दिनांक 21 January 2018 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी

Category Archives: थोडक्यात महत्वाची बातमी

प्रत्येक आदिवासी शाळांकरिता क्रीडा शिक्षकाची नियुक्ती करणार आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची माहिती

????????????????????????????????????

ठाणे, दि 19 : खेळांचे महत्व वाढावे यासाठी प्रत्येक आदिवासी शाळांकरिता क्रीडा शिक्षकाची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज दिली. शासकीय अनुदानित आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ आज शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथे झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आत्मा मालिक शैक्षणिक संकुल येथे या स्पर्धा सुरु आहेत. प्रधान सचिव आदिवासी मनीषा वर्मा आणि ... Read More »

मोखाडा तालुक्यात स्थलांतर रोखण्यासाठी वृक्ष लागवडीतून रोजगार निर्मिती आरोहण संस्था व ऑल कार्गोचा संयुक्त उपक्रम

VRUKSH LAGVAD ROJGAR

मनोज कामडी जव्हार, दि. 19 : मोखाडा तालुका हा कायम कुपोषणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. येथे असणार्‍या कुपोषणाची समस्या ही दारिद्य्र व रोजगाराच्या अभावामुळे अधिक निर्माण होत असल्याने यावर उपाय म्हणून येथील आरोहण सामाजिक संस्था व मुंबई येथील ऑल कार्गो लॉजिस्टिक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आदिवासी कुटुंबाना कायमस्वरूपी रोजगार मिळून त्यांचा आर्थिक स्थर उंचवून दारिद्य्र कमी व्हावे यासाठी सन ... Read More »

महाराष्ट्रातील 15 महिलांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते फर्स्ट लेडी पुरस्कार पालघर जिल्ह्यातील रजनी पंडित यांचा समावेश

FIRST LADU PURSKAR

नवी दिल्ली : विविध क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणार्‍या महाराष्ट्रातील 15 महिलांसह देशातील 112 कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज, शनिवारी फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे देशातील पहिल्या महिला नोंदणीकृत गुप्तहेर ठरलेल्या पालघर जिल्ह्यातील रजनी पंडित यांचाही यात समावेश आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम ... Read More »

डिजिटल युगात सायबर सुरक्षा महत्वाची अपर पोलिस अधिक्षक चव्हाण यांचे प्रतिपादन

CYBER GUNHE

पालघर, दि. 19 : आजच्या डिजिटल युगात सर्व सेवा ऑनलाईन होत आहेत. मात्र इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगारी वाढते आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वांनी सायबर सुरक्षा पाळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अपर पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांनी केले. ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियानाचे सेंट जॉन महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा माहिती ... Read More »

जव्हारचा ईशान ठरला राज्यस्तरीय कांस्य पदकाचा मानकरी

BOXING ISHAN BHISE

जव्हार, दि. 19 : नुकत्याच पार पडलेल्या 11 व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत येथील ईशान भिसे या विद्यार्थ्याने कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. पुण्यातील खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियमवर महाराष्ट्र थाय बॉक्सिंग असोसिएशनच्या सहभागाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी 18 जिल्ह्यातील जवळपास 360 थाय बॉक्सर सहभागी झाले होते. या स्पर्धा विविध वयोगटात खेळविण्यात आल्या. पालघर जिल्ह्यातील ... Read More »

पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्या हस्ते कौशल स्मृती डायलेसिस सेंटरचे उद्घाटन

SIALESIS CENTER

प्रतिनिधी दि. 19 : तालुक्यातील खुपरी येथील आनंद चंदावरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व कल्याणी रिसर्च सेंटर येथे मधुमेही रूग्णांसाठी कौशल स्मृती डायलेसिस सेंटर सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा या ग्रामीण तालुक्यातील हे पहिले डायलेसिस सेंटर आहे. या प्रसंगी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मजुंनाथ सिंगे, ... Read More »

वाड्यातील रावतेपाडा येथे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन

MAGHI GANESHOSTAV

प्रतिनिधी वाडा, दि. 18 : वाडा तालुक्यातील रावतेपाडा येथे माघी गणेश जयंती उत्सव रविवार 21 जानेवारी रोजी साजरा होत आहे. या निमीत्ताने येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 9 ते 12 अभिषेक, दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत आरती, दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद, दुपारी 3 ते 7 वाजेपर्यंत पालखी सोहळा तर सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ... Read More »

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी राजेश शहा उत्तम पिंपळेंची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी

RAJESH SHAHA

विशेष प्रतिनिधी पालघर, दि. 18 : शिवसेना पक्ष नेतृत्वाने संघटनात्मक बदल करत जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांची पदावरून उचलबांगडी केली असून राजेश शहा यांच्या खांद्यावर पालघर जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुखपदाची धुरा सोपविली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील शिवसेनेअंतर्गत संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले होते. अखेर बुधवारी (दि. 17) शिवसेना प्रमुख  उध्दव ठाकरे यांनी पालघरच्या जिल्हाप्रमुखपदी शहा यांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेत येत्या काळात ... Read More »

शिवसेना व युवासेनेच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा

VATRUTVA SPARDHA

वाडा, दि. 18 : शिवसेना प्रङ्कुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्ङ्कवीर आनंद दिघे यांच्या जयंती निङ्कित्त वाडा शहर शिवसेना व युवासेनेच्या वतीने दिनांक 18, 19 व 20 जानेवारी रोजी विविध गटातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या गटातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धांचा शुभारंभ गुरुवारी ङ्कहिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटक संगिता ठाकरे यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील गुरुकुल ... Read More »

वाडा : विविध मागण्यांसाठी माकपचा तहसील कार्यालयावर मोर्चा पंचाय समितीलाही घातला घेराव

MAKAP MORCHA1

प्रतिनिधी वाडा, दि. 17 : तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी कायद्यांतर्गत एकही काम चालू नाही, रोजगार देणे बंधनकारक असताना देखील कष्टकर्‍यांना कामे दिली जात नाही, विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले मिळत नाहीत, विकास कामांचा थांगपत्ता नाही, जनतेच्या मागण्यांची पुर्तताही केली जात नाही, असे अनेक आरोप करत आपल्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे (माकप) शेकडोंच्या संख्येने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तसेच ... Read More »

Scroll To Top