दिनांक 18 April 2019 वेळ 7:54 PM
Breaking News
You are here: Home » Breaking (page 26)

Category Archives: Breaking

आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त  ग्रामीण रुग्णालयात फळांचे वाटप

राजतंत्र न्युज नेटवर्क  वाडा, दि.२७ : शिवसेना नेते स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना नारळ पाणी (शहाळे) वाटप करण्यात आले. शिवसेनेचे वाडा शहर प्रमुख नरेश चौधरी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वाडा नगर पंचायतीच्या नरगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, नगर सेविका वर्षा गोळे, नयना चौधरी, जागृती काळन, प्रकाश केने, उमेश पठारे, प्रकाश पाटील रेश्मा ... Read More »

अर्नाळा येथील गोकुळ टाऊनशिप मध्ये पोलीस चौकी सुरु 

राजतंत्र न्युज नेटवर्क अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विरार पश्चिमेच्या लोकांच्या सोईसाठी गोकुळ टाऊनशिप मध्ये पोलीस चौकी सुरु करण्यात आली असून या नूतन चौकीचे वसई विभागाचे अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांच्या  हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे, स्थानिक नगरसेवक व महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का? दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय ... Read More »

दुचाकी अपघातात बालकाचा मृत्यू

राजतंत्र न्युज नेटवर्क  पालघर, दि. 27 : धुकटन-बहाडोली फाट्यावर दुचाकी अपघातात दोन महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महिला व 2 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सेल्वास येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  विक्रमगड येथील रहिवाशी असलेले रणजीत पागी हे शनिवार दि, 26 जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून पालघरच्या दिशेने येत होते. पालघर-मनोर रस्त्यावर धुकटन -बहाडोली फाट्याजवळ ... Read More »

वसईत कारशेडला आगे, 100 गाड्या जळून खाक

राजतंत्र न्युज नेटवर्क वसई, दि. 27: येथील टॅब कॅब कंपनीच्या कारशेडला लागलेल्या आगीत तब्बल 100 गाड्या जळून भस्मसात झाल्या आहेत. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली असून सुदैवाने घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. हे कारशेड वसईत मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत एका खुल्या जागेवर आहे.  वसई पूर्वेला ससूननगरमधील मालाजी पाडा भागात हे कारशेड आहे. या कारशेडला शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आग लागली. याची ... Read More »

डहाणू : खूनाच्या गुन्ह्यात २ आरोपींना शिताफीने अटक

RAJTANTRA MEDIA डहाणू दिनांक २६: रस्त्याच्या कडेला मुक्काम ठोकणाऱ्या आरोपीची पत्नी व मुलगी झोपलेल्या ठिकाणी बाजूला चटई टाकून झोपलेल्या मजूराला रागाच्या भरात मारहाण करुन ठार करणाऱ्या आरोपींना पकडण्यात डहाणू पोलीसांना यश आले आहे. हकीम पवार (३५) व रोहित चव्हाण (१९) अशी आरोपींची नावे आहेत. डहाणू येथील एसटी डेपोच्या बाहेरील बाजूस मणी, शंख विक्री करणारे आरोपी व त्यांच्या कुटूंबीयांचा पडाव होता. ... Read More »

बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून पेयजल योजनेचे भूमिपुजन

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. २५: दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पालघर जिल्हा परिषदेतर्फे पालघर तालुक्यातील दांडी, उच्छेळी व उनभाट या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पेयजल योजनेचे भूमिपुजन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार राजेश गावीत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष निलेश गंधे, प्रभाकर राऊळ, जिल्हा परिषद सदस्य तुलसीदास तामोरे ... Read More »

प्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. २५: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला श्रमजीवी संघटनेने उद्या (२६) जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक नेते विवेक पंडित यांनी भाजपसाठी काम केलेले असताना आता अचानक संघर्षाची भूमिका घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. श्रमजीवी संघटनेतर्फे आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दावा ... Read More »

पालघर जिल्ह्यात ठाकरे चित्रपटाचे शिवसैनिकांसाठी विशेष शो

राजतंत्र न्युज नेटवर्क स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनावर आधारित ठाकरे या चित्रपटांचे पालघर जिल्ह्यात शिवसैनिकांसाठी दुपारी १२ ते ३  च्या दरम्यान विशेष शो चे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट पहाण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. पालघरमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, प्रभाकर राऊळ, जगदीश धोडी, राजेश कुटे, वैभव संखे, नीलम संखे, श्वेता देसले व अन्य पदाधिकारी उपस्थित ... Read More »

वाड्यातुन अनेक दिंड्या निघाल्या त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना

राजतंत्र न्युज नेटवर्क वाडा, दि. २५ : संत निवृत्तीनाथांची यात्रा ३१ जानेवारी रोजी असते. त्यासाठी वाडा तालुक्यातुन पायी दिंड्या शुक्रवारी (दि. २५) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. तालुक्यातुन ठिकठिकाणावरुन निघालेल्या दिंड्यातील वारकऱ्यांना भक्तीभावाने निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वाडा तालुक्यातील मेट, देवघर ,नांदनी अंभरभुई, दिनकरपाडा, लोहपे, खानिवली, गुंज, अबिटघर, तिळसा, खरीवली, झिडके, या गावांसह पंधराहून अधिक ... Read More »

जव्हार : मतदार दिन उत्साहात साजरा

राजतंत्र न्युज नेटवर्क जव्हार, दि. 25- सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जव्हार येथे बोलताना केले. ते गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मतदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. नववा मतदार दिन आज जिल्हाभर उत्साहात साजरा करण्यात आला. जव्हार येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. या ... Read More »

Scroll To Top