंत्र मिडीया जव्हार, दि. २७ फेब्रुवारी: बालपणापासूनच सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी या उद्देशाने एक प्रकल्प म्हणून नाशिक येथील इंडोकिड्स या नामांकित पूर्व प्राथमिक शाळेतर्फे जव्हार तालुक्यातील आदिवासी भागात विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुलांकडून व त्यांच्या पालकांकडून जूने / नवे कपडे व वापरात नसलेल्या वस्तू जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. जमा झालेले जुने कपडे ... Read More »

मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईला सुरूवात, १३ गांवांमध्ये टंचाईसदृष परिस्थिती मात्र पुरवठा विभागाची हरकत

Mokhada

दीपक गायकवाड-मोखाडा-तालुक्यात दरवर्षी माहे जाने – फेब्रूवारी पासुनच पाणी टंचाईला सुरूवात होत असते.चालु वर्षी १३ गांवांमध्ये पाणी टंचाईला सुरूवात झालेली असून मौजे करोळ आणि वावळ्याचीवाडी येथे टिपवणं सदृष परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी पाणी टंचाई ग्रस्त गांवांची संख्या नव्वदीच्या घरात होती.या वर्षीही हा आकडा कायम रहाण्याचे चिन्हं आहेत.कारण हंगामी उपाययोजणे व्यतिरिक्त तालुक्यातील टंचाईग्रस्त गांवांसाठी हुकमी उपाययोजणा केली जात ... Read More »

पदावनती झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

IMG-20180223-WA0065

प्रतिनिधी बोईसर, दि. २३ : राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने ३१ जुलै २०१७ रोजी काढलेल्या  शासन निर्णयानुसार बदल्या व  अनुषंगिक आदेश रद्द करण्याचा स्पष्ट सूचना दिल्या असताना पालघर जिल्हा परिषदेच्या  सामान्य प्रशासन विभागाने केवळ पदोन्नतीचे  आदेश रद्द केले.  त्यामुळे पदोन्नती दिलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना पदावनत करण्यात आले. याविरोधात  कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ( दि. २३ ) जिल्हा  परिषद मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.       ... Read More »

संत निरंकारी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

RAJTANTRA MEDIA/ संजय लांडगे  वाडा, दि. २३ :संत निरंकारी महाराज यांच्या ६४ व्या जयंतीनिमित्त   त्यांच्या भक्तांनी शहरात स्वच्छता अभियान राबविले. येथील  बस स्थानकातून स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पंचायत समिती परिसर, पोलीस ठाणे,तहसील कार्यालयाचा परिसर तसेच आगर आळी  या परिसरात स्वच्छता करण्यात आली.  त्यानंतर स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या भक्तांसाठी संजय गांधी नगर ... Read More »

वाड्यात पावणे दोन लाखाचा गुटखा जप्त

Wada

RAJTANTRA MEDIA/दिनेश यादव वाडा, दि. २३: अवैधपणे गुटख्याची  वाहतूक करणाऱ्या झायलो हे  वाहन वाडा येथे  बोईसर येथील स्थानिक गुन्हे शाखेने  सापळा रचून पकडले. यावेळी दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले असून पकडलेल्या मालाची सुमारे पावणे दोन लाख रुपये किंमत असल्याचा अंदाज पोलिससूत्रांनी वर्तविला असून अवैध गुटख्यासह गुन्ह्यात वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली झायलो गाडीही जप्त करण्यात आली आहे. अनधिकृत गुटखा वाहतूक करणाऱ्या ... Read More »

बांधकाम कामगारांच्या योजनांचा लाभार्थीनी लाभ घ्यावा! – विकास माळी.

Kudus

राज्य शासनाने बांधकाम कामगारांसाठी अठ्ठाविस लाभकारी योजना घोषित केल्या आहेत. त्यांचा लाभ घेवून आपले कुटूंब सुखी होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. असे प्रतिपादन सहाय्यक कामगार आयुक्त विकास माळी यांनी कुडूस येथे आयोजित कामगार मेळाव्यातुन केले. Read More »

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 12 लाखांचा गुटखा पकडला

Guthaka

RAJTANTRA MEDIA/झबी राऊत मनोर, ता. 22 : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव हद्दीत मनोर पोलिसांनी सापळा रचून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला असुन 12 लाख 28 हजार 140 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी टेम्पोचालकाला अटक केली असुन जप्त केलेला गुटखा अन्न व औषध विभागाच्या ताब्यात दिला आहे. 18 फेबु्रवारी रोजी मनोर पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे गुजरात राज्यातून ... Read More »

Scroll To Top