दिनांक 18 December 2017 वेळ 3:07 AM
Breaking News
You are here: Home » संवाद

Category Archives: संवाद

आपले डहाणू शहर स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवू! -संतोष शेट्टी

Santosh_Shetty

डहाणू शहर स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवायचे असेल तर त्याच त्याच लोकांना निवडून देण्याच्या मनस्थितीत जनता नाही. लोकांना परिवर्तन हवे आहे. हे परिवर्तन सर्व 25 जागांवर उमेदवार उभे करु शकणारी शिवसेनाच घडवून आणू शकते. त्यासाठी शहराला सक्षम नेतृत्व देऊ असा विश्‍वास डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीतील शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष शेट्टी यांनी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्याशी बोलताना व्यक्त केला. शेट्टी ... Read More »

स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टा्रचारमुक्त कारभारासाठी मी निवडणूक लढवितोय! डॉ. अमित नहार

3 Amit Nahar (1Colmn)

डहाणू नगरपरिषदेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक आणि भ्रष्ट्राचारमुक्त व्हावा यासाठीच मी निवडणूक लढवित आहे. परिस्थितीत बदल व्हावा आणि डहाणू शहराच्या सुनियोजीत विकासाला चालना मिळावी अशी लोकांची मागणी आणि आवाहन आहे. यामुळेच डहाणूच्या जनतेसाठी मी हा निर्णय घेतला अशी भुमिका भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीतील नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार डॉ. अमित रमेश नहार यांनी दैनिक राजतंत्रशी बोलताना मांडली. दैनिक ... Read More »

आधुनिक नगर बनविण्याला प्राधान्य! -निशा सवरा

IMG_0886

वाडा, दि. 7 : शहराच्या नागरी समस्या वाढल्यात. हे वास्तव आहे. पाणी, मल:निसारण, कचरा व्यवस्थापन यासारख्या समस्यांबाबत अत्यंत प्रभावीपणे योजना राबवून वाडा हे आधुनिक नगर वाटावे यासाठी आपण विशिष्ट कालमर्यादेत कृती आराखडा राबवू, असे भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निशा सवरा यांनी सांगितले. वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूक प्रचाराच्या व्यस्ततेतून वेळ काढत उमेदवार निशा सवरा यांनी दैनिक ... Read More »

डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017, सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आले एका व्यासपिठावर! सोशल मिडीयाद्वारे झाले प्रक्षेपण

cropped-LOGO-4-Online.jpg

राजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू दि. 3 : डहाणू तालुका विकास परिषदेतर्फे आयोजित डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत स्वत:चे नशिब अजमावणार्‍या नगराध्यक्षपद व नगरसेवकपदाच्या सर्व पक्षांच्या उमेदवारांना एकाच व्यासपिठावर आणून चर्चा घडवून आणण्याचा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे मिहीर शहा, भाजपचे भरत राजपूत, शिवसेनेचे संतोष शेट्टी, काँग्रेसचे अशोक माळी, अपक्ष उमेदवार डॉ. अमित नहार व अनिल पष्टे यांनी आवर्जून हजेरी लावली. ... Read More »

डहाणू : सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार एका व्यासपिठावर येणार कार्यक्रमाचे सोशल मिडीयाद्वारे Live प्रक्षेपण

facebook_1506002192949

राजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू दि. 30 : डहाणू तालुका विकास परिषदेतर्फे नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवकपदासाठी निवडणूक लढविणार्‍या सर्व पक्षांच्या उमेदवारांना आज (2 डिसेंबर) एकाच व्यासपिठावर आणून चर्चा घडवून आणण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाविषयी लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. याआधी देखील परिषदेतर्फे नगरसेवकांशी नागरिकांचा संवाद घडवून आणणारा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या ... Read More »

रिक्षाचालकांनी भारतीय संविधान समजून घेतल्यास त्याचा समाजाला फायदा होईल! – संजीव जोशी

Riksha

शिरिष कोकीळ दि. 13 : रिक्षाचालकांनी भारतीय संविधान समजून घेतल्यास त्याचा समाजाला फायदा होईल असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते डहाणू शहरातील रोटरी सभागृह येथे नूतन बाल शिक्षण संघ आयोजित भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर बोलत होते. कार्यक्रमास नूतन बाल शिक्षा संघाचे संचालन समिती सदस्य सुधिर कामत, भारतीय संविधान साक्षरतेच्या कार्यात सक्रीय सहभाग ... Read More »

डहाणू : नगरसेवक व नागरिक यांच्यात संवादाचा कार्यक्रम

DAHANU NAGAR PARISHAD NIVADNUK2

शिरीष कोकीळ दि. 1 : येत्या डिसेंबरमध्ये होणार्‍या डहाणू नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डहाणू तालुका विकास परिषदेने आयोजित केलेल्या आजी माजी नगरसेवक व नागरिक यांच्यातील संवाद कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना बिनधास्त प्रश्‍न विचारावेत, असे आवाहन करण्यात आले होते. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या नियोजित डहाणू तालुका विकास परिषदेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे ... Read More »

धुंदलवाडी येथे श्रॉफ महाविद्यालयाचे एनएसएस शिबीर संपन्न

P. L. SHROFF NSS

डहाणू दि. 29 : चिंचणी येथील पी. एल. श्रॉफ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसीय निवासी शिबिर डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील सोमय्या हॉस्पिटल येथे पार पडले. या शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना श्रमदानासह ग्रामीण जीवनशैली समजून घेण्यास मदत झाली. 23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान परिसरातील विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना लाभ झाला. आज शिबिराच्या शेवटच्या दिवशी समारोप कार्यक्रमात वाड्याचे पोलीस महानिरीक्षक जयप्रकाश घुटे, परुळेकर ... Read More »

विद्यार्थ्यांनी भारतीय राज्यघटनेचा सखोल अभ्यास करावा! -संजीव जोशी

MANOR NEWS

दि. 29 : विद्यार्थ्यांनी भारतीय राज्यघटनेचा सखोल अभ्यास केल्यास त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची अधिक चांगली जाणीव होईल व समाज घडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे विचार दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी मनोर येथे बोलताना काढले. ते मुंबईस्थित रिझवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिरात भारतीय राज्यघटना या विषयावर मार्गदर्शन करीत होते. यावेळी रिझवी महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. मीनाक्षी सामंत, कार्यक्रम अधिकारी सागर ... Read More »

लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहभाग आवश्यक! -संजीव जोशी

DNP NIVDANUK

डहाणू : लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांचा सहभाग वाढला पाहिजे व त्याच्याशिवाय शहराचा विकास साध्य होणार नाही, असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणूतील रोटरी सभागृह येथे बोलताना काढले. डिसेंबर 2017 मध्ये डहाणू नगरपालिकेच्या निवडणूका होत असून या निवडणूकीकडे लोकांनी सकारात्मक दृष्टीने पहावे व सक्षम नागरिकांना निवडून देण्याबरोबरच प्रत्येक नागरिकाने नगरपालिका कारभाराकडे लक्ष देऊन शहराचा ... Read More »

Scroll To Top