दिनांक 21 January 2018 वेळ 4:25 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » January » 06

Daily Archives: 06/01/2018

नागरिकांनी पोलीस दलास सहकार्य करावे! पालकमंत्री विष्णू सवरा यांचे आवाहन

RESING DAY

वार्ताहर बोईसर, दि. 05 : पोलीस दलामुळे आपण सर्वजण सुरक्षित आहोत याची जाणीव ठेवून नागरिकांनी पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी केले. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त बोईसर येथे नागरी सुरक्षा जागृती अभियान, महिला दक्षता समिती व पोलीस पाटील यांच्या वतीने आयोजित मेळाव्यात सवरा बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, डहाणूचे नगराध्यक्ष ... Read More »

जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठक संपन्न

JILHA AAROGYA SEVA SAMITI

पालघर, दि. 5 : पालघर जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयील नियोजन भवनात संपन्न झाली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, आरोग्य सेवा विभाग मुंबईच्या सहाय्यक संचलिका (वैद्यकीय) डॉ. सुरेखा मेंढे, समितीच्या सचिव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे व जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीचे इतर ... Read More »

जव्हार : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती या विषयावर मार्गदर्शन

JAWHAR NEWS

प्रतिनिधी जव्हार, दि. 05 : गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जव्हार यांच्या वतीने 3 ते 9 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसाठी श्रमसंस्कार हिवाळी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तालुक्यातील कोगदा चंद्रनगर या ठिकाणी हे शिबीर भरविण्यात आले आहे. या शिबिरात युवा पिढीला स्वयंसहायता समूह व रोजगार निर्मिती या विषयी ... Read More »

जव्हार : भारती विद्यापीठ आश्रमशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

JAWHAR BHARTI VIDYAPITH

प्रतिनिधी जव्हार, दि. 05 : जव्हार येथील भारती विद्यापीठ प्राथमिक आश्रमशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ आज, शुक्रवारी भारती विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमास जव्हारचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा गटनेते दिपक कांगणे व यतीन वाघमारे हे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. जरग यांनी पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.कार्यक्रमास मराठी शाळेचे मुख्याध्यापक तखोर ... Read More »

चंद्रकांत भोईर व प्रियांका मोरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी : कुडूस, दि. 05 : वाडा तालुक्यातील चांबळे या शाळेतील शिक्षक चंद्रकांत भोईर व देवघर (गुंज) शाळेतील शिक्षिका प्रियांका मोरे यांना पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चंद्रकांत रामू भोईर यांनी शिक्षक म्हणून 22 वर्षे सेवा केली आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून विविध रोटरी क्लब व संस्थांच्या मदतीने शाळांच्या वर्गखोल्यांचे बांधकाम करून घेऊन शैक्षणिक कामात ... Read More »

विक्रमगड हायस्कूलचे वार्षिक पारितोषीक वितरण व स्नेहसंमेलन संपन्न!

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी : विक्रमगड, दि. 05 : विक्रमगड हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले. यावेळी विक्रमगड हायस्कूल व कला वाणिज्य जुनियर कॉलेज विक्रमगड या महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतीक कार्यक्रम, नृत्य, नाटिका तसेच हँड पेंटिंग प्रदर्शन सादर केले. तसेच यावेळी कला, क्रीडा स्पर्धांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्य पुंडलिक भानुशाली ... Read More »

Scroll To Top