दिनांक 18 April 2019 वेळ 8:45 PM
Breaking News
You are here: Home » Breaking (page 20)

Category Archives: Breaking

बेपत्ता मुले सुखरूप सापडली

राजतंत्र न्यूज नेटवर्क/सफाळे, दि. 22 : येथील तीन शाळकरी मुले घरात शाळेत जातो असे सांगुन गेली ती न परतल्याने सफाळे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिन्ही बेपत्ता मुले आज सीएसटी रेल्वे स्टेशन (मुंबई) येथे मिळुन आल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाने कळवले आहे. ते घरातून का निघून गेले होते याबाबतचे अजून कारण अजून स्पष्ट झालेले नाही. बुधवार, 20 ... Read More »

पालघर: नायब तहसिलदाराच्या विरोधात अव्वल कारकुनाने नोंदवला गुन्हा

RAJTANTRA MEDIA पालघर, दि. 22: पालघर तहसिलदार कार्यालयाच्या नेमणूकीतील निवडणूक नायब तहसिलदार रामकृष्ण सर्जेराव शेणेकर यांच्या विरोधात गैरहजर राहून निवडणूकीच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेणेकर हे 4 फेब्रुवारी 2019 पासून विनापरवानगी गैरहजर राहिलेले आहेत. दरम्यान कालच पालघर नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे निवडणूकीसंदर्भातील कामे खोळंबली असल्याचा ठपका ठेवून अव्वल कारकून यांनी ... Read More »

पालघर नगरपरिषदेसाठी 24 मार्च रोजी निवडणूक

आचारसंहिता लागू वार्ताहर/बोईसर, दि. 21 : पालघर नगरपरिषदेसाठी येत्या 24 मार्च रोजी निवडणूक होणार असुन पालघरसह निवडणूक होत असलेल्या सिंदखेडराजा व लोणार अशा तीन नगरपरिषद क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने आज दिली. पालघर नगरपरिषदेची 18 एप्रिल 2019 रोजी मुदत संपत असून मुदत संपणार्‍या पालघरसह सिंदखेडराजा व लोणार या दोन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना, आरक्षण ... Read More »

कुत्र्याला मारहाण प्रकरणी विशाल वाडेकरवर गुन्हा दाखल

Rajtantra Media डहाणू दि. 21: डहाणू शहरातील महालक्ष्मी प्लाझा (मल्याण) या इमारतीमधील ‘ जलसा ‘ कॅफेचे संचालक विशाल वाडेकर यांच्यावर रस्त्यावरील कुत्र्याला मारहाण केल्याप्रकरणी डहाणू पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 428 व प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू ॲनिमल ॲक्ट,1960 मधील कलम 11(1) व मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. विशालच्या मारहाणीत कुत्रा लंगडू लागल्याचे फिर्यादीत नमूद केले ... Read More »

शिवसेनेच्या प्रयत्नाने पुन्हा उजळले आम्ले गाव

सौरउर्जा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित पाणीपुरवठ्याचाही प्रश्‍न मार्गी! तर खोडाळ्यात मोबाईल सेवा सुरू! दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 21 : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या सहकार्याने आणि मोखाडा तालुका शिवसेनेच्या प्रयत्नातून अतिदुर्गम अशा आम्ले गावात धुळखात पडलेला सौरउर्जा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यात आला असुन यामुळे आम्ले गाव पुन्हा उजळले आहे. वीजेची सोय झाल्याने एन पाणी टंचाईच्या काळात पाणीपुरवठा देखील सुरळीत झाला आहे. त्याबरोबर ... Read More »

ग्रंथवाचनातून चिकित्सक वृत्ती वाढते! – हितेंद्र शाह

दांडेकर महाविद्यालयात आयोजित ग्रंथोत्सवाला भरभरून प्रतिसाद वार्ताहर/बोईसर, दि. 21 : ग्रंथ व्यक्तीमत्वाला परिपूर्णता आणतात तसेच ग्रंथवाचन सवयीमुळे व्यक्तीची, विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती वाढते, त्यामुळे प्रत्येकात ग्रंथवाचनाची सवय व पुस्तक वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे तरच व्यक्ती व समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकेल, असे प्रतिपादन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे कोषाध्यक्ष हितेंद्र शाह यांनी केले. सोनापंत दांडेकर महाविद्यालयाच्या रा. हि. सावे ग्रंथालयाच्या वतीने ... Read More »

जिल्ह्यातील 39 हजार 533 विद्यार्थांनी दिला 12 वीचा पहिला पेपर

वार्ताहर/बोईसर, दि. 21 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेला आज, गुरुवारपासुन सुरुवात झाली असुन पालघर जिल्ह्यातील 39 हजार 533 विद्यार्थांनी आज पहिला पेपर सोडवला. जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 43 परीक्षा केंद्रावर 12 वीच्या परीक्षा घेण्यात येत असुन तालुकानिहाय आकडेवारीनुसार, वाड्यातील 2 हजार 926 विद्यार्थी, मोखाड्यातील 1 हजार 244 विद्यार्थी, तलासरीतील ... Read More »

दारु तस्करी प्रकरणी 2 जणांना अटक

माधव तल्हा / Rajtantra Media डहाणू दि. २१: दमण येथून बेकायदेशीरपणे उत्पादन शुल्क बूडवून महाराष्ट्रात दारुची तस्करी करणाऱ्या २ जणांना पालघर पोलीसांच्या विशेष पथकाने मुंबई अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी येथे अटक केली आहे. कुणाल रमेश म्हात्रे (२५) व सागर विठ्ठल लकडे (३०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एम एच ०५ ए एक्स ५५८८ क्रमांकाची मारुती स्विफ्ट कार देखील जप्त ... Read More »

सैनिकांविषयी अपशब्द – रिक्षाचालकास अटक

वैदेही वाढाण बोईसर, दि. 21 : जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असलेल्या सैनिकांबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी येथील एका रिक्षा चालकावर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 153 (दंगलीसाठी चिथावणी देणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीम शेख असे या रिक्षा चालकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. नदीम हा तारापूरचा रहिवासी असून तो बोईसर तारापूर दरम्यान ६ आसनी मिनीडोअर चालवतो. काल त्याच्या ... Read More »

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारच्या धडकेत बिबट्या ठार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 20 : कारने धडक दिल्यामुळे बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई – अहमदाबाद महामार्गावर घडली असुन बिबट्याच्या धडकेनंतर नियंत्रण सुटलेल्या कारमधील दोघे जण जखमी झाले आहेत. महामार्गावरील धानिवरी हद्दीतील आंबोली येथे हा अपघात घडला. अंदाजे चार वर्षांचा मादी बिबट्या अहमदाबाद – महामार्ग ओलांडत असताना मुंबईच्या दिशेने जाणार्‍या स्विफ्ट डिझायर कारने त्याला धडक दिली. ही धडक इतकी ... Read More »

Scroll To Top