दिनांक 27 May 2019 वेळ 6:28 AM
Breaking News
You are here: Home » Breaking

Category Archives: Breaking

वाडा : पिशवी फाडून लाखोंचा ऐवज चोरला

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वाडा, दि. 26 : तालुक्यातील कुडूस येथील बाजारात बाजार करण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या नकळत तिच्या हातातील पिशवी फाडून त्यातील 1 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास सापने येथील रहिवासी असलेली 43 वर्षीय महिला कुडूस बाजारपेठेत बाजार करण्यासाठी आली होती. यावेळी तीने बाजार करण्यासाठी ... Read More »

तलासरीत भारतीय मजदूर संघाची कार्यकारणी बैठक संपन्न!

हरिश्चंद्र लक्ष्मण कापसे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली प्रतिनिधी/तलासरी, दि. 26 : भारतीय मजदूर संघटनेच्या वतीने तलासरी तालुक्याची पहिली नवीन कार्यकारणीची बैठक आज, रविवारी विश्व हिंदू परिषद आश्रमात महाराष्ट्र राज्याचे असंघटित कामगार संघाचे मोहन पवार आणि पालघर जिल्ह्याचे सचिव चंद्रकांत नेवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी विजवितरण महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष कु. निर्मला माह्यावंशी, सह सचिव संतोष वरठा यांची उपस्थिती होती. या ... Read More »

वाड्यातील केतन जाधवने केले एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत

पालकमंत्री विष्णु सवरा यांच्याकडून अभिनंदन राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि 25 मे : वाडा तालुक्यातील माधवराव काणे अनुदानित आश्रम शाळा, देवगाव येथील केतन सीताराम जाधव या अकरावी इयत्तेतील आदिवासी विद्यार्थ्याने जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर 23 मे रोजी पहाटे 5 वाजुन 10 मिनिटांनी पादाक्रांत केले. त्याच्या या कामगिरीबद्दल आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णु सवरा यांनी त्याचे अभिनंदन केले ... Read More »

भरधाव ट्रकने दोघांना उडवले, 1 ठार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 24 : येथे भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने दोन जणांना धडक दिल्याने एकाचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, 23 मे रोजी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. तलासरी तालुक्यातील काजळी गावाच्या हद्दीत 2 इसम रस्त्याच्या कडेने पायी चालत असताना भरधाव वेगात काजळीहून आमगावच्या ... Read More »

नालासोपार्‍यात 6 वर्षीय मुलीवर बलात्कार

जाब विचारणार्‍या पीडितेच्या पित्याला मारहाण राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 24 : नालासोपारा येथे 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तसेच याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या पित्याला आरोपीने शिविगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आईने याबाबत तुळींज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असुन त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित मुलगी 22 मे रोजी रात्री ... Read More »

पालघरचा गड शिवसेनेने जिंकला!

88598 हजारांनी राजेंद्र गवितांचा विजय बविआच्या बळीराम जाधव यांचा केला पराभव वार्ताहर/बोईसर, दि. 23 : गेल्या महिन्याभरापासून पालघरचा गड कोण जिंकणार याची उत्सुकता आज, 23 मे रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपली असुन शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा अखेर विजय झाला आहे. गावित यांनी 88 हजार 598 मताधिक्क्याने बळीराम जाधव यांना पराभवाची धूळ चारली. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ... Read More »

थोडक्यात महत्वाच्या बातम्या. (दि. 23/5/2019)

दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी 3.6 लाखांची रोकड लांबवली वसई, दि. 23 : बँकेत पैसे भरण्यासाठी निघालेल्या एका 70 वर्षीय वृद्धाकडील 3 लाख 60 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून पळ काढल्याची घटना येथे घडली आहे. काल, 22 मे रोजी सकाळी 10.45 च्या सुमारास ही घटना घडली. सदर वृद्ध रिक्षाने बँक परिसरात पोहोचल्यानंतर रिक्षातून उतरत असताना ... Read More »

सागरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मुंबई, दि. 22 : सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे येत्या 20 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्य व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन या 6 महिन्याचे प्रशिक्षण वर्सोवा ... Read More »

विवाहितेचा अमानुष छळ, सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 22 : अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेऊन त्याची व्हिडीओ क्लिप बनवून ती व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला गर्भपात करण्यास प्रवृत्त करणार्‍या पतीसह घरगुती कारणांवरुन अमानुष छळ करणार्‍या तिच्या सासरच्या मंडळीविरोधात नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 5 महिन्यांपुर्वी ती गरोदर असताना तिच्या पतीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेऊन त्याची व्हिडीओ क्लिप बनवली ... Read More »

मोखाड्यातील दोन टंचाईगस्त गावांना दिगंतचा आधार

सौरऊर्जेचा वापर करून केला जातोय पाणीपुरवठा प्रतिनिधी/जव्हार, दि. 22 : मोखाडा तालुक्यातील पर्जन्यमान हे अतिवृष्टी (2400 मिमी) प्रवर्गात येत असले तरीही जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाई, तर एप्रिलमध्ये बहुसंख्य गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा हा विरोधाभास हे या तालुक्यातील वास्तव आहे. दुसरीकडे तालुक्यातून 7 नद्या वाहतात आणि तीन मध्यम लघुसिंचन प्रकल्प असताना त्यातील कोट्यावधी लिटर पाणी अनेक दशकांपासून असेच पडून आहे. विजेची कमतरता ... Read More »

Scroll To Top