दिनांक 25 March 2019 वेळ 5:24 AM
Breaking News
You are here: Home » Breaking (page 2)

Category Archives: Breaking

जव्हारचा ललित मौळे झाला अधिकारी, एकाच वेळी 3 स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तीर्ण

राजतंत्र न्यूज नेटवर्क/जव्हार, दि. 19 : येथील ललित मौळे यांनी एकाच वर्षात महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या (एमपीएससी) तीन विविध स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण करण्याची किमया साधली आहे. नुकतेच या स्पर्धा परिक्षांचे निकाल जाहीर झाले असुन मौळे यांची नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, राज्य कर निरिक्षक व मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी अशा 3 विविध पदांसाठी निवड झाली आहे. त्यांनी मिळवलेल्या या ... Read More »

जिल्ह्यातील विविध भागातून 67 हजारांची दारु जप्त!

> 10 जणांवर गुन्हे दाखल राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 19 : पालघर जिल्हा पोलीसांनी आज, मंगळवारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध दारु धंद्यावर छापा मारुन 67 हजार 430 रुपये किंमतीची अवैध दारु जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पालघर, बोईसर, केळवे, सफाळा, तलासरी, घोलवड, वाडा, अर्नाळा व वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात ... Read More »

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर सोशल मिडीयावर पोलीसांचा वॉच

मेसेज फॉरवर्ड करताना सावधान; पालघर पोलीसांचा इशारा राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 18 : देशात लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर झाल्या असुन निवडणूक काळात राजकिय नेते, एखादा व्यक्ती किंवा एखाद्या समाजाविषयी कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण न होण्याच्या दृष्टीने पालघर पोलीस जिल्ह्यातील नागरीकांच्या सोशल मिडीयावर वॉच ठेवत असुन तेढ निर्माण करणारे कोणतेही संदेश फॉरवर्ड करताना सावधानता बाळगा, असे आवाहन पालघर पोलीसांनी केले आहे ... Read More »

विरारमध्ये 14 लाखांचे कफ सिरफ व दिड लाखांचा गुटखा पकडला

राजतंत्र न्यूज नेटवर्क/विरार, दि. 19 : मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विरार हद्दीत पोलीसांनी एका टेम्पोवर कारवाई करुन 14 लाख 40 हजार रुपये किंमतीचा कफ सिरफचा साठा व 1 लाख 68 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. सदर कप सिरपबाबत अधिक माहिती मिळू शकली नसली तरी नशेसाठी त्याचा वापर होत असल्याचे समजते. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी (दि.17) पालघर ... Read More »

तांदुळवाडी किल्ल्यावर अडकलेल्या 21 पर्यटकांची सुखरुप सुटका

सफाळे, दि. 18 : येथील तांदूळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या व अंधारात रस्ता भरकटल्याने येथील घनदाट जंगलातील डोंगरावर अडकलेल्या 21 पर्यटकांची स्थानिकांच्या मदतीने पोलीसांनी सुखरुप सुटका केली. हे सर्व पर्यटक ठाणे व मुंबई परिसरातील आहेत. काल, 17 मार्च रोजी हिमांशु जैन, जैनम लोधा, शुभम शर्मा, साक्षी शहा, ग्रीशा ओसा, उर्मी वाकरीया, दिव्या गौरे, शशिकांत आवर्क, जयराणी लठ्ठ, हरिष ठाकुर, हर्षद बाफना, ... Read More »

बोईसर : सराईत दुचाकी चोरटा गजाआड, 3 दुचाकी हस्तगत

बोईसर, दि. 18 : बोईसर शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करणार्‍या एका चोरट्याला गजाआड करण्यात बोईसर पोलीसांना यश आले असुन सुमित रमेश तिलवानी असे सदर चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून 3 दुचाकी पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत. मागील काही दिवसात बोईसरमधील एसटी आगार परिसर, ओत्सवाल एम्पायर व दांडीपाडा येथून एकुण 3 दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी बोईसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. ... Read More »

मोखाड्यातील मजूर व व्यापार्‍यांची होळी कडकीत

नरेगाच्या कामांचा तुटवडा बाजारपेठांमध्ये मंदिचे सावट होळीच्या आनंदावर विरजण दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 18 : आदिवासींचा सर्वात मोठा सण म्हणजे होळी. हा सण आदिवासी मोठ्या उत्साहात साजरा करतात. या सणाला नव्या कपड्यांसह गोड-धोड पदार्थ बनविण्यासाठी गुळ, खोबरे, रवा, मैदा, साखरेच्या हलवण्याचे दागिने तसेच कोंबडीचा बेत आदिवासी करतात. साहजिकच हा सण व्यापार्‍यांसाठी देखील पर्वणीच असतो. त्यामुळे व्यापारी या सणाला मोठ्या प्रमाणात सदर ... Read More »

वाडा नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांविरोधात उपोषण

मनमानी व अकार्यक्षम कारभाराचा आरोप! सत्ताधारी शिवसेना सदस्यांचीही जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार प्रतिनिधी/वाडा, दि. 18 : वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांच्यावर मनमानी व अकार्यक्षम कारभाराचा आरोप करत तसेच नगरपंचायतीच्या सामान्य तपासणी दरम्यान तपासणी अधिकार्‍यांनी मुख्याधिकारी मवाडेंवर ठेवलेल्या ठपक्यांच्या अनुषंगाने कारवाई व्हावी, या मागणीसाठी येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे निखिल भानुशाली व सामाजिक कार्यकर्ते अनंत सुर्वे यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन ... Read More »

सहजीवन जेष्ठ नागरिक संघातर्फे गरजूंना जुन्या कपड्यांचे वाटप

Share on: WhatsApp Read More »

दुकानाचे शटर तोडून कपड्यांची चोरी

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : वाड्यातील खंडेश्वर नाका येथील हरिओम कॉम्प्लेक्स बिल्डिंगच्या तळमजल्यावर असलेल्या साईलीला मेन्स वेअर या दुकानाचे शटर तोडून दुकानातील हजारो रुपये किंमतीचे तयार कपडे चोरट्यांनी लंपास केले आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली. हर्षल व अभिजीत शर्मा नामक दोघा भावंडांचे सदर दुकान असुन या दुकानात पुरुषांचे विविध कंपन्यांचे तयार कपडे विक्री केले जातात. विशेष म्हणजे हरिओम कॉम्प्लेक्स ... Read More »

Scroll To Top