दिनांक 21 January 2018 वेळ 4:25 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » January » 05

Daily Archives: 05/01/2018

आदिवासी बेरोजगारांना मिळाला जव्हार विकास प्रकल्पाकडून रोजगार

WADAPAV STALL ANUDAN

पालघर, दि. 04 : शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत असणार्‍या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या जव्हार कार्यालयाद्वारे आदिवासी लाभार्थ्यांकरीता सन 2016 -17 मध्ये न्युक्लिअस बजेट योजने अंतर्गत वडापाव स्टॉलसाठी अनुदान मंजूर झाले होते. या उत्पन्नवाढीच्या योजनेसाठी जव्हार, मोखाडा, वाडा व विक्रमगड अशा चार तालुक्यातील 11 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. काल, बुधवारी या 11 आदिवासी लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने अनुदानाचा पहिला ... Read More »

वाडा नगर पंचायत : भाजप गटनेते पदी मनिष देहेरकर, तर शिवसेनेच्या गटनेते पदी संदीप गणोरे यांची निवड

cropped-LOGO-4-Online.jpg

वाडा, दि. 4 : शिवसेना तालुका बैठकीत वाडा नगर पंचायतीच्या शिवसेना गटनेते पदी प्रभाग क्रमांक सातमधून निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक संदीप गणोरे यांची एकमताने निवड करण्यात आली असून भाजपच्या तालुका कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक दहामधून निवडून आलेले मनिष देहेरकर यांची निवड करण्यात आली आहे. वाडा नगर पंचायतीच्या निवडणूकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षा व सहा नगरसेवक निवडून आले होते. तर निवडणूकीत प्रमुख ... Read More »

जिल्हास्तरीय प्रश्‍न मंजुषा स्पर्धेत रा. ही. सावे विद्यालयाला जेतेपद

cropped-LOGO-4-Online.jpg

वार्ताहर बोईसर, दि. 04 : बोईसर एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. सदा वर्तक विद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या प्रश्‍न मंजुषा स्पर्धेत तारापूरच्या रा. हि. सावे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून जेतेपद मिळवले आहे. प्राथमिक विभागामध्ये धनश्री वाटकर व देवश्री पांचाळ या विद्यार्थीनींनी प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. तसेच उत्कर्ष विद्याविहारच्या सायली पाटील व पारस बोरसे यांनी द्वितीय तर सफाळ्याच्या राजगुरू ह. म. पंडित ... Read More »

जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरेंना महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार

JILHADHIKARI NEWS

पालघर, दि. 04 : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य करणार्‍यांसाठी देण्यात येणारा महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार पालघरचे जिल्हाधिकारी व उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री प्रा. ... Read More »

जव्हार : स्वीकृत नगरसेवकासाठी सेनेकडून डॉ. विठ्ठल सदगीर यांचे नाव चर्चेत! 11 तारखेला होणार निवड

JAWHAR NAGARPARISHAD SENA

प्रतिनिधी जव्हार, दि. 04 : जव्हार नगरपरिषद निवडणूकीत सेनेने सत्ता स्थापन केली असली तरी स्वीकृत नगरसेवकासाठी त्यांच्या कोट्यात केवळ एकच जागा येणार असल्याने आता स्वीकृत नगरसेवकासाठीही शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र या पदासाठी ग्रामीण भागाचा जनाधार असलेले व कट्टर शिवसैनिक अशी ओळख मिळविलेले जव्हार शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर विठ्ठल सदगीर यांच्या नावाची चर्चा असुन पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ त्यांना मिळणार ... Read More »

भूकंपाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पालघरमध्ये दाखल

cropped-LOGO-4-Online.jpg

पालघर, दि 04 : मागील काही दिवसांपासुन पालघर जिल्ह्यातील जव्हार व विक्रमगडसारख्या ग्रामीण भागात भुकंपाचे धक्के जाणवत असुन या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी तसेच नागरीकांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकारचे पाहणी पथक पालघरमध्ये दाखल झाले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय हवामान खात्यातील (आय.एम.डी) भूकंप तज्ज्ञांचे हे पथक असून त्याला आय.आय.टी. मधील या विषयाचे तज्ज्ञ मदत करणार आहेत. हे पथक पालघरमध्ये दोन ... Read More »

अ. ज. म्हात्रे विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न

MHATRE VIDYALAY SNEHSAMMELAN

डहाणू, दि. 4: स्नेहवर्धन मंडळ संचलीत नरपड येथील अ. ज. म्हात्रे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा स्नेहसंमेलन कार्यक्रम विश्वस्त मंडळ व शालेय समितीचे अध्यक्ष तथा नरपडचे ऋषी तुल्य व्यक्तीमत्व अशोक नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून निवृत्त नायब तहसीलदार विश्वनाथ दामोदर पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष किशोर पाटील, विश्वस्त दिनेश राऊत, शिवनाथ पाटील, ... Read More »

Scroll To Top