दिनांक 09 December 2019 वेळ 10:06 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या

Category Archives: ताज्या बातम्या

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वाड्यात प्रशिक्षण मेळावा

स्वयंसहायता बचत गटांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री हजारो महिलांची उपस्थिती; बचतगटांचा सहभाग बचतगटाच्या उत्पादनाला व्यापारचिन्ह देण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील! -चंद्रकांत वाघमारे प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण्याच्या उद्देशाने वाडा पंचायत समिती व उमेद संस्थेच्या माध्यमातून महिला प्रशिक्षण मेळावा वाड्यातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शनिवारी (दि. 7) आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यरत असलेल्या स्वयंसहायता महिला बचत ... Read More »

अन्नदिनाचे ओझे शिक्षकांच्या खांद्यावर

शिक्षकांच्या उपस्थितीत धान्य वितरण करण्याला शिक्षकांचा विरोध विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती प्रतिनिधी/वाडा-कुडूस, दि. 8 : शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहचविण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा विभागाची असताना अन्नदिनाच्या नावाखाली जिल्ह्यातील शिक्षकांना या कामाला जुंपल्याने शिक्षकांमध्ये असंतोष असून याविरोधात शिक्षक सेनेच्या वतीने वाडा तहसिलदारांना शनिवारी (दि. 7) निवेदन देण्यात आले आहे. अगोदरच शिक्षकांवर निवडणूकीची कामे, जनगणना, स्वच्छता अभियान राबविणे ... Read More »

तलासरी : दरोड्यातील आरोपींना पाच वर्षांची शिक्षा

पालघर सत्र न्यायालयाचा निकाल प्रतिनिधी/डहाणू, दि. 8 : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी हद्दीत लघुशंकेसाठी गाडी थांबवलेल्या कारमधील प्रवाशांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर किंमती ऐवज लुटून पोबारा करणार्‍या दोन दरोडेखोरांना पालघर येथील सत्र न्यायालयाने 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 22 नोव्हेंबर 2014 रोजी यातील फिर्यादी व त्यांचे इतर 4 सहकारी आपल्या एम.एच.11/बी.ई. 700 या क्रमांकाच्या ... Read More »

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आणखी एका आरोपीला कारावास

प्रतिनिधी/डहाणू, दि. 8 : अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग करुन अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पालघर येथील जिल्हा न्यायालयाने आणखी एका आरोपीला पोस्को (बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा) कायद्यांतर्गत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राजेश सना शिंगडा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 15 दिवसांपुर्वीच अशाचप्रकारच्या गुन्ह्यातील अन्य एका आरोपीला न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मार्च 2017 रोजी ... Read More »

राष्ट्रवादीला खंबीर नेतृत्वाची गरज; रेखाताई पष्टेंना विधान परिषद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी

प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गलितगात्र झाला असताना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश हे सर्वच राजकीय धुरिणांना अचंबित करणारे ठरले आहे. कोणताही महत्वाचा नेता पक्षात नसताना पक्षाने विक्रमगड व शहापूर विधानसभा मतदारसंघात चांगले यश मिळविल्याने पालघर जिल्ह्याला खंबीर नेतृत्व असते तर अधिक चांगले यश मिळवता आले असते असे राजकीय जाणकारांचे मत आहे. तर अशीच ... Read More »

मनोर : दमण बनावटीच्या दारुची वाहतूक करणार्‍या तिघांना अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/मनोर, दि. 6 : कारमधुन विनापरवाना दमण बनावटीच्या बियरच्या साठ्याची वाहतूक करणार्‍या 3 जणांना मनोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल, गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील हालोली जिवदानी हॉटेल येथे ही कारवाई करण्यात आली. भरत राममुरत पाल (वय 29), दिपक राजकुमार पाल (वय 24) व दिपक भरत जैस्वाल (वय 23, सर्व रा. गुजरात) असे तिघे ... Read More »

वसईतील अंबाडी रोडवरील लेडीज बारवर छापा

14 बारबालांसह हॉटेल कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 6 : वसई पश्‍चिमेतील अंबाडी रोड (पंचवटी नाका) येथील संगीत बार नामक लेडीज बारवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत 14 बारबालांसह हॉटेलचा मॅनेजर व दोन वेटर अशा एकुण 17 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटकडून 4 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 8.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात ... Read More »

डहाणू तालुका काँग्रेसतर्फे महामानवाला अभिवादन

Share on: WhatsApp Read More »

वाडा शहर रस्ता रुंदीकरणाला अखेर मुहूर्त सापडला

दोन महिन्यात पूर्ण होणार काम प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाला सार्वजनिक बांधकाम विभागाला अखेर मुहूर्त सापडला असून गुरुवारी (दि. 5) रात्री पासून रस्त्याच्या दुतर्फा असलेले अडथळे व अतिक्रमित जागा मोकळी करण्यास सुरुवात करुन दोन महिन्यात शहरातील रस्तारुंदीकरण करण्यात येणार असल्याचे वाडा सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उप अभियंता प्रकाश पातकर यांनी सांगितले. पालघर – वाडा – देवगाव या ... Read More »

बोईसर-राणीशिगांव येथील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड

11 जणांना अटक; सुमारे 57 हजारांचा मुद्देमाल जप्त वार्ताहर/बोईसर, दि. 5 : बोईसरमध्ये राजरोसपणे जुगार व सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात सुरू असून तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अशा सर्वांनाच मोठ्या प्रमाणात त्याचे वेड लागल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशा अड्ड्यांवर कारवाई करण्यात येत असुन मंगळवारी (दि.3) राणीशिगाव येथील सत्यनगर आदिवासी पाड्यावर सुरु असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारुन 11 जणांना ताब्यात ... Read More »

Scroll To Top