दिनांक 23 January 2018 वेळ 3:14 AM
Breaking News
You are here: Home » 2017 » December (page 3)

Monthly Archives: December 2017

कोकण सरस महोत्सवात अंगणवाडी सेवकांसाठी आरोग्य आणि पोषण विषयक कार्यशाळा संपन्न

KOKAN SARAS MOHOSTAV

पालघर, दि. 25 : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व महिला बाल कल्याण विभागामार्फत कोकण सरस महोत्सवात तिसर्‍या दिवशी अंगणवाडी मुख्य सेविका, सेविका आणि आशा प्रवर्तकांसाठी आरोग्य आणि पोषण या विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य विभागाअंतर्गत ह्रदय रोगाबाबत काळजी व औषधोपचार, कुष्ठरोग निदान व औषधोपचार तसेच आरोग्य विभागाच्या विविध योजनांशी संबंधित प्रधान मंत्री मातृत्व अनुदान योजना, जननी सुरक्षा ... Read More »

विक्रमगड : अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिवसानिमित्त गरजुंना वस्तुंचे वाटप

VIKRAMGAD VAJPEYI JANMDIVAS

प्रतिनिधी : विक्रमगड, दि. 25 : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा 93 वा जन्मदिवस विक्रमगडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुशील औसरकर यांच्या नेतृत्वाखाली विक्रमगड तालुक्यातील विविध भागात गरजुंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. तसेच विक्रमगड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे व बिस्टीकांचे वाटप करण्यात आले व येथील रुग्णांची सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार करुन ... Read More »

जेष्ठ व निष्ठावंत शिवसैनिक गजानन आंबवणे यांचे निधन

वाडा, दि. 25 : शहरातील जेष्ठ शिवसैनिक गजानन (भाई) आंबवणे यांचे आज, सोमवारी (दि. 25) सकाळी वयाच्या 72 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेचा एक सच्चा, निष्ठावंत शिवसैनिक व तालुक्यातील शिवसेनेचा आधारवड हरपल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली. गजानन आंबवणे हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक होते. वाडा तालुक्यात शिवसेना स्थापन करण्यापासून ते संपूर्ण ... Read More »

कोसबाड : ग्राम बाल शिक्षा केंद्राचा 72 वा वर्धापन दिन समारंभ संपन्न

KOSBAD NEWS

राजतंत्र न्यूज नेटवर्क दि. 24 : नूतन बाल शिक्षण संघ संचलीत म बाल शिक्षा केंद्राचा 72 वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी अरुणा एरंडे, महेश कारीया, ज्येष्ठ विधीज्ञ प्रकाश करंदीकर, दिनेश पाटील, संध्या करंदीकर, श्रीराम पटवर्धन, ... Read More »

दिव्यांगांसाठीच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत डहाणूच्या कर्णबधिर शाळेला चँपियनशिप ट्रॉफी

cropped-LOGO-4-Online.jpg

डहाणू, दि. 24 : जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सर्वाधिक बक्षिसे मिळवून डहाणूच्या कर्णबधिर विद्यालयाने सलग दुसर्‍या वर्षी चँपियन्सशिप ट्रॉफी पटकावली आहे. या शाळेने विविध स्पर्धेत 18 सुवर्ण पदके, 5 रजत पदके आणि 1 कांस्य पदक अशा एकूण 24 पदकांची लयलूट केली आहे. पालघरच्या जीवन विकास विद्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये धावणे, लांब ... Read More »

पालघर : कोकण सरस महोत्सवाचे पालकमंत्री विष्णू सवरांच्या हस्ते उद्घाटन

KOKAN SARAS

पालघर, दि. 24 : जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ते 27 डिसेंबरदरम्यान पालघर येथे सरस विक्री व प्रदर्शन 2017 चे आयोजन करण्यात आले असुन आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते काल, शनिवारी या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जात असुन जिल्हा परिषदेच्या पाणी व ... Read More »

लंगडी स्पर्धेमध्ये सोमैय्या शाळेतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संघात निवड

LANGDI

राजतंत्र न्यूज नेटवर्क दि. 24 : वसई येथे पार पडलेल्या 9 व्या राष्ट्रीय कनिष्ठ गट लंगडी स्पर्धेमध्ये डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील के. जे. सोमैय्या माध्यमिक शाळेतील 6 मुली व 2 मुलांची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या संघाने आंतरराज्य स्पर्धेत पहीला क्रमांक पटकावल्यामुळे या मुलांची आता राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. कु. बिना नडगेझ, कु. दिपीका चुंबळे, कु. सुरेखा महिला, ... Read More »

निमेष तन्ना चॅरिटेबल ट्रस्टतर्फ गरजूंना जिवनोपयोगी वस्तूंचे वाटप

NIMESH TANNA CHARITABLE TRUST

डहाणू, दि. 24 : मुंबई येथील श्री. निमेष तन्ना चेरिटेबल ट्रस्ट तर्फे डहाणू तालुक्यातील कैनाड येथील गरजू आदिवासी बांधवांना विविध उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. ट्रस्टच्या अध्यक्षा दमयंती तन्ना व त्यांचे सहकारी ज्योती भिंगे, भावना सचदे, धर्मिष्ठा कारीया, अश्विन पोपट, मोहन कातेरा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कैनाड परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना एकूण 400 ... Read More »

विक्रमगड महाविद्यालयामध्ये पी. सावळाराम कविसंमेलन

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी : जव्हार, दि. 24 : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे या नामांकित संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड महाविद्यालयामध्ये रविवार दि. 31 डिसेंबर 2017 रोजी दुपारी 3 वाजता जनकवी पी. सावळाराम कविसंमेलनाचे 17 वे सत्र आयोजित केले आहे. या कविसंमेलनाचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते होणार असून संमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ विचारवंत डॉ. जयप्रकाश घुमटकर हे ... Read More »

परळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेनेचे रूपेश पाटील यांची बिनविरोध निवड

PARLI GRAMPANCHAYAT

वाडा, दि. 24 : तालुक्यातील परळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाकरीता झालेल्या निवडणूकीत शिवसेनेचे रूपेश पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने येथील शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. गेली पंधरा वर्षे परळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेची अबाधीत सत्ता असून आठ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत यावेळी शिवसेनेचे आठ पैकी आठही सदस्य निवडून आल्याने विरोधात एकही सदस्य नाही. उपसरपंच पदाच्या निवडणूकीसाठी सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते रोहीदास ... Read More »

Scroll To Top