दिनांक 23 January 2018 वेळ 3:14 AM
Breaking News
You are here: Home » 2017 » December (page 5)

Monthly Archives: December 2017

समर्थकांना उमेदवारी देणे शिवसेनेच्या अंगलट

WADA NIVADNUK VISHLESHAN -2

वैभव पालवे वाडा, दि. 21 : नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपसारख्या बलाढ्य शक्ती समोर लढाई करून नगराध्यक्षपदासह सहा नगरसेवकांच्या जागा जिंकून भाजपला शह देण्यात यश मिळवलं असलं, तरी शिवसेनेला मंत्री सवरांविरोधातील जनमानसात असलेल्या नाराजीचा फायदा झाला हे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतेय. या निवडणुकीत शिवसेना प्रचंड विस्कळीत होती. शहरातील प्रत्येक नेता आपल्या समर्थकाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नात होता. एका नेत्याच्या हाती निवडणुकीची ... Read More »

पालघर : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न!

APANG KRIDA SPARDHA

दि. 20 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील अपंगांच्या विशेष शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. येथील जीवन विकास हायस्कुलच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. दिव्यांगांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील राहून विशेष उपक्रम हाती घेऊन तत्परतेने कार्य करेल, असे प्रतिपादन खरपडे यांनी ... Read More »

भिवंडी : वाघिवली शाळेत वाचनालयाचे उद्घाटन

Bhivandi Vachnalay

भिवंडी, दि. 20 : भिवंडी तालुक्यातील वाघिवली गावातील प्राथमिक शाळेत नुकतेच ग्रंथ वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ बोरिवली, चिकूवाडी टी ग्रुप यांच्या विद्यमाने कवाडच्या ग्राम पंचायत सदस्या सोनाली प्रमोद पवार यांच्या माध्यमातून या वाचनालयाचा हा उद्घाटन कार्यक्रम वाघिवली जिल्हा परिषद शाळा आणि समाज हॉलमध्ये पार पडला. या वाचनालयाच्या निर्मितीसाठी सामाजिक कार्यकर्ते भुपेंद्र शहा यांचे विशेष योगदान राहिले. या ... Read More »

जव्हार : आदिवासी विकास परिषदेचे बेमुदत आमरण उपोषण सुरूच

JAVHAR UPOTION

प्रतिनिधी जव्हार, दि. 20 : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेच्या पालघर शाखेने आदिवासी पालकांना न्याय मिळावा तसेच इतर मागण्यांसाठी मंगळवारपासून जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आमरण बेमुदत उपोषणास सुरवात केली असून आज दुसर्‍या दिवशीही हे उपोषण सुरुच होते. अखिल भारतीय विकास परिषदेच्या नेतृवाखाली आदिवासी प्रकल्पाच्या इंग्रजी नामांकित शाळेत प्रवेश देण्यासाठी आदिवासी पालकांकडून पैसे उकळणारे कनिष्ठ लिपिक ए. डी. बागुल ... Read More »

वाड्याचा निकालाने सर्वपक्षीय नेतृत्वांच्या फुग्याला टाचणी

WADA NAGARPANCHAYAT LEKH 1 Pic1

वैभव पालवे निवडणूक विश्लेषण : भाग – 1 वाडा, दि. 20 : वाडा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी लागल्यानंतर वाड्यातील सुज्ञ मतदारांनी ज्या पध्दतीने मतांचं दान राजकीय पक्षांच्या पारड्यात टाकलं, ते पाहता सर्वपक्षीय नेतृत्वांच्या फुग्याला टाचणी लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणत्याही एका पक्षाचे महत्व वाढून नेतृत्वाच्या डोक्यात हवा जाणार नाही याची नेमकी काळजी यावेळी मतदारांनी घेतली. त्यामुळे विजय मिळूनही विजयाचा ... Read More »

सामाजिक व राजकीय हक्कांसाठी ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेकरिता संघर्षाला सज्ज रहा! कुणबी युवा परिषदेत अध्यक्ष माधव कांबळे यांचे आवाहन

KUNABI YUVA PARISHAD1

प्रतिनिधी पालघर, दि. 19 : ओबीसी समाजाबरोबरच राज्यात मोठ्यासंख्येने असलेल्या कुणबी समाजाला सामाजिक व राजकीय हक्कांसाठी ओबीसींची जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. जातींच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय समाजाची खर्‍याअर्थाने प्रगती होणार नाही. सरकार जाणीवपूर्वक जातीनिहाय जनगणना करत नाही. ज्या देशात प्राण्यांचीदेखील गणना केली जाते त्या देशात ओबीसींना मात्र उपेक्षित ठेवले जाते हे अन्यायकारक आहे. त्यामुळे आपले सामाजिक व राजकीय हक्क सुरक्षित ... Read More »

विकास, पेसा आणि आरक्षण भोवले सवरांना

WADA NAGARPANCHAYAT LEKH 1 Pic1

वैभव पालवे वाडा, दि. 19 : नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यात अटीतटीचा सामना रंगेल अशी अपेक्षा होती, मात्र सोमवारी झालेल्या मतमोजणीत शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का देत एकहाती विजयश्री खेचून आणली. भाजपच्या या पराभवात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची अकार्यक्षमता, त्यामुळे शहराचा होऊ न शकलेला विकास, पेसा कायद्याचे आरक्षण व नगराध्यक्षपदाचे आरक्षण आदी मुद्देच निवडणुकीत भाजपच्या उमेदवार निशा ... Read More »

जव्हार : विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास परिषदेचे आमरण उपोषण

AADIWASI PARISHAD UPOTION

प्रतिनिधी जव्हार, दि. 19 : आदिवासी विकास विभागाच्या योजनेअंतर्गत नामांकित इंग्रजी शाळांतील मोफत प्रवेशासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पैसे उकळणार्‍या अधिकार्‍यावरील कारवाईसह आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पालघर शाखेने जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. आदिवासी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण मिळावे, या उद्देशाने आदिवासी विकास ... Read More »

जुन्या परंपरा व रूढी बदलणे ही आजची गरज! -डी.एस. पाटील

KUDUS NEWS1

प्रतिनिधी : कुडूस, दि. 11 : जुन्या परंपरा व रूढी बदलणे ही आजची गरज आहे, असे प्रतिपादन कुणबी समाज सेवा संस्थेच्या वधूवर परिचय मेळाव्यातून बोलताना संस्थेचे अध्यक्ष डी. एस. पाटील यांनी केले. अंबाडी येथे वधूवर सूचक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून बोलताना पाटील पुढे म्हणाले की, आपण वधू किंवा वर शोधताना गावोगावी फिरून चपला झिजवतो व पैसा, वेळ ... Read More »

पालघर जिल्ह्यातील महसुली सझेंमध्ये वाढ

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी पालघर, दि. 13 : राज्यातील वाढती लोकसंख्या व वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ विचारात घेऊन राज्यात 3 हजार 165 नवीन वाढीव तलाठी सझे व 528 नवीन महसुली मंडळे स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात 86 नवीन महसूल साझे व 50 नवीन मंडळ कार्यालये स्थापन होणार आहेत. जिल्ह्यात नव्याने निर्माण होणार्‍या 86 नव्या ... Read More »

Scroll To Top