दिनांक 23 January 2018 वेळ 3:16 AM
Breaking News
You are here: Home » 2017 » December (page 2)

Monthly Archives: December 2017

विक्रमगडच्या जनमाहिती अधिकार्‍यांना माहिती आयोगाने ठोठावला दंड

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी विक्रमगड : विक्रमगड ग्रामपंचायतीच्या तत्कालीन माहिती अधिकार्‍याने माहिती कायद्याला धाब्यावर बसवल्याचे समोर आले आहे. येथील जन माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी जी. एल. वारघडे यांनी या माहिती अधिकार कायद्यान्वये आलेल्या अर्जांना केराची टोपली दाखवत माहिती देण्यास नकार दिला. याविरोधात अर्जदाराने केलेल्या प्रथम अपिलातही त्यांनी माहिती दिली नाही म्हणून त्यांनी राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाकडे द्वितीय अपिल केले. ... Read More »

पालघरमध्ये विविध प्रकल्पांविरोधात आदिवासींचा एल्गार आदिवासींच्या अस्तित्वालाच सरकारकडून धोका; आदिवासी नेते काळूराम दोधडे यांची टीका

AADIVASI MORCHA

प्रतिनिधी पालघर, दि. 27 : भारतीय संविधानाने पाचव्या सूचीनुसार अनुसूचित क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी राज्यपालांवर सोपविली असताना, विकासाच्या नावाखाली सरकार अनुसूचित क्षेत्रात राबवित असलेल्या प्रकल्पांना मोकळीक मिळावी म्हणून राज्यपाल सरकारच्या हातचे बाहुले बनून कारभार करणार असतील तर सरकारकडूनच आदिवासींच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असल्याची टीका आदिवासी एकता परिषदेचे व भूमिसेनेचे अध्यक्ष काळूराम दोधडे यांनी बुधवारी (दि. 27) पालघरमध्ये केली. सरकारने लादलेल्या ... Read More »

मलवाडा ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलचा ऐतहासिक विजय सरपंचपदासह 9 जागांवर निर्विवाद वर्चस्व

MALWADA GRAMPANCHAYAT FINAL

प्रतिनिधी विक्रमगड, दि. 27 : तालुक्यातील मलवाडा या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह सदस्यांच्या 9 जागांसाठी 26 डिसेंबर रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि. 27) लागला असून या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणित परिवर्तन पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सरपंचपदासह सदस्यांच्या 9 जागी विजय मिळविला. ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी बविआ पुरस्कृत उमेदवारांचा पुरता धुव्वा उडाल्याने या पॅननला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. त्यामुळे ... Read More »

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग सायदे व किनिस्ते ग्रामपंचायतीवर भाजपचा वरचष्मा

MOKHADA BHAJAP

प्रतिनिधी मोखाडा, दि. 27 : तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या सायदे आणि किनिस्ते ग्रामपंचायतीवर भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असुन सेनेचा पुर्वापार बालेकिल्ला समजली जाणारी सायदे ग्रामपंचायत हस्तगत करून सेनेच्या वर्चस्वालाच सुरुंग लावला आहे. भाजपने दोन्ही ग्रामपंचायतींवर सरपंचासह आपले सदस्यही बहुमतानी निवडून आणल्याने याठिकाणची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेले भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांचे आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा यांनी अभिनंदन केले ... Read More »

सोमटा येथे आरोग्यविषयी विशेष प्रचार अभियानाचे आयोजन

cropped-LOGO-4-Online.jpg

पालघर, दि. 27 : केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत येणार्‍या क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे पालघर तालुक्यातील सोमटा गावात आरोग्य विषयी शासकीय योजनांच्या माहितीवर आधारित विशेष प्रचार अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील लोकांना शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या विविध आरोग्य विषयी योजनांची माहिती थेट त्यांच्या दारापर्यंत पोहचविण्याकरिता जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कुष्ठरोगाविषयी ... Read More »

मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू

WADA MADHMASHI HALLA

प्रतिनिधी वाडा, दि. 27 : तालुक्यातील वावेघर येथील कमळाकर बाळकृष्ण ठाकरे (वय 68) या शेतकर्‍यावर मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 27) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. ठाकरे यांच्या शेजारील घरावर असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यावरील माशा अचानक उडाल्या. त्यावेळी घराबाहेर असलेल्या ठाकरे यांच्यावर एकाचवेळी असंख्य मधमाश्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने वाड्यतील ... Read More »

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ग्रंथ महोत्सवाचे आयोजन

cropped-LOGO-4-Online.jpg

पालघर, दि. 26 : पुस्तकावर भरभरून प्रेम करणार्‍या व पुस्तकाचे महत्व जाणणार्‍या वाचकांसाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात दि. 8 व 9 जानेवारी रोजी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. जी. डी. तिवारी यांच्या हस्ते या ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष हितेंद्र शहा, सचिव प्रा. अशोक ठाकूर, संस्थेचे इतर पदाधिकारी आणि प्राचार्य डॉ. किरण ... Read More »

मलवाडा ग्रामपंचायतीसाठी 85 टक्के मतदान

MALWADA NIVADNUK

प्रतिनिधी विक्रमगड, दि. 26 : तालुक्यातील मलवाडा या ग्रामपंचायतीच्या 3 प्रभागातील 9 जागांसाठी आज, मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भरघोस असा प्रतिसाद देत तब्बल 85 टक्के मतदान झाल्याची माहिती निवासी तहसिलदार एस. के. कामडी यांनी दिली. या निवडणुकीमध्ये एकुण 9 जागांसाठी 18 उमेदवार तर सरपंच पदाकरीता 3 उमेदवार रिंगणात आहेत. आज या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीत केवळ दोन ... Read More »

मिशन भारतीय संविधान: 19 वे व्याख्यान संपन्न

MISSION BHARTIY RAJYAGHATNA

डहाणू, सोमवार, दि. 25 डिसेंबर : दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी के. जे. सोमैय्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या (मुंबई) राष्ट्रीय सेवा योजनेच्या दुसर्‍या बॅचच्या शिबिरार्थींशी भारतीय संविधान, राईट टू एज्युकेशन, भारतीय दंड संहिता, मानवी हक्क आणि एकंदरीतच लोकशाही व्यवस्थेबाबत संवाद साधला. भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि समाजात लोकशाहीची मुल्ये रुजावीत यासाठी संजीव जोशी यांच्या पुढाकाराने 2 सप्टेंबर ... Read More »

जव्हारपाठोपाठ विक्रमगड तालुक्याला भूकंपाचे धक्के, नागरीकांत भितीचे वातावरण

VIKRAMGAD BHUKAMP

प्रतिनिधी विक्रमगड, दि. 26 : जव्हार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. असे असताना आज, सकाळी 10 वाजेच्या सुमारास विक्रमगड तालुक्यातील खुडेद भागातील महालेपाडा, ठाकुरपाड्यासह 12 गाव-पाड्यांना तसेच साखरे भागातील 12 पाड्यांना भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. विक्रमगड तालुक्यात भूकंप तीव्रता मापक यंत्रणाच नसल्यामुळे भूकंपाची तीव्रता मात्र कळू शकली नाही. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यानंतर या भागातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले ... Read More »

Scroll To Top