दिनांक 23 January 2018 वेळ 3:28 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार

Category Archives: नागरिक पत्रकार

वाडा शहरातील विकासकामांचे भूमिपूजन

WADA BHUMIPUJAN

वाडा दि. 2: शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे 40 लाख रुपये किंमतीच्या मंजूर झालेल्या वाडा शहरातील रस्त्यांचे भूमिपूजन वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्वीनी शेळके, जिल्हा परिषद सदस्या किर्ती हावरे, पंचायत समिती सदस्य मेघना पाटील, वाडा पोलीस निरिक्षक रवींद्र नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. गेली अनेक वर्षे वाडा शहरातील अंतर्गत ... Read More »

जव्हारच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले हजारो ग्रामस्थ ग्रामसभा जागरण मेळावा, वयम् चळवळीचा पुढाकार

JAWHAR NEWS

मनोज कामडी जव्हार, दि. 29 : पेसा कायद्यान्वये आदिवासी पाड्यांना पेसा गावांचा दर्जा देण्यात आला असून पाड्यांच्या ग्रामसभेला ताबडतोब मान्यता द्या, ही मागणी घेऊन वयम् चळवळीच्या नेतृत्वाखाली येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामसभा जागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी जव्हार-मोखाड्यातील 42 पाड्यांतील सुमारे अडीच हजार ग्रामस्थ अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. या मेळाव्यात पेसा कायद्याच्या नियमांनुसार पाडोपाड्यांच्या ग्रामसभांना शासनाने तात्काळ मान्यता द्यावी, जल-जंगल-जमीन-रेती-दगड-माती ... Read More »

पळसुंडा आणि सुर्यमाळ आश्रमशाळांची कामे कुर्मगतीने

IMG-20171004-WA0123

मोखाडा तालुक्यात मौजे पळसुंडा आणि सुर्यमाळ येथे नविन आश्रमशाळा ईमारतींची कामे सुरू आहेत.मागील ४ वर्षांपासून ईमारतींची कामे सुरू असून प्रस्तूत कामांची विहीत मुदतही संपून गेली आहे.तरी देखील ईमारती अर्धवट अवस्थेतच आहेत.त्यामूळे विद्यार्थ्यांना आजही दाटीवाटीने शिक्षन घ्यावे लागत आहे. मोखाडा तालुक्यातील जुन्या आश्रमशाळा ईमारतींची अवस्था अत्यंत बिकट आहे.शेकडो विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी शिक्षण आणि त्याच ठिकाणी निवासाची सोय असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जिवनमानावर ... Read More »

रोटरी क्लब ऑफ डहाणूचे रस्ते सुरक्षा अभियान

ROTARY SWATCHTA ABHIYAN

शिरीष कोकीळ डहाणू दि. 16 : रोटरी क्लबच्या अंतर्गत रोटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांतर्फे डहाणू पोलीसांच्या सहाय्याने रस्ते सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले होते. डहाणू तालुक्यातील एच. एम. पी. स्कूल, सेंट मेरी हायस्कूल, के. एल. पोंदा हायस्कूलसह शहरातील 6 रोटरॅक्ट क्लबचे विद्यार्थी व रोटरी क्लबचे पदाधिकारी या अभियानात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे विविध फलकांद्वारे तसेच घोषणांद्वारे वाहनचालकांनी पाळावयाच्या सुरक्षा नियमांबाबत जनजागृती ... Read More »

गुंतवणूकदारांची 81 लाखांची फसवणूक शुभम करोतीच्या 3 जणांविरुद्ध गुन्हा

LOGO 4 Online

बोईसर, दि. 12 : आरडी व फिक्स डिपॉझिटच्या स्वरुपात लोकांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करुन घेऊन ठेवीची मुदत संपूनही रक्कम परत न करता पसार झालेल्या शुभम करोती फूड्स प्रा. ली. नामक कंपनीच्या 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित सक्सेना (रा. पुणे), सुधीर पवार (रा. पुणे) व श्रीपती यादव (रा. तलासरी) अशी तिघांची नावे असुन त्यांच्यावर 100 गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा ... Read More »

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लाचखोर लिपीकाला अटक

LOGO 4 Online

दि. 02 : तिन महिन्यांचा पगार, घरभाडे व दुर्गम भागातील भत्ता थकबाकी बील काढण्यासाठी 7 हजारांची लाच मागणार्‍या पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लाचखोर लिपीकाला पालघर ऍन्टी करप्शन ब्युरोने रंगेहाथ अटक केली आहे. कैलास जेसा चव्हाण (वय 55) असे अटक करण्यात आलेल्या लिपीकाचे नाव आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने थकबाकी असलेला 3 महिन्यांचा पगार, घरभाडे व दुर्गम भागातील भत्ता याबाबतचे ... Read More »

जागतिक मधमाशीपालन दिनानिमित्त डहाणूत जनजागृती कार्यक्रम

JAGTIK MADHMASHI PALAN DIN

शिरीष कोकीळ डहाणू दि. 20 : जागतिक मधमाशीपालन दिनाचे औचित्य साधून खादी ग्रामोद्योग केंद्र येथे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधमाशांचे पर्यावरणातील महत्वाचे स्थान, मधमाशी पालनाच्या पद्धती, ती चावल्यास करावयाच्या उपचारपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी डहाणू येथील खादी ग्रामोद्योग केंद्राचे प्राचार्य विलास लाडे, विकास अधिकारी सुरेश गायकवाड, तांत्रिक विभागाचे प्रमुख वाय. आर. टिपलं, तांत्रिक अधिकारी (मध) ... Read More »

डहाणूतील विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत सुयश

DAHANU KARATE SPRADHA

डहाणू, दि. 09 : फायर विंग्स मार्शल आर्ट-वर्ल्ड कंकोशी शोतोकान कराटे संस्थेतर्फे 6 ऑगस्ट रोजी आयोजीत करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत डहाणूतील विद्यार्थ्यांनी दणदणीत यश प्राप्त केले आहे. ठाणे येथील श्रीमती सावित्री देवी शिराई विद्यामंदिर येथे या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. यात काता प्रकारात मुलांच्या 14 वर्षाच्या गटात धु्रवल प्रकाश पाटील याने सुवर्ण पदक पटकावले. तर मुलांच्या 9 वर्षाच्या ... Read More »

धाकटी डहाणू शाळेचा कायापालट! केंद्रप्रमुख व शिक्षिकेच्या कार्याची शासनाकडून दखल

DHAKTI DAHANU SHALA2

विविध संस्था, शासकीय योजना व लोकसहभागातून धाकटी डहाणू जिल्हा परिषद शाळा क्र. 2 चा कायापालट करणार्‍या केंद्रप्रमुख व शिक्षिकेच्या कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा परिषदेमार्फत गौरविण्यात येणार आहे. केंद्रप्रमुख विजय पाटील व उपशिक्षिका केतकी केतन संखे यांनी अथक प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळेचे आधुनिक डिजीटल शाळेत रुपांतर केले आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या प्राथमिक शाळेत पूर्णत: आधुनिक वाचनालय, विज्ञान ... Read More »

आदिवासी मुलांमध्ये गुणवत्ता असून त्याला चालना देणे आवश्यक! – डॉ. मोहन पटेल

MOHAN PATEL

शिरीष कोकीळ/डहाणू दि. 31 : आदिवासी मुलांमध्ये गुणवत्ता असून त्याला चालना देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबईचे माजी शेरीफ डॉ. मोहन पटेल यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते डहाणू व तलासरी तालुक्यातील शालांत परिक्षांमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव करताना बोलत होते. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट तर्फे आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन प्लॅनेटरी सोसायटीचे अध्यक्ष ... Read More »

Scroll To Top