दिनांक 15 November 2018 वेळ 4:13 AM
Breaking News
You are here: Home » Breaking (page 9)

Category Archives: Breaking

वडवली दरोडा प्रकरणातील चार आरोपी जेरबंद ; वाडा पोलिसांची अवघ्या सव्वा महिन्यात कारवाई

IMG_20180907_114554

प्रतिनिधी वाडा, दि. ७ : तालुक्यातील वडवली येथील माजी उपजिल्हाधिकारी नामदेव जाधव यांच्या घरावर १७ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान दरोडा पडला होता. या दरोड्यात कुठलाही पुरवा उपलब्ध नसतानाही अवघ्या सव्वा महिन्यात पोलिसांनी अगदी नियोजनबद्ध कारवाई करत आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. या कारवाईमुळे वाडा पोलसांचे कौतूक केले जात आहे. या दरोड्यात दरोडेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून सोन्याचे ... Read More »

कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसारातील बहुमोल योगदानाबद्दल कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रास सर्वोत्तम संस्था पुरस्कार

LOGO-4-Online

डहाणू, दि. 06 : गेल्या 42 वर्षांपासून ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या विशेषतः आदिवासी शेतकरी बांधवाच्या उन्नतीकरीता कृषी विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करुन त्याद्वारे येथील शेतकर्‍यांचे शेती उत्पादन वाढण्यास व त्यांच्या राहणीमानाचा स्तर उंचावण्यास मोठा हातभार लावणार्‍या कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रास या बहुमोल योगदानाबद्दल सन 2018 या वर्षीचा प्रतिष्ठेचा असा सर्वोत्तम संस्था पुरस्कार प्राप्त झाला आहे.  विधान परिषदेचे सभापती रामराजे ... Read More »

वसईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त

VASAI GUTKHA

वसई, दि. 06 : पालघर जिल्हा पोलीसांकडून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर धाड सत्र सुरु असुन मागील काही दिवसांत जिल्ह्यातील विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईत कोट्यावधी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. काल, बुधवारी देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटकडुन मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोलनाका येथे ट्रकवर कारवाई करुन लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा व ट्रक मिळून सुमारे 75 लाख ... Read More »

वसईत गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त पावणे पाच लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

VASAI GAVTHI DARU1

वसई, दि. 06 : येथील वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशिररित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारुच्या अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकून 32 लिटर गावठी दारुसह एकुण 4 लाख 83 हजार 500 रुपये किंमतीचा दारु बनविण्यासाठी लागणारा मुद्देमाल नष्ट केला आहे. वालीव पोलीसांना काल, बुधवारी मालजीपाडा नागोबा मंदिराच्या पाठीमागे खाडी किनारी दलदलीत गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. ... Read More »

सिंधूताई अंबिकेंचा वारली भाषेतील साहित्य संग्रह प्रकाशित

IMG-20180831-WA0021__01__01.jpg

RAJTANTRA MEDIA कोसबाड, दि. ५: सिंधूताईंकडे असलेला अमुल्य ठेवा जर डॉक्यूमेंटेशन झाले नसते तर काळाच्या पडद्याआड जाऊ शकला असता. ते आपल्याला परवडण्यासारखे नाही. आणि म्हणून आणखी कुणाकडे जर असे मौलिक ठेवे असतील तर ते प्रसिद्ध करण्यासाठी आपण निश्चित पुढाकार घेऊ अशी आश्वस्त ग्वाही ज्येष्ठ शिक्षणप्रेमी समाजसेवक शाम वाघ यांनी पद्मभूषण ताराबाई मोडक विद्यानगरी (कोसबाड – डहाणू ) येथे बोलताना दिली. ... Read More »

खोडाळा : दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार

AADARSH SHIKSHAK JILHA PURSKAR

 दीपक गायकवाड/ राजतंत्र मिडीया मोखाडा, दि. 27 : खोडाळा गावचे भुमीपुत्र दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार जाहीर झालळ आहे. उद्या, 5 सप्टेंबर रोजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन फसाळेंना गौरविण्यात येणार आहे. त्यांची आदर्श शिक्षक म्हणून झालेली निवड ही सत्पात्री असल्याचे सांगत त्यांच्यावर शिक्षक वृंद, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि पंचायत समिती प्रशासनाकडून अभिनंदनाचा वर्षाव ... Read More »

इस्रायली महावाणिज्यदूतांची ऐनशेत गावाला भेट

ISRAIL MAHAVANIJYADUT

जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट करणार्‍या इस्रायली विद्यार्थ्यांचे केले कौतुक  दिनेश यादव/राजतंत्र मिडीया :  वाडा, दि. 4 : इस्रायलच्या व्यवस्थापन महाविद्यालयातील 40 विद्यार्थी आणि एल. आल. (एश्र अश्र) या इस्रायली विमान कंपनीचे कर्मचारी गेले दोन आठवडे वाड्यामध्ये राहून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतनीकरणात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यात रमले होते. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्य दूत याकोव फिंकलश्टाईन हे वाड्यात आले होते. ... Read More »

युवासेनेमार्फत मनोर येथे आरोग्य शिबीर संपन्न

MANOR AAROGYA SHIBIR

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची शिबीरास हजेरी मनोर, दि. 30 (नाविद शेख)  : मनोर नजीकच्या खुटल शासकीय आश्रमशाळेत शिवसेना युवा सेना व युवा सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज, शुक्रवारी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरें यांनी हजेरी लावली. परिसरातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि स्थानिक रुग्णांचा शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. सुमारे 950 विद्यार्थी आणि 200 रुग्णांनी या ... Read More »

मनोर : अनधिकृत रेती वाहतुकीवर कारवाई

ANADHIKRUT RETI

मनोर, दि. 30 (नाविद शेख) : मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील वरई गावच्या हद्दीत अनधिकृत रेती वाहतूक करणारे चार ट्रक गुरुवारी पहाटे (ता.30) महसूल विभागाने धडक कारवाई करत जप्त केले. त्यांच्याकडून 4 लाख 75 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनोरचे मंडळ अधिकारी वसंत बारवे, बोईसर मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे आणि तलाठी नितीन सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सफाळे पोलीस ... Read More »

डोल्हारा केंद्रशाळेच्या मुख्याध्यापकांकडून शालेय पोषण आहारात घपला

POSHAN AAHAR GHAPLA1

> अडीच क्विंटल तांदळाचा अपहार > अध्यक्षांनी केला काळाबाजार उघड > मुख्याध्यापकार्ंींी कारवाईची मागणी > शालेय व्यवस्थापन समितीची तक्रार मोखाडा, दि. 31 ( दीपक गायकवाड) : विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी व शिक्षणाची गोडी लागावी म्हणून केंद्र व राज्य सरकारकडून देशभरात शालेय पोषण आहार ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. परंतू दस्तूरखुद्द शाळांकडूनच या योजनेत अपहार होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. असाच प्रकार मोखाडा ... Read More »

Scroll To Top