दिनांक 21 January 2018 वेळ 4:25 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » January » 12

Daily Archives: 12/01/2018

वाड्याच्या उपनगराध्यक्षपदी ऊर्मिला पाटील यांची बिनविरोध निवड

WADA UPNAGRADHYAKSH

विशेष प्रतिनिधी वाडा : दि. 11 : वाडा नगरपंचायतीत पनगराध्यक्षपदासाठी गुरूवारी (दि. 11) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उर्मिला पाटील बिनविरोध विजयी झाल्या. वाडा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक 13 डिसेंबरला झाली होती. या निवडणुकीत प्रथमच नगराध्यक्षपदाकरिता थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय झाला होता. निवडणूकीत शिवसेना व भाजप यांच्यात खर्‍याअर्थाने लढत होऊन भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निशा सवरा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत शिवसेनेच्या ... Read More »

पोलीस अधिकार्‍याच्या जाचाला कंटाळून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न! तरूणावर अंबाडी येथील रूग्णालयात उपचार सुरू

WADA SUICIDE1

विशेष प्रतिनिधी वाडा : दि. 11 : तालुक्यातील चिंचघर येथील एका तरूणाने शाहुराज रणवारे या पोलीस अधिकार्‍याच्या जाचाला कंटाळून बुधवारी (दि.10) सायंकाळी थायमेट हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरूणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अंबाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरूणाने सुसाईट नोट (आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी) सोशल मिडियावर ... Read More »

टी.डी.सी.सी. बँकेच्या नोकर भरतीत घोटाळ्याचा आरोप चौकशी करण्याची निलेश सांबरेंची मागणी

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी विक्रमगड, दि. 11 : नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती परीक्षेत पारदर्शक नोकर भरतीचे सर्व नियम धाब्यावर बसवून परीक्षा घेतली गेल्याचा आरोप करत या भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था झडपोलीचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या अनेक उमेदवारांचे परिक्षा यादीत नाव नसल्यामुळे त्यांना भरती प्रक्रियेला मुकावे ... Read More »

पालघर : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

JILHA PARISHAD KARYASHALA

पालघर, दि. 11 : नियुक्ती ते निवृत्तीपर्यंत सर्व प्रशासकीय नियमांची माहिती सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला अवगत असणे आवश्यक आहे व त्या नियमांचे सचोटी व कर्तव्यानिशी पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषदच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांनी केले आहे. पालघर जिल्हा परिषद, यशदा पुणे व राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान) यांच्या ... Read More »

डहाणू नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी रोहिंग्टन झाईवाला भरत शहा, विशाल नांदलस्कर व मिहीर शहा स्विकृत सदस्य

cropped-LOGO-4-Online.jpg

राजतंत्र मिडीया नेटवर्क डहाणू दि. 11 : डहाणू नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदावर भाजपचे गटनेते रोहिंग्टन झाईवाला यांची बिनविरोध निवड झाली आहे. स्विकृत नगरसेवक पदावर भाजपचे शहर अध्यक्ष भरत शहा आणि विशाल नांदलस्कर यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिहीर शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने निष्ठावान चेहरा असलेले रोहिंग्टन यांना गटनेता बनविल्यामुळे त्यांना उप नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळेल असे संकेत मिळत होते. ... Read More »

गुरू शिष्य परंपरा जोपासणारा बंध मैत्रीचे माजी विद्यार्थी संघ

BANDH MAITRICHE

प्रतिनिधी : कुडूस, दि. 11 : चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा संघ (ग्रुप) 27 वर्षानंतर प्रथमच एकत्र आला व त्यांनी आपल्या शाळेला संगणकांची भेट देऊन वृणानुबंध व्यक्त केले. ही परंपरा जोपासणार्‍या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. 25 वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर काका काकी झालेले माजी विद्यार्थी एकत्र येतात, आपला दुरावलेला परिचय जवळ येऊन करून घेतात. या स्नेहपूर्ण नात्याने एकमेकांचे ... Read More »

डहाणूत दुकान फोडले 64 हजारांची रक्कम चोरीला

cropped-LOGO-4-Online.jpg

दि. 11 : डहाणू शहरातील इराणी रोडवरील प्रतीक कुंतावाला यांच्या बुट चप्पलच्या दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातून 64 हजाराची रोख रक्कम चोरली आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरट्यांचे चेहरे कैद झाले असून पोलीस या फूटेजवरुन तपास करीत आहेत. एक दिवस आधी घडलेल्या दुसर्‍या एका घटनेमध्ये स्टेशनरोडवरील अन्नपूर्णा पार्क या इमारतीमधील एका ... Read More »

जिजाऊ संस्थेकडून पालघर व ठाणे जिल्ह्यात आज 16 ठिकाणी महारक्तदान शिबीरे

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी विक्रमगड : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोलीच्या विद्यमाने आज, 12 जानेवारी रोजी ठाणे व पालघर जिल्ह्यात तब्बल 16 ठिकाणी एकाच वेळी (सकाळी 9 ते दुपारी 4) महारक्तदान शिबिरांचे आयोजन केले असल्याचे जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील कुडूस, खानिवली, वाडा, झडपोली, मनोर, तलासरी, कासा, उधवा, जव्हार, व मोखाडा या ... Read More »

Scroll To Top