दिनांक 21 October 2018 वेळ 1:47 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » January

Monthly Archives: January 2018

खासदार अ‍ॅड. चिंतामण वणगा यांचे निधन

CHINTAMAN VANAGA NIDHAN

राजतंत्र न्यूज नेटवर्क पालघर, दि. 30 : पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वणगा यांचे आज दिल्ली येथे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांना राममनोहर लोहिया (दिल्ली) रुग्णालयात दाखल करून उपचार केले जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्ह्यामध्ये दुख:चे सावट पसरले. दिल्लीहुन त्यांचे पार्थिव विमानाने मुंबई येथे आणण्यात येणार असून अंत्यदर्शनसाठी ... Read More »

डहाणूत विधी सेवा शिबिर संपन्न 4 हजारपेक्षा अधिक लोकांना लाभ

VIDHI SEVA SHIBIR

शिरीष कोकीळ डहाणू दि. 30: शासनामार्फत चालवल्या जाणार्‍या विविध योजनांचे एका छताखाली लाभार्थ्यास प्रत्यक्ष व थेट लाभ मिळवून देण्यासाठी गरजु लोकांना योजनेशी जोडणारे शिबीर डहाणू तालुक्यात आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (दिल्ली), महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई), जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आणि डहाणू व तलासरी तालुका विधी सेवा समितीमार्फत आज नरेशवाडीच्या के. जे. सोमय्या माध्यमिक ... Read More »

कुणबी स्नेहसंमेलनाचा शानदार समारोप जोश, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरांनी भारले संमेलनाचे तीन दिवस

KUNABI SNEHSAMMELAN2

कुणबी स्नेहसंमेलनाचा शानदार समारोप जोश, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरांनी भारले संमेलनाचे तीन दिवस उस्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसात दोन लाखांची उपस्थिती विशेष प्रतिनिधी वाडा, दि. 29 : वाडा तालुका कुणबी समाजाच्या वतीने आयोजीत विविध सांस्कृतिक परंपरा दर्शवणार्‍या चौथ्या कुणबी स्नेह संमेलनाचा उत्साह व जोशपूर्ण वातावरणात शानदार समारोप झाला. दि. 26, 27 व 28 जानेवारी दरम्यान आयोजित या स्नेहसंमेलनात उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत ... Read More »

डहाणू : 13 जानेवारीच्या समुद्रातील दुर्घटनेत बचाव कार्य करणार्‍या शुर विरांचा प्रजासत्ताक दिनी घडला भव्य नागरी सत्कार

DAHANU DURGHATNA SATKAR1

राजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू दि. 26 : काही दिवसांपूर्वीच डहाणूच्या समुद्र किनार्‍या नजिक बोट उलटून झालेल्या अपघातात बचावकार्य करणार्‍या 145 जणांचा राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विष्णू सवरा यांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आनंद ठाकूर, आमदार पास्कल धनारे, आमदार अमित घोडा, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत उपस्थित होते. डहाणू तालुका विकास परिषदेसह पालघर जिल्हा ... Read More »

दांडेकर महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान

DANDEKAR NEWS

पालघर, दि. 28 : येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयास 2016-17 सालचा मुंबई विद्यापीठाचा प्रतिष्ठीत सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (ग्रामीण विभाग) दि. 26 जानेवारी 2018 रोजी मुंबई विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने पालघर ग्रामीण भागात केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेवून मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाचा गौरव केला आहे, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष ... Read More »

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच माहितीचा अधिकार -संजीव जोशी

sanjiv

दि. 27 : भारतीय राज्यघटनेतील प्रकरण 3 मधील कलम 19 अन्वये देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळालेला आहे. या अधिकाराचा खर्‍या अर्थाने वापर करायचा असेल तर योग्य आणि पुरेशी माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. यातूनच आपल्याला माहितीचा अधिकार मिळाला. आणि म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये सक्षम नागरिक म्हणून जगण्यासाठी प्रत्येकाने भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला पाहिजे, लोकशाही व्यवस्था समजून घेतली पाहिजे आणि ... Read More »

गोधडी शिवणे प्रशिक्षण योजनेद्वारे महिलांसाठी रोजगार निर्मिती

GODHDI YOJNA

प्रतिनिधी : जव्हार, दि. 23 : जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित, आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी गोधडी शिवणे प्रशिक्षण योजना जिल्हा परिषद व महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असुन आजपासुन जव्हारसह जिल्ह्यातील 5 तालुक्यामंध्ये ही प्रशिक्षण कार्यशाळा सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत तयार झालेल्या गोधड्या ... Read More »

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात संवाद भाईजीसे कार्यक्रम संपन्न भविष्यासाठी जलसाक्षरता आणि जलउपयोग दक्षता वाढविणे गरजेचे -जलतज्ञ राजेंद्र सिंह

DANDEKAR-SANVAD BHAIJISE

पालघर, दि. 21 : पाणी वापराच्या संदर्भात आजवर कोणताही ठोस कायदा झाला नसून भारतातील नागरिकांनी जलसाक्षरता आणि जलउपयोग दक्षता वाढविली पाहीजे, तरच भावी काळ आपला असेल, असे प्रतिपादन भारताचे जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी काढले. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जलप्रबोधन होण्याकरिता संवाद भाईजीसे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास दांडेकर महाविद्यालय व पालघर परिसरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या ... Read More »

क्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

CREDO RAKTDAN

दि. 21 : डहाणूतील सीबीएसई अभ्यासक्रमाची पहिली शाळा ठरलेल्या क्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील 45 लोकांनी रक्तदान केले. रक्तदानासंबधी जनजागृती व्हावी व मुलांमध्ये सुरुवातीपासूनच तसे संस्कार व्हावे या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती शाळेचे संचालक मिहीर शहा यांनी दिली आहे. Share on: WhatsApp Read More »

डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांना लाच स्विकारताना अटक

VINOD DAVLE

दि. 19 : डहाणू नगरपालिका परिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले (51) यांना 95 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून उद्या पालघर येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डहाणू नगरपरिषदेत अलीकडेच सत्ता स्थापन करणार्‍या भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. डवले हे भाजपच्या मर्जीतले मानले जात होते. विनोद डवले यांनी यापूर्वी 2 वेळा मुख्याधिकारी ... Read More »

Scroll To Top