दिनांक 25 March 2019 वेळ 5:15 AM
Breaking News
You are here: Home » Breaking (page 4)

Category Archives: Breaking

स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण कार्यशाळेत संवाद टुल किटचे वाटप!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 15 : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता राखणार्‍या स्वच्छाग्रहींसाठी नुकतेच दोन दिवसीय अनिवासी तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पालघर पंचायत समिती सभागृहात आयोजित या कार्यशाळेत स्वच्छाग्रहींना संवाद टुल किटचे वाटप करण्यात आले. गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या महसुल गावनिहाय स्वच्छताग्रहींची निवड करण्यात आली आहे. गावपातळीवर वैयक्तिक, सार्वजनिक व संस्थात्मक स्वच्छता ... Read More »

10 लाखांची अवैध रेती जप्त, वसई पोलीसांची कारवाई

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 14 : वसई येथे अवैधरित्या रेतीचा उपसा करुन व चोरट्या पद्धतीने या रेतीची वाहतूक करणार्‍या 2 ट्रकवर पोलीसांनी कारवाई करत एकुण 10 लाख 30 हजार रुपयांची रेती जप्त केली आहे. 12 मार्च रोजी रात्री 11.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एम.एच. 04/ एच.वाय 7989 व एम.एच.48/ए.वाय. 9229 या क्रमांकाच्या दोन ट्रकमधून कोणाताही परवाना नसताना अज्ञात ... Read More »

डहाणूच्या वंदना कनोजा यांची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 13 : वडिलांचे छत्र हरपलेले असताना प्रतिकुल परिस्थितीत व कोणतेही क्लास न लावता महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची (एमपीएससी) परिक्षा उत्तीर्ण झालेल्या वंदना राजाराम कनोजा हिची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड झाली असुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Read More »

ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात रंगला पुरस्कार वितरण सोहळा!

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाङ्मय पुरस्कारांचे वितरण नाटककारही साहित्यिक असतो-प्रेमानंद गज्वी राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 13 : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 2018-19 च्या वाङ्मयीन पुरस्कारांचा वितरण सोहळा रविवारी ठाणे येथे मराठी ग्रंथ संग्रहालयात रसिक व लेखकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदाचा कोकण भूषण पुरस्कार ... Read More »

पालघर नगरपरिषद निवडणुक २०१९ : उमेदवारांकडून स्टॅम्प पेपरवर हमी घ्या! – प्रा. रंगराव गढरी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. १३: पालघर नगरपरिषदेच्या २३ मार्च रोजी होणाऱ्या निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवार घरी आल्यानंतर त्याच्यासमोर स्टॅम्प पेपर ठेवा आणि विकासाची हमी लिहून घ्या. तसेच लोकांनी नाते – गोते, जात – पात न पहाता व कुठल्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडून द्या असे आवाहन प्राध्यापक रंगराव गढरी यांनी केले आहे.  प्रा. गढरी यांचे आवाहनपत्र असे आहे.नमस्कार, मी रंगराव गढरी ,  वेवूर ... Read More »

चारोटी येथे 18 लाखांचे 450 ग्राम मेफेड्रोन जप्त!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 13 : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी हद्दीत 18 लाख रुपये किंमतीची 450 ग्राम मेफेड्रोन पावडर (ड्रग्स) जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असुन कासा पोलीस स्टेशन व मुंबई गुन्हे प्रतिबंधक शाखेने ही कारवाई केली. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरील मुंबई वाहिनीवर काल, मंगळवारी पहाटे कासा पोलीस स्टेशन व मुंबई गुन्हे प्रतिबंधक शाखेचे ... Read More »

विक्रमगड येथे लाच देण्याच्या प्रयत्नात डॉ. दिगंबर जेठे यास एसीबीकडून अटक

राजतंत्र न्यूज नेटवर्क/विक्रमगड, दि. १३:  येथील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिगंबर पुरुषोत्तम जेठे यास वनविभागाच्या अधिकाऱ्याला 3 लाख रुपयांची लाच देताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर युनिटने सापळा रचून ही कारवाई केली.  जेठे याने वनविभागाच्या मालकीच्या जागेत बांधकाम केले होते. ही बांधकामे पाडून टाकण्याची कारवाई करु नये याकरिता जेठेने वन विभागाच्या अधिकाऱ्याला 3 लाख रुपयांचे आमिष दाखविले. याबाबत ... Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त एम. के. ज्युनियर काॕलेज “ती” चा सन्मान

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 12 : एम. के. ज्युनियर काॕलेज मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त . “ती” चा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारीणी सदस्या डाॕ. सौ. रमिलाबेन श्राॕफ होत्या. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रॉफ यांनी महिला व विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. ओला कचरा व सुका कचरा दररोज वेगळे करण्याचा संकल्प करण्याचे ... Read More »

आयकर भरणे देशाच्या उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे -वीर बिरसा एक्का

वार्ताहर/बोईसर, दि. 12 : करदात्यांमार्फत आपल्या राष्ट्राचे सबलीकरण होत असून देशाच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी आयकर व इतर सर्व कर नियमितपणे भरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ठाणे आयकर विभागाचे प्रधान आयुक्त-3 वीर बिरसा एक्का यांनी येथील टिमा हॉल येथे आयोजित आयकरविषयक चर्चासत्रात केले. आयकर भरणारे सर्व करदाते तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये आयकर भरण्याबाबत जनजागृती करण्यासाठी व परस्परांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्यासाठी बोईसरमधील टिमा ... Read More »

अवैध दारु विक्रेत्यांवर तलासरी पोलीसांची कारवाई

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 12 : येथील विनापरवाना दारु विक्री करणार्‍या दोन दुकानांवर तलासरी पोलीसांनी छापा मारुन 32 हजार 400 रुपयांची दारु जप्त केली असुन याप्रकरणी अरविंद रावजी बरफ व संजय शितल्या म्हसे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धिमानीया-शिपाईपाडा गावच्या हद्दीत असलेल्या अरविंद बरफ व आंमगाव हद्दीत असलेल्या संजय म्हसे यांच्या किराणा मालाच्या दुकानातून अवैधरित्या ... Read More »

Scroll To Top