दिनांक 18 December 2017 वेळ 3:08 AM
Breaking News
You are here: Home » 2017 » November

Monthly Archives: November 2017

डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 5 प्रभागांमधील निवडणूक प्रक्रीयेला स्थगिती

WADA NAGARPANCHAYAT LEKH 1 Pic1

डहाणू नगरपरिषदेतील 12 प्रभागांपैकी 5 प्रभागांच्या निवडणूक प्रक्रीयेला पालघर जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची या प्रभागातील प्रक्रीया थांबली आहे. उर्वरीत प्रभागांतील उमेदवारांची अंतीम यादी प्रसिद्ध करायची किंवा नाही याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घ्यायचा आहे. निवडणूक प्रक्रीयेला स्थगिती मिळालेल्या प्रभागांमध्ये क्र. 1, 2, 9, 10 व 12 या ... Read More »

कोंढले विभाग क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेला उत्साहात सुरवात

KVPL

प्रतिनिधी वाडा, दि. 29 : ग्रामीण भागातील खेळाडुंना व्यावसायीक खेळाडु म्हणुन खेळण्याची संधी मिळवुन देणे व स्पर्धात्मक वातावरणात कला-क्रिडाला चालना देणे या हेतुने आयोजीत करण्यात आलेल्या कोंढले विभाग प्रीमियर लीग स्पर्धेला बुधवारपासून मोहोट्याचापाडा येथे मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे. या के.व्ही.पी.एल स्पर्धा 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पाच दिवस चालणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषीक 1 लाख 11 हजार ... Read More »

पालघर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींना जलमित्र पुरस्कार

JALMITRA PURASKAR

प्रतिनिधी मोखाडा, दि. 29 : कोकण विभागात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या ग्रामपंचायतींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येवून नुकतेच सन्मानित करण्यांत आलेले आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील पांच ग्रामपंचायतींचा समावेश आहे.त्यांचाही सत्कार रत्नागीरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणांत राज्याचे जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासह रत्नागिरी, रायगड, सिंधूदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील एकूण 25 ग्रामपंचायतींना ... Read More »

सागरी हद्दीत अतिक्रमण करून मत्स्योत्पादन; गुजरात राज्यातील दोन ट्रोलर पकडले

GUJRAT MACCHIMAR

प्रतिनिधी पालघर, दि. 29 : राज्यातील मासेमारी क्षेत्राच्या हद्दीत सप्ताहा अखेरीस गुजरात राज्यामधील शेकडो मच्छिमार बोटी अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर मत्स्योत्पादन करतात. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाने केलेल्या कारवाईत दोन ट्रोलरना पकडण्यात यश आले असून हे ट्रोलर तालुक्यातील मुरबे येथील समुद्रकिनारी आणले आहेत. पालघरच्या समुद्रकिनार्‍यापासून 12 नॉटीकल मैलापर्यंतच्या अंतरावर राज्य सरकारची नियंत्रण रेषा असून या क्षेत्रात मत्स्यव्यवसाय विभागाचा परवाना ... Read More »

अमित नहार यांची उमेदवारी भाजपसाठी डोकेदुखी माघार घेण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

AMIT Nahar

डहाणू दि. 28: भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अमित नहार यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी ही भाजपसाठी मोठे आव्हान ठरताना दिसत आहे. डॉ. अमित हे केंद्रात आणि राज्यात सत्ता नसताना भाजपमध्ये सक्रीय झाले होते. त्यानंतर भाजपचे कमळ सर्वत्र फुलण्यास सुरुवात झाली. भाजप सत्तेत आल्यानंतर अनेकांना विकासासाठी भाजपमध्ये सामील होण्याचा मोह झाला. मात्र सत्तेत नसताना भाजपमध्ये सक्रीय झाल्याने अमित यांच्याबाबत भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी विचार ... Read More »

मोखाडा तालुक्यात एकाधिकार धान्य केंद्रे सुरू करण्याची मागणी

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी : दि. 28 : मोखाडा तालुक्यात कुठेही एकाधिकार व आधारभुत धान्य खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नसल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांना अक्षरशः पडेल भावाने आपले धान्य खुल्या बाजारपेठेत विकावे लागत आहे. त्यामुळे एकीकडे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असून आपले धान्य प्रतवारी विरहीत सरलाटपणे विकावे लागत असल्याने शेतकर्‍यांचे दुहेरी नुकसान होत आहे. दरवर्षी विजया दशमीच्या मुहूर्ताला आदिवासी विकास महामंडळाकडून धान्य खरेदी केंद्रे ... Read More »

रोशनी फाऊंडेशन व कॅमलिन कंपनीतर्फे आयोजित भव्य बालचित्रकला स्पर्धेत 1200 विद्यार्थ्यांचा सहभाग

ROSHNI FAUNDATION

दि. 28 : मुंबईतील रोशनी फाऊंडेशन अ‍ॅन्ड चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोकयो कॅमलिन लि. यांच्या वतीने 19 नाव्हेंबर व 25 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या सप्तरंगी स्वप्ने नामक भव्य बालचित्रकला स्पर्धेत 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. डहाणू तालुक्यातील आशागड, सावटा, गंजाड, कैनाड व आंबेसरी केंद्रातील विविध 24 जिल्हा परिषद शाळांसह संतोषी आश्रम शाळा अशा एकुण 25 शाळांतील 400 हून अधिक विद्यार्थांनी ... Read More »

समर्थनचे मानवीहक्क वार्ता पुरस्कार जाहीर झी 24 तासचे पालघर प्रतिनिधी हर्षद पाटील यांना पुरस्कार

SAMARATHAN PURASKAR

प्रतिनिधी पालघर, दि.26 : अभिव्यक्ती समर्थन व समर्थन मुंबई या संस्थांच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय स्वरूपाचा समर्थन मानवीहक्क वार्ता पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांची नुकतीच समर्थनचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी घोषहक्कांच्या रक्षणासाठी सातत्याने आपल्या लिखाणातून प्रयत्न करणार्‍या पत्रकारांसाठी हे पुरस्कार दिले जातात. विविध सामाजिक समस्यांना वाचा फोडून उपेक्षितांच्या मूलभूत हक्कांची जपणूक करणार्‍या ग्रामीण भागातील निर्भिड ... Read More »

वाडा नगर पंचायत निवडणूक : शिवसेनेकडून प्रचाराचा शुभारंभ

WADA NAGARPANCHAYAT NIVADNUK

वाडा, दि. 28 : येत्या 13 डिसेंबरला होऊ घातलेल्या वाडा नगरपंचायत निवडणूकीसाठी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासहीत 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला असून प्रत्येक उमेदवार व त्या-त्या प्रभागातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीतांजली कोलेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ वाड्यातील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. ... Read More »

नवोदित कवींनी सामाजिकदृष्टया संवेदनशील असावं ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांनी कविसंमेलनात मांडले मत

KAVI SAMMELAN1

प्रतिनिधी पालघर, दि. 28 : लेखन ही चळवळ आहे व त्यासाठी कवींनी समजाभिमुख लेखन केल्यास समस्यांना वाचा फुटेल; पण त्यासाठी नवोदित कवींनी संवेदशील असावं असं मत प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक सायमन मार्टिन यांनी पालघर येथे शब्दशिल्पच्या कविसंमेलनात व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पालघर व बोईसर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नवोदित कविंकरिता काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख ... Read More »

Scroll To Top