दिनांक 23 January 2018 वेळ 3:13 AM
Breaking News
You are here: Home » 2017 » December (page 10)

Monthly Archives: December 2017

शिवसेना कामाच्या बळावर निवडणूक जिंकेल! आमदार रवींद्र फाटक यांचा विश्‍वास

WADA NAGARPANCHAYAT-SHIVSENA

प्रतिनिधी वाडा, दि. 5 : वाडा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत असून ज्या शहरात भाजपचे पालकमंत्री राहतात तेथे विकासाची काय अवस्था आहे हे मतदार जाणतात. शिवसेनेने ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत असताना मर्यादित अधिकारात जी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला त्या बळावर शिवसेना ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. वाडा ... Read More »

वाडा नगरपंचायत निवडणूक: 2017 भाजपाचे शिवसेनेपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न?

cropped-LOGO-4-Online.jpg

राजतंत्र न्युज नेटवर्क वाडा, दि. 3: वाडा नगर पंचायतीच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षासह सतरा प्रभागात उमेदवार उभे करून सत्तेचा प्रबळ दावेदार असलेल्या शिवसेने समोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मागील निवडणूकीची पार्श्वभूमी पहाता भाजप किती प्रमाणात हे आव्हान उभे करेल यासंदर्भात साशंकताच दिसत आहे. मागील पंधरा वर्षात तीन ग्रामपंचायत निवडणूका भारतीय जनता पक्षाने शिवसेने सोबत युती करून ... Read More »

डहाणू : बाद उमेदवारप्रकरणी अनिश्‍चितता याचिकेवर आज होणार युक्तीवाद

cropped-LOGO-4-Online.jpg

राजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू, दि. 3 : डहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननीमध्ये बाद झालेल्या उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आता उद्या (4 डिसेंबर) युक्तीवाद होणार आहे. राष्ट्रवादीचे राजेंद्र माच्छी यांच्या आव्हान याचिकेमध्ये भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार विशाल नांदलस्कर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्यामुळे 2 डिसेंबर रोजी होणारी सुनावणी टळली होती. डहाणू नगरपरिषदेच्या 25 नगरसेवक पदांसाठी आणि ... Read More »

डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017, सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आले एका व्यासपिठावर! सोशल मिडीयाद्वारे झाले प्रक्षेपण

cropped-LOGO-4-Online.jpg

राजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू दि. 3 : डहाणू तालुका विकास परिषदेतर्फे आयोजित डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत स्वत:चे नशिब अजमावणार्‍या नगराध्यक्षपद व नगरसेवकपदाच्या सर्व पक्षांच्या उमेदवारांना एकाच व्यासपिठावर आणून चर्चा घडवून आणण्याचा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे मिहीर शहा, भाजपचे भरत राजपूत, शिवसेनेचे संतोष शेट्टी, काँग्रेसचे अशोक माळी, अपक्ष उमेदवार डॉ. अमित नहार व अनिल पष्टे यांनी आवर्जून हजेरी लावली. ... Read More »

डहाणू : छाननीमध्ये बाद उमेदवारप्रकरणी याचिकेवर आज होणार युक्तीवाद

cropped-LOGO-4-Online.jpg

डहाणू दिनांक 1: डहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननीमध्ये बाद झालेल्या उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज युक्तीवाद होणार आहे. डहाणू नगरपरिषदेच्या 25 नगरसेवक पदांसाठी आणि 1 नगराध्यक्षपदासाठी 13 डिसेंबर रोजी निवडणूक होत असून यासाठी 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. 24 तारखेपर्यंत 133 उमेदवारांनी नगरसेवकपदांसाठी तर 9 उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्रे भरली. ... Read More »

डहाणू : सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार एका व्यासपिठावर येणार कार्यक्रमाचे सोशल मिडीयाद्वारे Live प्रक्षेपण

facebook_1506002192949

राजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू दि. 30 : डहाणू तालुका विकास परिषदेतर्फे नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवकपदासाठी निवडणूक लढविणार्‍या सर्व पक्षांच्या उमेदवारांना आज (2 डिसेंबर) एकाच व्यासपिठावर आणून चर्चा घडवून आणण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाविषयी लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. याआधी देखील परिषदेतर्फे नगरसेवकांशी नागरिकांचा संवाद घडवून आणणारा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या ... Read More »

वाडा नगरपंचायत निवडणूक : काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला

WADA NAGARPANCHAYAT NIVADNUK-CONGRESS PRACHAR

प्रतिनिधी वाडा, दि. 1 : वाडा नगरपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून काँग्रेस पक्षाने शुक्रवारी काँग्रेस भवनासमोरील गणेश मंदिरात नारळ वाढवून काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सुभाष कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराला सुरुवात केली. या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार सायली पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. तर नगरसेवक पदाच्या 17 पैकी 12 जागांवर पक्षीय चिन्हावर निवडणूक लढवित ... Read More »

विक्रमगड : कोतवालाला मारहाण कर्मचार्‍यांकडून काळ्या फिती लावून निषेध

KOTVAL MARHAN

प्रतिनिधी विक्रमगड, दि. 1 : आधारित मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत पालघर येथे आयोजित सभेस अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकास नोटीस बजावण्यास गेलेल्या तलवाडा सजेच्या कोतवालास सदर शिक्षकाने मारहाण केली होती. त्यामुळे तहसिल कार्यालयातील कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून या मारहाणीचा निषेध व्यक्त केला. 14 नोव्हेंबर रोजी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस गैरहजर राहिलेल्या केंद्रस्तरीय अधिकार्‍यांना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडून ... Read More »

पालघर तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी महेंद्र अधिकारी

KHAREDI VIKRI SANGH-MAHENDRA ADHIKARI

प्रतिनिधी पालघर, दि. 1 : पालघर तालुका कृषी विकास खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या शुक्रवारी (दि. 1) झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलचे महेंद्र अधिकारी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी भरत राऊत यांची बिनविरोध निवड झाली. पालघर तालुका कृषी विकास खरेदी विक्री संघाच्या नुकताच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुरस्कृत सहकार पॅनेलने निवडणूक जिंकली होती. या निवडणुकीत सहकार ... Read More »

जव्हार : जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली व पथनाट्याद्वारे जनजागृती

AIDS DIN-JAVHAR

प्रतिनिधी : जव्हार, दि. 01 : एड्ससारख्या भीषण आजाराबाबत समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी. तसेच या रोगाचा प्रसार कसा होतो, या रोगाची लक्षणे व त्यावर उपाय काय आहेत याबाबत नागरीकांना माहिती मिळावी या उद्देशाने श्री गजानन महाराज कॉलेज ऑफ नर्सिंग रिसर्च सेंटर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरात रॅली काढली. तसेच पंतगशहा रुग्णालय परिसरात जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. यावेळी जव्हारचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ... Read More »

Scroll To Top