दिनांक 10 December 2018 वेळ 10:37 PM
Breaking News
You are here: Home » 2017 » December

Monthly Archives: December 2017

दांडेकर महाविद्यालयात लोकशाहीमधील न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन

पालघर, दि. 29 : येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सुवर्णमहोत्सवाचा एक भाग म्हणून शनिवार, दि. 6 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10.30 वा. लोकशाहीमधील न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधिश न्यायमूर्ती अभय ओक यांच्या बिजभाषणाने सदर परिसंवादाचे उद्घाटन होणार आहे. सदर परिसंवादाच्या निमित्ताने विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखांमधील विद्यार्थी न्यायमूर्ती अभय ओक ... Read More »

लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्वांनी अधिकाधिक सक्रिय व्हावे -संजीव जोशी

BHARTIY RAJYAGHATNA VYAKHYAN

दि. 29 : लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्व नागरिकांनी अधिकाधिक सक्रिय झाल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी तलासरी तालुक्यातील कोचई येथे बोलताना केले. ते गोदावरी परुळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थींशी भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर बोलत होते. यावेळी जोशी यांनी भारतीय राज्यघटना, भारतीय दंड संहीता, शिक्षणाचा हक्क, पंचायतराज व्यवस्था, पेसा कायदा याविषयी थोडक्यात माहिती दिली. Share ... Read More »

मिशन भारतीय संविधान: 19 वे व्याख्यान संपन्न

MISSION BHARTIY RAJYAGHATNA

डहाणू, सोमवार, दि. 25 डिसेंबर : दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी के. जे. सोमैय्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या (मुंबई) राष्ट्रीय सेवा योजनेच्या दुसर्‍या बॅचच्या शिबिरार्थींशी भारतीय संविधान, राईट टू एज्युकेशन, भारतीय दंड संहिता, मानवी हक्क आणि एकंदरीतच लोकशाही व्यवस्थेबाबत संवाद साधला. भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि समाजात लोकशाहीची मुल्ये रुजावीत यासाठी संजीव जोशी यांच्या पुढाकाराने 2 सप्टेंबर ... Read More »

कोसबाड : ग्राम बाल शिक्षा केंद्राचा 72 वा वर्धापन दिन समारंभ संपन्न

KOSBAD NEWS

राजतंत्र न्यूज नेटवर्क दि. 24 : नूतन बाल शिक्षण संघ संचलीत म बाल शिक्षा केंद्राचा 72 वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी अरुणा एरंडे, महेश कारीया, ज्येष्ठ विधीज्ञ प्रकाश करंदीकर, दिनेश पाटील, संध्या करंदीकर, श्रीराम पटवर्धन, ... Read More »

सर्वांनी लोकशाही व्यवस्था समजून घेतल्याशिवाय देश महासत्ता बनणार नाही! -संजीव जोशी

BHARTIY RAJYAGHATNA

राजतंत्र न्यूज नेटवर्क दि. 21 : सर्वांनीच लोकशाही व्यवस्था समजून घेतल्याशिवाय आपला देश महासत्ता बनू शकणार नाही. आपल्या देशाचा कारभार कसा चालतो ते आपण समजून घेतले पाहिजे आणि देशाच्या प्रगतीसाठी सक्रिय झाले पाहिजे, असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथे बोलताना केले. ते मुंबईस्थीत के. जे. सोमैय्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात भारतीय राज्यघटनेची ... Read More »

बोईसर ग्रामपंचायतीच्या देणगी बँक खात्यात सव्वा कोटी रुपयांचा गैरव्यवहार?

BOISAR GRAMPANCHAYAT GAIRVYAVHAR

प्रतिनिधी पालघर, दि. 14 : तालुक्यातील औद्योगिकीकरणासाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या बोईसर ग्रामपंचायतीने सन 2007 मध्ये पाणीपुरवठा लाइन सुधारणा या नावाने उघडलेले बँक खाते कालांतराने लुप्त झाल्याचे उघडकीस आले असून या अचानकपणे ग्रामपंचायत दफ्तरी व्यवहारातून गायब झालेल्या बँकेच्या खात्यामधून सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या बँक खात्याचे ऑडिट झालेले नसून या खात्यातील व्यवहाराच्या नोंदीही कॅशबुकमध्ये ... Read More »

डहाणू : सर्व पक्षांचा प्रचार टिपेला पोहोचला! भाजपने भव्य रॅलीद्वारे केले शक्तीप्रदर्शन

डहाणू नगरपरिषदेची निवडणूक 4 दिवस लांबणीवर पडल्यामुळे शिथील झालेला सर्वच पक्षांचा प्रचार आता टिपेला पोहोचला आहे. इतके दिवस घरोघर जाऊन प्रचार केला जात होता. भाजप, शिवसेना, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष नहार यांनी एलसीडी व्हॅनवरुन व्हिडीओ प्रक्षेपीत करुन हायटेक प्रचाराकडे कल ठेवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने घरोघरी प्रचारावर अधिक भर दिलेला आहे. या निवडणूकीत कुठल्याच पक्षाच्या स्टार प्रचारकांनी प्रचारात भाग ... Read More »

डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 निवडणूक प्रचाराचा रणसंग्राम शिगेला पोहोचला

शिरीष कोकिळ दि. 13 : डहाणू नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी मैदानात उतरलेल्या नगराध्यक्षपदासाठीच्या 7 व नगरसेवकपदांसाठीच्या 110 उमेदवारांनी प्रचारास सुरवात केली असून आता प्रचाराचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांच्या दृष्टीने ही निवडणूक अस्तित्त्वाचा प्रश्‍न निर्माण करणारी ठरणार आहे. काही उमेदवारांच्या अर्जामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांना न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागल्याने राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख 13 डिसेंबर ऐवजी 17 डिसेंबर ... Read More »

डॉ. अमित नहार यांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे तक्रार; सैनिकांचा वापर प्रचारात करण्याला आक्षेप!

3 Amit Nahar (1Colmn)

डहाणू नगरपरिषदेच्या 17 डिसेंबर रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपला रामराम करुन नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार डॉ. अमित नहार यांनी आचारसंहीतेचा भंग केल्याची तक्रार एका नागरिकाने निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे केली आहे. या तक्रारी अर्जामध्ये दोन आक्षेप आहेत. डॉ. अमित नहार यांनी आपल्या जाहिरनाम्यामध्ये सैनिकांचे फोटो छापल्याने आचारसंहीतेचा भंग झाल्याचा एक आक्षेप तर दुसरा आक्षेप म्हणजे दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव ... Read More »

आपले डहाणू शहर स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवू! -संतोष शेट्टी

Santosh_Shetty

डहाणू शहर स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवायचे असेल तर त्याच त्याच लोकांना निवडून देण्याच्या मनस्थितीत जनता नाही. लोकांना परिवर्तन हवे आहे. हे परिवर्तन सर्व 25 जागांवर उमेदवार उभे करु शकणारी शिवसेनाच घडवून आणू शकते. त्यासाठी शहराला सक्षम नेतृत्व देऊ असा विश्‍वास डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीतील शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष शेट्टी यांनी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्याशी बोलताना व्यक्त केला. शेट्टी ... Read More »

Scroll To Top