दिनांक 25 March 2019 वेळ 4:39 AM
Breaking News
You are here: Home » Breaking (page 5)

Category Archives: Breaking

मोखाड्यात पाणी टंचाईचा वैशाख वणवा भडकला!

टंचाईग्रस्त गावांनी गाठली पन्नाशी जुजबी उपाययोजनांवर भर दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 11 : मागील वर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे मोखाड्यात यंदा डिसेंबरच्या मध्यापासून म्हणजे दोन महिने अगोदरच पाणी टंचाईला सुरूवात झाली असुन सध्यस्थितीत मोखाड्यातील 46 गाव-पाड्यांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गाव-पाड्यांमध्ये 15 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर आणखी 4 गाव-पाड्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केल्याने मार्चच्या पहिल्याच आठवड्यात ... Read More »

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला 20 वर्षांची शिक्षा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 11 : तालुक्यातील नालासोपारा भागात अल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्यावर 2 वेळा लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला न्यायालयाने 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रमेशकुमार राजाराम शर्मा (वय 33) असे आरोपीचे नाव असुन पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेशकुमार शर्मा व पिडीत मुलगी एकाच इमारतीत राहावयास असुन 4 ... Read More »

ग्रामीण साहित्य हे अंतरंगातून स्फूरलेलं वास्तवदर्शी साहित्य – विजया मारोतकर

कुडूस येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन संपन्न! राजतंत्र न्यूज नेटवर्क/कुडूस, दि. 11 : ‘ग्रामीण साहित्याने वास्तववादी चित्रण केले असून ते ही दर्जेदार साहित्य आहे. व्याकरण, छंद या भाषीक परिघात स्वतःला न अडकवता अंतरंगातून जे स्फूरलं ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न या साहित्यिकांनी केला आहे.’ असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिका आचार्य विजया मारोतकर यांनी केले. वाडा तालुक्यातील कुडूस येथे साहित्य कला विचारमंच आयोजीत ... Read More »

डहाणूत विचित्र अपघातात बोमी मुबारकाई यांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 10: आज डहाणू शहरात झालेल्या विचित्र अपघातात बोमी इराणी (६५) यांचा जागीच मृत्यू झाला असून प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. मेरवान इराणी, हॉटेल पर्लाईनचे रॉनी इराणी व त्यांच्या पत्नी परिवाझ (पल्ली) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. हे सर्व जण जयपूर येथील एका लग्नसमारंभात उपस्थित राहून विमानाने मुंबईला आले व तेथून एकाच कारमधून मुंबईहून डहाणू येथे येत होते. त्यांच्यासोबत ... Read More »

विष्णू सवरांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : तालुक्यातील ऐनशेत, गोर्‍हे-गालतरे व कोने येथील विकासकामांचे आज, रविवारी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. एनशेत येथील राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत मंजूर झालेली नळ पाणीपुरवठा योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या गालतरे-गोर्‍हे आणि कोने – तुसे – बिलघर रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्री सवरा यांच्या हस्ते करण्यात ... Read More »

तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दोन आरोपी गजाआड

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : तालुक्यातील अबीटघर येथे एका 22 वर्षीय तरुणाची दगड व सिमेंट ब्लॉकने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती. या प्रकरणी अधिक तपास करताना वाडा पोलीसांनी संशयित म्हणून तिघांना ताब्यात घेतले होते. यापैकी एकाने गुन्ह्याची कबुली दिली असुन फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्याच्या अन्य एका साथिदारालाही कल्याण येथे सापळा रचून अटक करण्यात आली आहे. रजनलाल किसनलाल ... Read More »

धनगरांना दिलेल्या सवलतींविरोधात आदिवासी आक्रमक!

रॅली काढून व ठिय्या आंदोलन करत केला निषेध दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 10 : शासनाने धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयाला अनेक आदिवासी संघटनांचा विरोध आहे. या निर्णयामुळे धनगर समाजाने आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी केल्याची भावना आदिवासींमध्ये असुन याविरोधात मोखाड्यातील आदिवासी समाज संघटनेने आक्रमक होऊन, खोडाळा बाजारपेठेत निषेध रॅली काढली होती. तसेच बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवून शिवाजी ... Read More »

नगराध्यक्ष पदासह 28 पैकी 28 जागा जिंकून इतिहास घडवणार! -एकनाथ शिंदे

* पालघर नगर परिषद निवडणूक : वार्ताहर/बोईसर, दि. 10 : पालघर नगर परिषेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती नगराध्यक्ष पदासह 28 पैकी 28 जागा जिंकून इतिहास घडवणार आहे, असा विश्वास शिवसेना नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला आहे. पालघर येथे शिवसेना-भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांची पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले ... Read More »

आदिवासी बांधवांना वनपट्ट्यांचे वाटप!

वनपट्ट्यांसह आदिवासींना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणाचा प्रयत्न -मंत्री विष्णू सवरा प्रतिनिधी/डहाणू, दि. 10 : जिल्ह्यातील आदिवासी बांधव वर्षानुवर्षे अती दुर्गम भागातील वन विभागाच्या शासकीय जमिनी कसत आला आहे. अशा आदिवासी बांधवांना काल, शनिवारी वन मित्र मोहिमे अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. सकाळी 12 वाजता एच. एम. पी. शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी अध्यक्ष ... Read More »

सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात बौद्धिक संपदा हक्क कार्यशाळा संपन्न

राजतंत्र न्यूज नेटवर्क/शहापूर, दि 10 : शहापूर येथील सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता कक्ष व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विघमाने,  बौद्धिक संपदा हक्क, एकस्वाधिकार आणि वांडःमयचौर्य (Intellectual Property Rights, Copyrights and Plagiarism) या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी दिलीप भोपतराव, तर मुख्य अतिथी म्हणून म्हात्रे कॉलेजचे (भिवंडी) प्राचार्य डॉ. बाळासाहेब साळवे, विषेश अतिथी म्हणून सिलवासा येथील चौहान कॉलेजचे प्राचार्य डॉ. अंबादास जाधव आणि डॉ. ... Read More »

Scroll To Top