दिनांक 18 December 2017 वेळ 3:08 AM
Breaking News
You are here: Home » 2017 » December » 01

Daily Archives: 01/12/2017

एका व्यासपिठावर येणार डहाणू तालुका विकास परिषदेचा उपक्रम

WADA NAGARPANCHAYAT LEKH 1 Pic1

राजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू दि. 30: येत्या 13 डिसेंबर रोजी डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. या निवडणूकीमध्ये लोकशाहीला पोषक वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने डहाणू तालुका विकास परिषदेतर्फे नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवकपदासाठी निवडणूक लढविणार्‍या सर्व पक्षांच्या उमेदवारांना 2 डिसेंबर रोजी एकाच व्यासपिठावर आणून चर्चा घडवून आणण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाविषयी लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या आधी देखील ... Read More »

मोखाडा : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

MOKHADA SHAISHANIK SAHITYA

प्रतिनिधी मोखाडा, दि. 30 : रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना श्री तुंगारेश्‍वर महादेव सेवा समिती, भाईंदर यांच्यावतीने मोफत वह्या व इतर शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी तुंगारेश्वर महादेव सेवा समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे देणगी समिती प्रमुख तथा माध्यमिक शिक्षक तुकाराम लोंढे यांनी केले. आश्रमशाळा ... Read More »

वाड्याच्या व्यापार्‍यांचा प्लास्टिक पिशवी मुक्तीचा संकल्प व्हॉट्सअ‍ॅप गृपच्या आवाहनाचे व्यापार्‍यांनी केले स्वागत;

WADA PISHVI

प्रतिनिधी वाडा, दि. 30 : सर्वत्र प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे होणार्‍या अस्वच्छतेमुळे वाडा शहराला बकाल स्वरूप आले आहे. जागोजागी कचर्‍याच्या ढिगांमध्ये प्लास्टिक पिशव्या दिसत असून प्लास्टिकपासून पर्यावरणाला अधिक धोका असल्याने वाड्यातील आपला वाडा सोशल ग्रुप या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने याबाबत जनजागृती करत प्लॅस्टिक पिशवी वापरावर बंदीचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील व्यापारी वर्गातील काही प्रमुख मंडळींनी प्लास्टिक पिशवीचा वापर बंद ... Read More »

जेष्ठ शिवसैनिक नितीन म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश

प्रतिनिधी वाडा, दि. 30 : वाडा नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून शिवसेनेचे जेष्ठ शिवसैनिक व वाडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नितीन बळीराम म्हात्रे यांनी गुरुवारी (दि.30) आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेश कमिटी सदस्य बाबाजी काठोळे, तालुअध्यक्ष संदीप पवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निशा सवरा यांसह अन्य मान्यवर उपस्थित ... Read More »

मनसेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अस्मिता शितोळेंची निवडणुकीतून माघार नगरसेवकपदाच्या 8 उमेदवारांचे अर्ज मागे

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी वाडा, दि. 30 : वाडा नगरपंचायतीसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवारी (दि. 30) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अस्मिता शितोळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर नगरसेवक पदाच्या 8 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. वाडा नगरपंचायतीची येत्या 13 डिसेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाकरिता 6 वैध उमेदवारी अर्ज दाखल ... Read More »

वाड्यातील विकासाअभावी भाजपची कोंडी

cropped-LOGO-4-Online.jpg

वाडा, दि. 30 : वाडा शहाराला नागरी समस्यांनी घेरले आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता या प्रमुख नागरी समस्या सोडविण्यात भाजपचे विद्यमान मंत्री विष्णू सवरांना आलेल्या अपयशामुळे येत्या 13 डिसेंबरला होत असलेल्या वाडा नगरपंचायतीच्या निवडणूकीत भाजपची पूरती कोंडी झाली असून मतदारांपुढे कोणता विकासाचा अजेंडा घेऊन जायचा? असा यक्षप्रश्‍न उभा ठाकला आहे. वाडा शहराने कायम भाजपवर विश्वास दाखवत विद्यमान मंत्री विष्णू सवरांना सलग ... Read More »

वाडा : ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन भाजपाचा प्रचाराचा शुभारंभ

WADA BHAJAP PRACHAR

प्रतिनिधी वाडा दि. 30 : नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) वाड्यातील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. वाडा नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी व 17 वॉर्डातील नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांना शिस्तबद्ध पद्धतीने तिकीट वाटप करून पक्षशिस्त दाखवून दिली आहे. तर त्यामानाने इतर पक्षात तिकीट वाटप व उमेदवारीबाबत गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले. प्रचाराबाबतही भाजपाकडून नियोजनबद्ध ... Read More »

अधिकार्‍यांच्या बेपर्वाईने अशिलांचा खोळंबा

WADA ADHIKARI BEPARVA

प्रतिनिधी वाडा. दि. 30 : वाडा तालुक्यातील शेतकर्‍यांचे शेती विषयक विविध दावे वाडा तहसिल कार्यालयात दाखल आहेत. तहसिल कार्यालयाने या दाव्यांच्या सुनावणीसाठी 30 नोव्हेंबर ही तारिख दिली होती. यानुसार असंख्य शेतकरी आज सकाळी 10 वाजल्यापासून तहसील कार्यालयात सुनावणी करिता हजर होते. मात्र नगरपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम तारीख असल्याने या दाव्यांची सुनावणी झालीच नाही. त्यामुळे सकाळपासून सायंकाळी ... Read More »

अथर्व मित्र मंडळातर्फे नवोदितांसाठी सूत्रसंचालन कार्यशाळा

SUTRASANCHALAN KARYASHALA

पालघर, दि. 30 : विविध कार्यक्रमांत सुसूत्रता आणण्यासाठी व दर्जा वाढविण्यासाठी नवोदित सूत्रसंचालकांना मार्गदर्शन व्हावे, या हेतूने अथर्व मित्र मंडळ (पालघर) व नॉलेज ब्रीज फाउंडेशन (अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चाफेकर महाविद्यालयात एक दिवसीय सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत पालघर जिल्ह्यातील राज्यस्तरावर कार्यशाळा घेणारे मुलाखतकार व सूत्रसंचालक जतिन कदम व प्रतिभा क्षीरसागर-कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष रवींद्र ... Read More »

जव्हारमध्ये निवडणूक निरीक्षकांची पाहणी; निवडणूक कामाची लगबग सुरू

JAVHAR NIVADNUK PAHANI

प्रतिनिधी जव्हार, दि. 30 : जव्हार नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असुन जसजशी निवडणूकीची तारीख (13 डिसेंबर) जवळ येत आहे. तसतशी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. निवडणूक निरीक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी (जव्हार मुख्यालय) सतिष देशमुख यांनी काल, बुधवारी सर्व मतदान केंद्रांना भेटी दिल्या. तसेच प्रभाग, हद्दी, कायदा व सुव्यवस्था, दारूबंदी, निवडणूक साहित्य याविषयी माहिती घेतली. ... Read More »

Scroll To Top