दिनांक 21 January 2018 वेळ 4:25 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » January » 04

Daily Archives: 04/01/2018

स्वतःच्या जमिनीकरिता सोहंग कुटुंब झिजवतय कोर्टाच्या पायर्‍या

cropped-LOGO-4-Online.jpg

वार्ताहर बोईसर, दि. 03 : तारापूर औद्योगिक परिसरातील वारंगडे क्षेत्रात असलेल्या विराज प्रोफाइल या कंपनीच्या मालकाने येथील आदिवासी कुटूंबाच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी पालघर सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे स्वतःच्याच जमिनिकरिता या कुटूंबाला न्यायालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागत आहेत. वारंगडे येथील सर्वे नं. 63 वर असलेली 111 गुंठे जमिन माधव झिंनका सोहंग (धोंडी) या आदिवासी कुटूंबांच्या हिश्श्याची असुन हे कुटूंब या ... Read More »

विलास मुकणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

VILAS MUKNE

प्रतिनिधी वाडा, दि. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा धापड येथे कार्यरत असलेले शिक्षक विलास मुकणे यांना राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. शिक्षक म्हणून आपल्या सेवेच्या कालावधीत शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी चांगले काम करणार्‍या शिक्षकांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून वाडा पंचायत समितीमार्फत दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. नुकत्याच तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या ... Read More »

प्रवर्तक फाऊंडेशन मार्फत आयोजित सावित्रीबाई फुले जयंती उत्सव संपन्न!

SAVITRIBAI FULE JAYANTI-WADA

प्रतिनिधी वाडा, दि. 03 : महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून देणार्‍या पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जयंतीनिमित्त वाड्यातील ग्रामीण रूग्णालयाच्या प्रांगणात प्रवर्तक फाऊंडेशनमार्फत आयोजित विशेष कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगरसेविका वर्षा गोळे यांनी भुषवले. याप्रसंगी वाडा सहपोलिस उपनिरीक्षक ... Read More »

जव्हार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 187 वी जयंती साजरी

SAVITRIBAI FULE JAYANTI-JAWHAR

प्रतिनिधी जव्हार, दि. 03 : तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान) हे ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता गटासोबत काम करीत असून यामुळे अनेक क्षेत्रांतून आज महिला पुढे येत असुन विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. हे सर्व काम उमेदच्या माध्यमातून सुरु आहे. यामध्ये जव्हार तालुक्यातील कृषी सखी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज कृषीसखीची आढावा सभा आयोजित केली ... Read More »

रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी

ROJGAR HAMI BHARTI

प्रतिनिधी विक्रमगड, दि. 03 : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात तांत्रिक सहाय्यकाच्या 10 व कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकार्‍यांच्या 10 अशा एकुण 20 जागांची कंत्राटी पद्धतीवर थेट तोंडी परीक्षेच्या माध्यमातून भरती करण्यात येत आहे. या जागांसाठी अनेक जिल्ह्यातून उमेदवार तोंडी परिक्षेसाठी 2 जानेवारी रोजी आले होते. यातील तांत्रिक सहाय्यक पदासाठी एकूण 183 अर्ज दाखल झाले असुन त्यात पालघर ... Read More »

मोखाड्यातील मनरेगावर शासकिय अनास्थेची संक्रांत यंत्रणा व ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष 111 कामे, 1608 मजूर यंदाची संक्रांत हलाखीत

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी मोखाडा, दि. 03 : तालुक्यात मनरेगाची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. शासकिय अहवालानुसार तालुक्यात केवळ 111 कामे सुरू असून 1608 मजूरांच्या हाताला कामे देण्यात आली आहे. त्यातच संक्रांतीपूर्वी एकाही हजेरी पत्रकाचा पगार होण्याची शाश्‍वती नसल्याने मजूरांची संक्रांत हलाखीची आणि कडवट होणार असल्याचेच चित्र आहे. मोखाडा तालुक्यात रोहयो अंतर्गत 16 हजार 502 जॉबकार्डांची नोंदणी झालेली असून 1 हजार 445 ... Read More »

किरण थोरात रक्तकर्ण पुरस्काराने सन्मानित

KIRAN THORAT

वाडा दि. 1 : वाडा शहरातील बहुतांश सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व गेल्या 25 वर्षात 63 वेळा रक्तदान करणारे प्राध्यापक किरण थोरात यांना ठाण्यातील रक्तानंद ग्रूप महाराष्ट्र राज्य च्या वतीने 31 डिसेंबरला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तकर्ण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. एकीकडे आजची पिढी 31 डिसेंबरच्या रात्री इंग्रजी नववर्षाच्या आगमनासाठी मौज मजा, ... Read More »

वाडा तालुक्यात कडकडीत बंद; कुडूसमध्ये भिमसैनिकांचा रास्ता रोको

BHIMA KOREGAON-wada

प्रतिनिधी वाडा, दि. 3 : भिमा कोरेगाव येथे दोन गटातील वादाला हिंसक वळण लागल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. यामुळे पालघर जिल्ह्यासह वाडा तालुक्यातही उस्फूर्त बंद पाळण्यात येवून या घटनेचा जाहिर निषेध करण्यात आला. तालुक्यातील कुडूस येथील आंबेडकरांच्या अनुयायांनीही कुडूस येथे बंद पाळून रास्ता रोको आंदोलन केले. वाडा व कुडूस बंदमध्ये येथील व्यापार्‍यांनी आपली दुकाने शंभर टक्के बंद ठेवल्याने ... Read More »

पालघर जिल्ह्यात कडकडीत बंद पालघर स्थानकात रेल्वे रोखून केली निदर्शने

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी पालघर, दि. 3 : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर अभिवादनाकरिता आंबेडकरी अनुयायी गेले असता निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अन्याय झाल्याच्या भावनेतून भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला पालघर जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील आंबेडकरी विचारधारेच्या सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा देत पुकारलेल्या या बंदला येथील व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळून या घटनेबाबत ... Read More »

कुडूसमध्ये बंदला प्रतिसाद

BHIMA KOREGAON-Kudus

प्रतिनिधी : कुडूस, दि. 03 : भिमा कोरेगाव येथे दोन गटातील वादाला हिंसक वळण लागल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातून उस्फूर्त बंद पाळण्यात आला आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कुडूसमध्ये देखील बंद पाळण्यात आला. कुडूस बंदमध्ये स्थानिक व्यापारी संघटना सामील झाल्याने येथील सर्व बाजारपेठेत शुकशुकाट होता. स्थानिक भाजीपाला, फळविक्रेते यांचेही धंदेही आज बंद होते. ... Read More »

Scroll To Top